PM Mudra Yojana In Marathi : काय आहे सरकारची ही योजना आणि पात्रता
PM Mudra Yojana In Marathi : प्रत्येकाचे स्वप्न असते की स्वतःचा एक व्यवसाय सुरू करावा. पण प्रत्येकाची परिस्थिती ही सारखीच नसते. कोणी स्वतःचा व्यवसाय टाकू शकतो तर कुणाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे त्याच्या मनात इच्छा असूनही ते आर्थिक अडचणीमुळे, त्याच्याकडे पुरेसे भांडवल नसल्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाही. कोणत्याही बँकेतून कर्ज घेणे शक्य होत नाही. कारण व्याजदर देखील भरपूर असतो. त्यामुळे सरकारने एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेत तुम्हाला 20 लाखांपर्यंतचे कर्ज मिळते.
PM Mudra yojana Get 20 Lakh Loan केंद्र सरकारने व्यवसाय सुरू करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे पीएम मुद्रा योजना. पीएम मुद्रा योजनेत लहान व्यापाऱ्यांना कर्ज दिले जाते. या योजनेतून मिळणाऱ्या रकमेची मर्यादा डबल करण्यात आली आहे. या योजनेत आता वीस लाखांपर्यंतचे लोन मिळणार आहे.
PM Mudra yojana for Business Get 20 Lakh Loan अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 -25 मध्ये याबाबत घोषणा केली होती. पीएम किसान योजनेत कर्जाची लिमिट 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही लिमिट 10 लाख रुपयांपर्यंत होती. यामध्ये आता एक ‘तरुण प्लस’ ही कॅटेगिरी अपडेट केली आहे.
PM Mudra Yojana पीएम मुद्रा योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली आहे. स्टार्टअप सुरू करण्यासाठी देशातील नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेत नोंद, कार्पोरेट आणि नॉन एग्रीकल्चर बिझनेस सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते. हे कर्ज चार कॅटेगिरी मध्ये मिळते ते कसे हे आपण बघू..
चार कॅटेगिरीत मिळते कर्ज
या योजनेत शिशु कर्ज अंतर्गत 50 लाखांचे कर्ज मिळते.
किशोर कर्जामध्ये 50000 ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते.
तरुण कर्ज अंतर्गत 5 ते 10 लाखांचे कर्ज मिळते.
तरुण प्लस कॅटेगिरीमध्ये तुम्हाला 10 ते 20 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
जर व्यवसायिकांनी 10 लाखांपर्यंतचे कर्ज व्यवस्थितरीत्या फेडले. तर त्यांना 20 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. या कर्जावरील व्याजदर हा 9 ते 12 टक्के असतो. त्याच बरोबर हे कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फीस लागत नाही आणि जर तुम्ही शिशु कर्जासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला कोणत्याही गॅरंटीची गरज नाही.