pm Jeevan Jyoti bima yojana under this government scheme you will get insurance cover worth lakhs for rs 436 know the details : 436 रुपयात मिळेल 2 लाखाचा विमा संरक्षण

जीवन ज्योती विमा योजना

pm Jeevan Jyoti bima yojana under this government scheme you will get insurance cover worth lakhs for rs 436 know the details : देशातील गरीब आणि गरजवंत लोकांसाठी ही एक फायद्याची योजना आहे. या योजनेमध्ये कमी रक्कम जमा करून तुम्ही तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ ही कुठली योजना आहे आणि या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया काय आहे.

देशातील अनेक कुटुंब आजही असे आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, अशा स्थितीत कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडते. अशा स्थितीमध्ये सरकारने लोकांना दिलासा देण्यासाठी एक योजना सुरू केलेली आहे.

या योजनेचे नाव प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना असे आहे. या योजनेची सुरुवात 2015 मध्ये केंद्र सरकारने केली आहे.

PM Jeevan Jyoti Bima Yojana या योजनेअंतर्गत गरीब व मध्यम वर्गातील लोकांना विम्याचा लाभ घेता येतो. योजनेअंतर्गत कुठलाही व्यक्ती वर्षाला 436 रुपये प्रीमियम भरून 2 लाख पर्यंतचा विमा संरक्षण प्राप्त करू शकतो. ही रक्कम एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला दिली जाते. चला तर मग पाहू कोण आणि कसे करू शकते या योजनेसाठी अर्ज..

काय काय आहेत योजनेचे फायदे

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana)गरीब आणि गरजवंत वर्गातील लोकांसाठी खूप महत्त्वाचे आहे. या योजनेमध्ये 18 ते 55 वयोगटातील व्यक्ती अर्ज करू शकतात. या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षी 436 प्रीमियम भरावा लागतो. ही रक्कम तुमच्या बँक खात्या मधून ऑटो डेबिटच्या माध्यमातून वर्ग होते.

Jeevan Jyoti Bima Yojana या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाचे टर्न लाईफ कव्हर मिळते ते 1 जून ते 31 मे पर्यंत मान्य असते. जर विमा कालावधी दरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला 2 लाख रुपयांची रक्कम दिली जाते. ही रक्कम कुटुंबासाठी एक मोठा दिलासा असतो. विमा रक्कम मिळाल्यामुळे मुलांचे शिक्षण, घराचा खर्च आणि अन्य आवश्यक गरजा पूर्ण होण्यास मदत होते.

जीवन ज्योती विमा योजना अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनामध्ये अर्ज करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला कुठल्याही एजंट किंवा दलालाकडे जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सरळ तुमच्या जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन अर्ज करू शकता.

बँकेमध्ये जाऊन तुम्हाला या योजनेचा अर्ज भरावा लागेल आणि काही आवश्यक कागदपत्रे त्यासोबत द्यावे लागतील. त्यामध्ये आधार कार्ड, ओळखपत्र, बँक अकाउंट पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईजचा फोटो द्यावा लागेल. अर्ज केल्यानंतर बँकेकडून तुमचा वीमा ॲक्टिव्ह केला जातो आणि प्रत्येक वर्षी निश्चित प्रीमियम तुमच्या खात्यामधून कट होतो.