PM Awas Yojana 2.0 In Marathi : पीएम आवास योजना 2.0 सुरु

PM Awas Yojana 2.0 Information In Marathi : पीएम आवास योजना 2.0 सुरु

PM Awas Yojana 2.0 केंद्र सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती. आता तिचा पुढचा टप्पा प्रधानमंत्री आवास योजना 2.0 सुरू करण्यात आली आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया या योजनेचा काय आहे फायदा?, काय आहेत नियम? याची संपूर्ण माहिती.

PM Awas Yojana 2.0आपले स्वतःचे घर व्हावे असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. यासाठी अनेक जण प्रचंड मेहनत घेत असतात. नागरिक दिवस रात्र यासाठी पैसे जमा करतात. तेव्हा कुठे त्यांचे एखादे घर होते. मात्र असे अनेक लोक आहेत त्यांच्याकडे पैसा नसतो त्यामुळे अनेक लोक आपलं स्वतःचं घर घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना अनेक वर्ष किरायाच्या घरात जीवन जगायला लागते. त्यामुळे अशा लोकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

Awas Yojana 2.0सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहे. यामध्येच एक योजना म्हणजेच पीएम आवास योजना होय. या योजनेच्या माध्यमातून सरकार गरीब आणि गरजवंतांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करते. केंद्र सरकारने या योजनेचा पुढील टप्पा म्हणजेच पीएम आवास योजना 2.0 सुरू केली आहे. चला तर मग जाणून घेऊया योजनेचे फायदे आणि या योजनेचा कोणाला मिळणार आहे लाभ.

पीएम आवास योजना 2.0 म्हणजे काय

What Is PM Awas Yojana 2.0

PM Awas Yojana 2.0In Marathiमोदी सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील गरीब नागरिकांना स्वतःचे घर मिळवून देणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे घर नाहीत अशांना घर घेण्यासाठी आर्थिक मदत सरकार या योजनेच्या माध्यमातून करते. पीएम आवास योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत देशातील जवळपास 2 कोटी घर बांधण्यात आले आहेत.

आता सरकारने पीएम आवास योजना 2.0 Awas Yojana 2.0पण सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे मध्यमवर्ग आणि गरीब कुटुंबातील नागरिकांना घर घेण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेअंतर्गत शहरी भागात  किफायती दरामध्ये मध्यम कुटुंबातील नागरिक त्यांना घर देण्यात येणार आहे.

कोणाला मिळणार लाभ?

PM Awas Yojana 2.0 Benefits

या योजनेच्या माध्यमातून झोपडी मध्ये राहणारे नागरिक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्यांक, विधवा, अपंग व्यक्ती आणि समाजातील अन्य वंचित वर्गातील नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त सफाई कर्मचारी, कारागीर, अंगणवाडी कार्यकर्ता त्यांनाही या योजनेअंतर्गत सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

काय आहेत या योजनेचे नियम

PM Awas Yojana 2.0 Conditions

  • पीएम आवास योजना 2.0 Awas Yojana 2.0च्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या कमजोर वर्गातील ईडब्ल्यूएस मध्यम उत्पन्न असणारे एलआयसी आणि मध्यमवर्ग एमआयजी तील नागरिकांना सरकारकडून लाभ देण्यात येईल.
  • योजनेच्या नियमा नुसार ज्या नागरिकांकडे देशभरात कुठेही पक्के घर नाही त्यांना पक्के घर देण्यासाठी आर्थिक मदत सरकारकडून करण्यात येणार आहे यासाठी सरकारने काही पात्रता निश्चित केले आहेत.
  • त्यामध्ये लाभ घेण्यासाठी इएसडब्ल्यूएस कुटुंबातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख पेक्षा अधिक नसावे.
  • याव्यतिरिक्त एलआयसी कुटुंबातील व्यक्तींचे वर्षाचे उत्पन्न 3 लाख ते 6 लाख दरम्यान असावे.
  • तर एमआयजी कुटुंबातील नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाख ते 9 लाख रुपये पर्यंत असावे. अशांनाच या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे.