PM Shram Yogi Mandhan Yojana 2025 Information In Marathi : आजच करा अर्ज
PM Shram Yogi Mandhan Yojana : आज आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेबद्दल माहिती देणार आहोत. या योजनेअंतर्गत लोकांना 60 वर्षा नंतर प्रत्येक महिन्याला 3000 रुपये लाभ मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेची संपूर्ण माहिती.
PM Shram Yogi Mandhan Yojana 2025 केंद्र आणि राज्य सरकार मिळुन देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना लाभ देणे हा आहे. यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आहे.
PM Shram Yogi Mandhan Yojana या योजनेद्वारे सरकार कर्मचाऱ्यांना महिन्याला 3000 रुपये देणार आहे. ही योजना सरकारने 2019 फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू केली. या योजनेअंतर्गत 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 3000 रुपये लाभ दिला जातो.
PM Shram Yogi Mandhan Yojanaपीएम श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी आहे. असंघटित क्षेत्र म्हणजे काही असे क्षेत्र जे सरकारसोबत रजिस्टर नसतात त्यामध्ये जसे कामगार रस्त्यावरील धंदे करणारे वेंडर्स, रिक्षावाले, घरगुती काम करणाऱ्या स्त्रिया यांचा समावेश होतो.
PM Shram Yogi Mandhan Yojana 2025 असंघटित क्षेत्रामध्ये व संघटित क्षेत्रामध्ये कोण कोण येतात याची संपूर्ण यादी केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टलमध्ये दिलेली आहे. पीएम श्रमयोगी मानधन योजने मधून केंद्र सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षित कायदा सामाजिक सुरक्षा कायदा 2008 नुसार या क्षेत्रातील नागरिकांना समाज सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे लाभ
PM Shram Yogi Mandhan Yojana Benefits
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या श्रमिकांना 60 वर्ष वय झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 3000 रुपये लाभ दिला जातो.
या योजनेचा लाभ केवळ श्रमिक घेऊ शकतात. ज्यांचे मासिक उत्पन्न 15000 रुपये पेक्षा कमी आहे.
या योजनेचा लाभ 18 ते 40 वर्ष वय असलेले असंघटित क्षेत्रातील मजूर घेऊ शकतात.
आतापर्यंत या योजनेची देशातील 46 लाख 29 हजार 664 लोक जोडले आहेत.
ही योजना केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे चालवली जाते.
60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला 3000 रुपये लाभ देण्यासाठी नागरिकांना आपल्या वयाच्या हिशोबानुसार अंशदान करावे लागते. याबरोबरच सरकारही अंशदान करते. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 500 रुपये या योजनेमध्ये जमा केले, तर सरकार पण यामध्ये प्रत्येक महिन्याला 500 रुपये जमा करेल.
त्यामुळे प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये 1000 रुपये जमा होतील. 18 वर्षे वय असलेले व्यक्ती प्रत्येक महिन्याला 55 रुपये देऊ शकतात. तर 40 वय असलेले व्यक्ती प्रत्येक महिन्याला 200 रुपये देऊ शकतात.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची पात्रता
PM Shram Yogi Mandhan Yojana Eligibility
अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे
अर्जदार हा असंघटित क्षेत्रातील नागरिक असावा
अर्जदार आयकर दाता नसावा
अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते असावे
अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 40 वर्ष दरम्यान असावे
अर्जदाराच्या महिन्याचा पगार हा 15000 रुपयांपेक्षा कमी असावा
अर्जदाराकडे ही श्रम कार्ड असणे आवश्यक आहे
पीएम श्रम योगी मानधन योजनेचे लाभार्थी
PM Shram Yogi Mandhan Yojana Benefisiors
सफाई कामगार
लहान व मध्यम शेतकरी
पशुपालन
मासेमारी करणारे नागरिक
जमीन नसलेले शेतकरी
चमड्याची कारागिरी करणारे कामगार
भाजी व फळे विकणारा वेंडर
रिक्षावाले
पॅकिंगचे काम करणारे नागरिक
एका राज्यातून दुसरा राज्यात कामासाठी आलेले नागरिक
घरगुती काम करणारे
बांधकाम कामगार
वीट, भट्टी व दगड खाणीमध्ये लेबलिंग व पॅकिंग करणारे कर्मचारी
विणकाम करणारे कर्मचारी
कचरा गोळा करणारे
डोक्यावर ओझे उचलणारे
धोबी
आवश्यक कागदपत्रे
PM Shram Yogi Mandhan Yojana Documents
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
वयाचे प्रमाणपत्र
रहिवासी प्रमाणपत्र
श्रम कार्ड
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
पासपोर्ट आकाराचा फोटो
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
PM Shram Yogi Mandhan Yojana Online Apply
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
तेथे तुम्हाला वेबसाईटचे डॅशबोर्ड दिसेल उघडेल त्या होम पेज मध्ये तुम्हाला क्लिक हेअर टू अप्लाय नाऊ या पर्यावर जावे लागेल
तेथे गेल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला सेल्फ इनरोलमेंट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून प्रोसीड या बटनवर क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव, ईमेल आयडी इत्यादी माहिती भरावी लागेल
त्यानंतर कॅपच्या कोड टाकून ओटीपी वर क्लिक करा
त्यानंतर ओटीपी व्हेरिफाय झाल्या नंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा अर्ज उघडेल
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा
त्यानंतर आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा
त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA