PM Mudra Yojana 2026 In Marathi : आत्तापर्यंत 52.37 कोटी पेक्षा अधिक कर्ज मंजूर

PM Mudra Yojana In Marathi : स्वयंरोजगारमध्ये महिला आणि मागास आघाडीवर

PM Mudra Yojana : प्रधानमंत्री मुद्रा योजना देशांमध्ये स्वयंरोजगार आणि छोटे उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. एप्रिल 2015 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत 52.37 कोटीपेक्षा अधिक कर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

PM Mudra Yojana 2026 केंद्र सरकारकडून देशातील स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तीन कॅटेगिरी करण्यात आले आहेत. यात शिशु, किशोर आणि तरुण या श्रेणीनुसार नव उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. जेणेकरून ते असलेला व्यवसाय वाढू शकतील किंवा नवीन व्यवसाय सुरू करू शकतील.

PM Mudra Yojana News ही केंद्र सरकारची योजना एक गेम चेंजर योजना म्हणून समोर आलेली आहे. ज्यांना कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी मुद्रा योजना एक वरदान ठरत आहे.

तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच्या व्यवसायाची, उद्योगाची माहिती- प्रोजेक्ट अहवाल सादर करून मुद्रा लोन अंतर्गत कर्ज करून आपला नवीन उद्योग किंवा असलेला उद्योग वाढू शकता. याबरोबरच तुम्ही जवळच्या बँकेची संपर्क करूनही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करू शकता.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात एप्रिल 2015 मध्ये झाली होती. स्वयंरोजगारासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत 52.37 कोटी कर्ज मंजूर झाले आहेत. या अंतर्गत एकूण 33.65 लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. यातील 70 टक्के महिला उद्योजकांना कर्ज मंजूर झाले आहे तर जवळपास 50 टक्के कर्ज अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अन्य मागास वर्गातील लोकांना मंजूर झाले आहे.

कोणत्या श्रेणीमध्ये किती लोकांना मिळते कर्ज?

PM Mudra Yojana Update News

  • पीएम मुद्रा योजनाच्या श्रेणीनुसार पाहिले तर शिशु वर्ग अंतर्गत सर्वाधिक 78% कर्ज देण्यात आले आहे. मात्र रकमेच्या बाबतीत हा टक्का 36 टक्के आहे. शिशुवर्गात 50 हजार रुपये पर्यंतचे कर्ज देण्यात येते.
  • किशोर श्रेणीमध्ये 50 हजार ते 5 लाख रुपये पर्यंत कर्ज देण्यात येते. याची संख्या एकूण कर्जाच्या 20% आहे. मात्र रकमेच्या हिशोबाने ही भागीदारी 40 टक्के आहे.
  • तरुण श्रेणीमध्ये 5 ते 10 लाख रुपयांचे कर्ज मुद्रा योजनेअंतर्गत देण्यात येते. या श्रेणीमध्ये कर्जाची संख्या केवळ 2 टक्के आहे. मात्र रकमेच्या हिशोबाने 24 टक्के आहे

तरुण प्लस योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत तरुण प्लस योजना पण सुरू करण्यात आलेली आहे. ज्या व्यक्तींनी तरुण श्रेणी मधील कर्ज यशस्वीपणे भरणा केले आहे. त्यांना या अंतर्गत 10 ते 20 लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते. याबरोबरच क्रेडिट गॅरंटी फंड फॉर मायक्रो युनिट द्वारे या कर्जावर गॅरंटी कव्हरेज देण्यात येते. यामुळे उद्योजकांना अधिक मदत मिळते.

प्रधानमंत्री मुद्रा योजना छोट्या व्यापाऱ्यांना- उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. याद्वारे मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग आणि सर्विस सेक्टर सोबतच कृषी संबंधित कामे जसे की पोट्री, डेरी आणि मधुमाशी पालन यांचा समावेश होतो. या अंतर्गत तरुण लोन आणि वर्किंग कॅपिटल दोन्ही मध्ये आवश्यकता पूर्ण केली जाते.

उद्योजकांसाठी कर्ज मर्यादा वाढवली

नव उद्योजकांना आणि स्वयंरोजगारांना अधिक मदत देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 23 जुलै 2024 ला सादर केलेल्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 20 लाख रुपये पर्यंत कर्ज मर्यादा वाढवून देण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा 24 ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत कर्ज बँक, एनबीएफसी, मायक्रो फायनान्स संस्था आणि अन्य आर्थिक संस्था द्वारे देण्यात येते. यामुळे देशातील छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळत आहे.

उद्योगासाठी सरकार देणार कर्ज?

तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर सरकार तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे तुम्हाला उद्योग सुरू करण्यासाठी कुठल्याही बँकेच्या मागे लागण्याची किंवा सावकाराकडून कर्ज घेण्याची गरज नाही. कारण प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत नवीन उद्योग सुरू करण्यासाठी किंवा असलेला उद्योग वाढवण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत 20 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे तुम्ही स्वतःचा व्यवसाय सहज सुरू करू शकता.

कर्जाचे टेन्शन मिटले

PM Mudra Yojana आपल्याला कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल असणे खूप आवश्यक आहे. मात्र प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देण्यात येत आहे. ते कर्जाच्या स्वरूपात असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असू द्या, तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तुमचं कर्जाचे टेन्शन मिटणार आहे.