PM Kisan 20th Installment Date In Marathi : अखेर तारीख ठरली

PM Kisan 20th Installment Date In Marathi : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता या दिवशी होणार जाहीर

PM Kisan 20th Installment Date In Marathi : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मतदारसंघात म्हणजेच वाराणसी, उत्तर प्रदेश येथून या हप्त्याचे वितरण एका विशेष कार्यक्रमातून करतील.

PM Kisan 20th Installment Date या योजनेत दरवर्षी तीन टप्प्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

pradhanmantri kisan samman nidhi yojana PMKSNY प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.

PMKSNY केंद्रीय कृषिमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक आयोजित झाली त्या बैठकीमध्ये 2 ऑगस्ट ला लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेचा हप्ता जमा होणारा असल्याचे सांगितले.

आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PMKSNY योजनेचे १९ हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते. फेब्रुवारी महिन्यामध्ये 19 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जमा झाला होता.

PM Kisan Yojana प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना आता 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा होती. जुलै महिना उलटून गेला तरीही अजून शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा काय झाले नाहीत याची प्रत्येक शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती. परंतु आज ही आज प्रतीक्षा संपली आहे.

PM Kisan Yojana लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात विसावा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा केला जाणार आहे. सरकारने या हप्त्यासाठी १९,६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे..

२ ऑगस्ट २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथे या हप्त्याचे औपचारिक लाँचिंग करतील. या हप्त्यात देशभरातील सुमारे ९.८ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये थेट हस्तांतरित केले जातील. शेतकऱ्यांना वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये एकूण ६००० रुपये मिळत असून, हा वर्षाचा दुसरा हप्ता आहे.

 अशी करा तपासणी

PM Kisan Yojana Status Check

  • pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.
  • आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा बँक खात्याचा तपशील टाका.
  • ‘Get Data’ वर क्लिक करा त्या नंतर तुम्हाला तुमचा हप्ता मिळालाय की नाही, याची माहिती स्क्रीनवर दिसेल.
  • जर “Payment Success” असा संदेश दिसला, तर तुमचं पेमेंट पूर्ण झालंय. अन्यथा “e-KYC अपूर्ण”, “चुकीचे बँक तपशील”, किंवा “आधार लिंक नाही” अशी कारणं दाखवली जातील.