PM Awas Deadline Extended In Marathi : या तारखेपर्यंत करता येणार आवास योजनेचा अर्ज
PM Awas Deadline Extended देशातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागास वर्गातील नागरिकांना किफायतशीर किमतीमध्ये पक्के घरे देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केलेली आहे. घर बांधण्यासाठी सरकार द्वारे पात्र लाभार्थ्यांना अनुदान आणि आर्थिक मदत केली जाते. आता सरकारने या योजनेचे अर्ज प्रक्रिया करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे.
PM Awas Deadline Extended देशातील असे लोक जे प्रधानमंत्री आवास योजना 2025 साठी पात्र आहेत मात्र त्यांनी आतापर्यंत घर मिळवण्यासाठी अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने पीएम आवास योजना साठी अर्ज करण्याची डेडलाईन वाढवली आहे.
PM Awas Deadline Extended ग्रामीण आणि शहरी दोन्ही योजना साठी अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. जर तुम्ही ही आत्तापर्यंत या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर तात्काळ तुम्ही आपल्या जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख किती?
PM Awas Deadline Extended
PM Awas Yojana देशातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांसाठी पक्के घरे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत अशा लोकांना घर बांधण्यासाठी अनुदान आणि आर्थिक मदत केली जाते.
PM Awas Yojana आता सरकारने या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज केलेले नाही पण त्या योजनेअंतर्गत असे पात्र कुटुंब या योजनेसाठी तात्काळ जाऊन अर्ज करू शकतात.
पीएम आवास योजनेचा लाभ
PM Awas Yojana Benefits
PM Awas Deadline Extended या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे. सरकारने 2022 पर्यंत 2 कोटी पेक्षा अधिक घराची निर्मिती करण्याचे लक्ष ठेवले होते. ही योजना 2 टप्प्यांमध्ये राबवली जाते. पीएम ग्रामीण आवास योजना आणि पीएम शहरी आवास योजना. पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत 1 लाख 20 हजार रुपये पासून 2.5 लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत केली जाते.
पीएम आवास योजनेची पात्रता
PM Awas Yojana Eligibility
अर्जदार व्यक्ती भारतीय नागरिक असावा
अर्जदाराकडे देशांमध्ये कुठेही पक्के घर नसावे
ग्रामीण भागामध्ये लाभार्थ्याची निवड सामाजिक आर्थिक जाती जनगणना 2011 च्या आधारावर करण्यात येणार आहे
शहरी भागामध्ये बेघर किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे
ग्रामीण भागातील कुटुंबाची मासिक उत्पन्न 10 हजार रुपये पेक्षा कमी असावे
शहरी भागातील लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न मागास वर्गातील 3 लाख रुपये मध्यमवर्गासाठी 6 लाख रुपये आणि मध्यम उत्पन्न वर्गासाठी 9 लाख रुपये पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले चालेल.
पीएम आवास योजनेसाठीची कागदपत्रे
PM Awas Yojana Documents
आधार कार्ड
मतदान कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र
बँक पासबुक
रहिवाशाचा पुरावा देण्यासाठी रेशन कार्ड किंवा लाईट बिल
पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल क्रमांक आदी
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
PM Awas Yojana Online Apply
सर्वात प्रथम तुम्ही पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
होम पेजवर सिटीझन असेसमेंट या आवास प्लस या पर्यायावर क्लिक करा
आता तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल यावर तुम्हाला आधार नंबर, मोबाईल नंबर आणि अन्य वैयक्तिक माहिती भरायची आहे
सर्व माहिती भरून झाल्यावर आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करा
पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने अर्ज तपासून घ्या आणि नंतर सबमिट या बटनावर क्लिक करा
यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
PM Awas Yojana Offline Apply
PM Awas Deadline Extended पीएम आवास योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करायचा असल्यास तुम्हाला जवळच्या कॉमन सर्विस सेंटर सीएससी केंद्र वर जाऊन किंवा नोंदणीकृत बँकांमध्ये जाऊन अर्ज करता येतो. तिथे गेल्यावर तुम्हाला अर्ज भरावा लागेल त्यासोबत आवश्यक कागदपत्र जमा करावी लागतील.
मोबाईल द्वारे अर्ज प्रक्रिया
PM Awas Deadline Extended लाभार्थी व्यक्ती आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनही पीएम आवास योजनेसाठी अर्ज करू शकतो. यासाठी त्याला गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आवाज प्लस 2024 हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. ॲप डाऊनलोड झाल्यानंतर त्यामध्ये आधार कार्ड आणि अन्य आवश्यक माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि त्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
PMAYG प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पक्के घर बांधण्याची संधी तुम्हाला मिळत आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना