PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024 In Marathi : प्रक्रिया उद्योगातून व्हा आत्मनिर्भर

Table of Contents

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024 Information : प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मे 2022 रोजी PMFME ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ही योजना लघु आणि सूक्ष्म खाद्य व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत आर्थिक मदत अनुदानाच्या रूपात आणि सूक्ष्म व लघु खाद्य व्यवसायिकांच्या वाढीसाठी स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येते. तसेच या योजनेच्या माध्यमातून विनामूल्य प्रशिक्षण देणे, प्रशासकीय मदत करणे, उत्पादनाची मार्केटिंग करणे यासारख्या सुविधा मोफत दिल्या जातात. त्यामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योग करणाऱ्या व्यवसायिकांना त्यांचा उद्योग वाढविण्यासाठी आणि त्यांची ब्रॅण्डिंग करण्यासाठी या योजनेचा मोठा लाभ होत आहे.

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना म्हणजे काय

What is PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana

आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना सुरू केली आहे. देशभरात या योजनेची अंमलबजावणी 2020-21 या आर्थिक वर्षापासून करण्यात आली असून, ती 2024-25 या आर्थिक वर्षापर्यंत चालवली जाणार आहे. ही योजना 5 वर्षासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील लघु आणि सूक्ष्म अन्न उद्योगांच्या व्यवसायात वाढ होणे हा योजनेचा उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक जिल्ह्यात खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता या गोष्टी लक्षात ठेवून लघुउद्योगांना अनुदान प्रशिक्षणात आर्थिक मदत देण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केले जात आहे.

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या प्रगतीसाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून नवीन रोजगारांना संधी उपलब्ध होत आहेत. या योजनेच्या माध्यमातून लघु उद्योगाशी निगडित असलेल्या नागरिकांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. जेणेकरून बेरोजगार नागरिकांनी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, आणि देशातील वाढत्या बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यासाठी मदत होईल. प्रधानमंत्री सूक्ष्म आणि लघु उद्योग योजनेसाठी केंद्र सरकारने तब्बल 10,000 कोटी रुपयाचे आर्थिक तरतूद केली आहे, त्यामुळे सूक्ष्म आणि लघु उद्योगांना निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

ठळक मुद्दे :

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना म्हणजे काय

What is PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेची थोडक्यात माहिती

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana In Short

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेचे उद्दिष्टे

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana Purpose

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेचे फायदे

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana Benefits

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग योजनेची वैशिष्ट्ये

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana features

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत निवड प्रक्रिया

PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme (PMFME)

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान

PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme (PMFME)

पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान

PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme (PMFME)

ब्रँडिंग आणि विपणनासाठी अनुदान

PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme (PMFME)

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाची पात्रता

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana Eligibility

शेतकरी उत्पादन संघ आणि उत्पादकाच्या सहकारी संस्था अनुदान पात्रता

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेच्या माध्यमातून कोणाला मिळते अनुदान

या योजनेत समाविष्ट असलेली उत्पादने

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना आवश्यक कागदपत्रे

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana dacouments

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana Online Application

FAQ’s

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेची थोडक्यात माहिती

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana In Short

योजनेचे नावप्रधानमंत्री सूक्ष्म अन्य उद्योग उन्नयन योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
या योजनेचे लाभार्थी कोणलघु आणि सूक्ष्म उद्योग व्यावसायिक
उद्देश कायउद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक मदत करणे
विभागअन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय केंद्र सरकार
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाईट pmfme.mofpi.gov.in
PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेचे उद्दिष्टे

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana Purpose

  • PMFME कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन लागले होते, त्यामुळे लघु उद्योगासह मोठमोठे उद्योगही ठप्प झाले होते. त्यामुळे या उद्योगांची प्रगती आणि महसुलात मोठी घट झाली होती, त्यामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योग यांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग प्रक्रिया योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून लघु आणि सूक्ष्म उद्योगाची क्षमता वाढवणे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत, आणि त्यांचा रोजगाराचा प्रश्न कायमचा सुटत आहे.
  • PMFME या योजनेच्या माध्यमातून अन्नप्रक्रिया क्षेत्रात संबंधित प्रशिक्षण आणि संशोधनांमध्ये मदत केली जाते.
  • मायक्रोफूड, प्रोसेसिंग उद्योग, बचत गट, सहकारी संस्थांकडून पुरवठा करण्याची क्षमता वाढण्यास ही योजना महत्त्वाची ठरत आहे.
  • आपल्या व्यवसायाची ब्रँडिंग आणि विक्रीसाठी या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. यासाठी जिल्हास्तरावर एक उत्पादन प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेचे फायदे

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana Benefits

  • केंद्र सरकारच्या वतीने देशातील लघु आणि सूक्ष्म उद्योगाच्या विकासासाठी प्रधानमंत्री लघु आणि सूक्ष्म उद्योग प्रक्रिया योजना सुरू करण्यात आली आहे.
  • PMFME या योजनेच्या माध्यमातून सूक्ष्म आणि लघु व्यावसायिकांचा रोजगार वाढवण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
  • याशिवाय या तरुणांना कौशल्य प्रशिक्षण, शासकीय मदत, एम आय एम योजनेच्या जाहिरातीसाठी मोफत सुविधाही दिल्या जाणार आहेत.
  • या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.
  • देशातील वाढते बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.
  • सध्या स्पर्धेचे युग असल्यामुळे प्रत्येकाला नोकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आपला स्वतःचा रोजगार निर्माण करून आपण बेरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा योजनेचा मुख्य उद्देश ठरत आहे.
  • बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत आणि ते स्वतःच्या पायावर या योजनेअंतर्गत उभे राहू शकतात.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग योजनेची वैशिष्ट्ये

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana features

  • आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मे 2022 रोजी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना सुरू केली आहे.
  • ही योजना सुरुवातीला 2020-21 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आली असून, ही योजना आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजे ही योजना देशभरात पाच वर्षासाठी सुरू करण्यात आलेली आहे.
  • 2025 पर्यंत या योजनेच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपये खर्च केले जाते.
  • PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme (PMFME) या योजनेसाठी केंद्र सरकार 60% तर राज्य सरकार 40% खर्च उचलणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रधानमंत्री सूक्ष्म आणि लघु उद्योगांना आर्थिक मदत करत आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून सरकार दहा लाख रुपये पर्यंतच्या पात्र उद्योजकांना त्यांच्या प्रकल्पासाठी 35% दराने क्रेडिट लिंक अनुदान देणार आहे.
  • देशभरातील खाद्य उद्योगांना चालना देणे हा प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत निवड प्रक्रिया

PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme (PMFME)

  • या योजनेच्या माध्यमातून नवीन उद्योग एका जिल्ह्यात एक उत्पादन असलेल्या उद्योगांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाणार आहे.  
  • वैयक्तिक सूक्ष्म उद्योग गट निवडी द्वारे निवडले जातात देशभरातील उद्योजकांचे जिल्हास्तरावर अर्ज मागविण्यात येतात.
  • व्यक्तिने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे जिल्हास्तरीय समिती इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावते.
  • जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेल्या प्रकरणात रिसोर्सेस व्यक्ती त्यांना डीपीआर तयार करण्यात मदत करेल, जेणेकरून त्यांना संबंधित बँकेतून तत्काळ आणि सहज कर्ज उपलब्ध होऊ शकेल.
  • याबरोबरच आवश्यक कागदपत्रे डी पी आर सोबत जोडली जातात मात्र वैयक्तिक सूक्ष्म युनिटला पाठिंबा देण्यासाठी अंतिम संमती राज्य सरकार द्वारे दिली जाते.

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना

फ्री शौचालय योजना 2024

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान

PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme (PMFME)

  • अन्नप्रक्रिया उद्योगासाठी प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा 10 लाख रुपये एवढे अनुदान दिले जाते याबरोबरच या प्रकल्पामध्ये लाभार्थ्यांचा हिस्सा 10 टक्के असणे आवश्यक आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून स्वयंस्वयता गटांनाही अनुदान दिले जाते
  • जे सदस्य हे अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये गुंतलेले आहेत अशा सदस्यांना बीज भांडवल म्हणून 40 हजार रुपये प्रत्येक सदस्याला खेळते भांडवलासाठी आणि आवश्यक छोटी उपकरणे खरेदी करण्यासाठी दिले जातात
  • या योजनेच्या माध्यमातून एका गटाला जास्तीत जास्त 4 लाख रुपयांचे बीज भांडवल या योजनेच्या माध्यमातून दिले जाते
  • स्वयंसहाय्यता गटातील सदस्य अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित नसल्यामुळे त्यांचे बीज भांडवल हे स्वयंसहाय्यता गटाचा फेडरेशनला दिले जाते

पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान

PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme (PMFME)

स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादन संघ, खाजगी उद्योग, उत्पादक, उत्पादनाच्या सहकारी संस्था किंवा शासकीय यंत्रणा यांना योजनेअंतर्गत 35 टक्के अनुदान दिले जाते, मात्र 10 लाखापेक्षा अधिक अनुदानाचा प्रस्ताव असेल तर तो केंद्र सरकारच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडे पाठविला जातो.

स्वयंसहायता गट किंवा शेतकरी उत्पादक संघ उत्पादनाच्या सहकारी संस्था यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पा नुसार 50 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.

ब्रँडिंग आणि विपणनासाठी अनुदान

आपल्या उत्पादनाचे ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी या योजनेअंतर्गत उत्पादन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादन संघ, स्वयंसहायता गट, सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग आदींना आर्थिक मदत केली जाते. यासाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान देण्यात येते. मात्र हे उत्पादन एक जिल्हा एक उत्पादनाशी संबंधित असणे आवश्यक आहे. सदरचे उत्पादनाचा टर्नओव्हर हा किमान 5 कोटी असणे आवश्यक आहे.

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाची पात्रता

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana Eligibility

  • अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त असावे.
  • अर्जदाराचे किमान आठवीपर्यंत शिक्षण असणे आवश्यक आहे.
  • देशभरातील लहान आणि मोठे उद्योगपती या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेअंतर्गत लाभ घेता येतो.
  • अर्जदार अर्ज करत असलेल्या उद्योगाचा मालक किंवा भागीदार असणे आवश्यक आहे.
  • उद्योगाची मालकी आणि पार्टनरशिप फर्म असणे आवश्यक आहे.

शेतकरी उत्पादन संघ आणि उत्पादकाच्या सहकारी संस्था अनुदान पात्रता

  • अर्जदाराला प्रकल्पाच्या 10% रक्कम खर्च करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार जे उत्पादन करत आहे त्याचे त्याला ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच त्या उत्पादनाच्या कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव त्याला असणे ही आवश्यक आहे.
  • सुरू केलेल्या प्रकल्पाची किंमत सध्याच्या टर्नओव्हर रकमेपेक्षा अधिक नसावी.
  • प्रकल्पच्या खर्चामध्ये समाविष्ट केलेली वर्कशीटची भाडेपट्टी किमान तीन वर्षाच्या कालावधीसाठी करणे आवश्यक आहे.  

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेच्या माध्यमातून कोणाला मिळते अनुदान

PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme (PMFME)

देशभरातील वैयक्तिक सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योजकांना या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते

PMFME या अंतर्गत स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक गट, सहकारी संस्था यांना देखील अनुदान देण्यात येते तसेच या योजनेच्या माध्यमातून नवीन उद्योग हे एक जिल्हा एक उत्पादन साठी ही अनुदान देण्यात येते.

PMFME या योजनेत समाविष्ट असलेली उत्पादने

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024

नाशवंत : कृषी उत्पादने, तृणधान्य आधारित उत्पादने, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, सागरी उत्पादन, मध उत्पादन.

दूध प्रक्रिया : यामध्ये खवा, पेढे, श्रीखंड, आम्रखंड आदी

मसाले प्रक्रिया : नाचणी मसाला, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, शेंगदाणा चटणी, खोबरा चटणी आदी

फळ भाज्या व फळे प्रक्रिया : आवळा, मोसंबी, लिंबू, आंबा, सिताफळ, पेरू, चिकू, बोर, जांभूळ इत्यादींपासून प्रक्रिया उद्योग आईस्क्रीम, रबडी, काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे, जेली आदी

रेडू टू इट प्रक्रिया अंतर्गत येणारे सर्व खाद्यपदार्थ : पॅकिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग, सर्व प्रकारची फळे तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या प्रक्रिया उद्योग यामध्ये समाविष्ट आहेत.

तेल घाना उद्योग : सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा, तीळ, बदाम, मोहरी आदी सर्व तेलाचे उत्पादने

पावडर उत्पादने : कश्मीरी मिरची, स्पेशल मिक्स लवंगी मिरची, ज्वारी, गहू, मिरची, धना,  जिरे, गुळ, हळद, पशुखाद्य निर्मिती उद्योग, गहू आटा मका, जुनी सरकी पेंड, करडी पेंड, भरड धान्य इत्यादी

कडधान्य प्रक्रिया उद्योग : तूर, मूग, हरभरा इत्यादी डाळीचे पॉलिश करणे व हरभरा पिठाचे बेसन तयार करून पॅकेजिंग करणे इत्यादी

राईस मिल उद्योग : तांदूळ, पोहा, मुरमुरे इत्यादी प्रक्रिया उद्योग

बेकरी उत्पादन प्रक्रिया उद्योग : बिस्किट, नॉन कटाई क्रीम, रोल, मैसूर पाक, बर्फी, खारी, केक, टोस्ट, ब्रेड, वडापाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी, चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, मुरमुरे इत्यादीचे उत्पादन करणे

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना आवश्यक कागदपत्रे

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana dacouments

आधार कार्ड

पॅन कार्ड

मतदान ओळखपत्र

रहिवासी प्रमाणपत्र

उत्पन्न प्रमाणपत्र

पासबुक

उद्योगाशी संबंधित सर्व कागदपत्रे

पासपोर्ट आकाराचा फोटो

मोबाईल नंबर

ईमेल आयडी इत्यादी

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana Online Application

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योगासाठी PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर प्रथम तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

त्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे मुख्य पेज उघडेल

त्यावर असलेल्या ऑनलाइन रजिस्ट्रेशन या पर्याय क्लिक करा

त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यानंतर साइन इन पर्याय निवडा

साइन इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म उघडेल

या फॉर्ममध्ये तुम्हाला विचारली संपूर्ण माहिती वाचून घेऊन अचूक पद्धतीने भरावी

अर्ज भरल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल

यानंतर तुम्हाला पोर्टलवर लॉगिन करावे लागेल

यानंतर तुम्हाला select beneficiary type ह्या पर्याय क्लिक करा

त्यानंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून अर्ज सबमिट करावा

त्यानंतर तुम्ही Apply Now हा पर्याय निवडावा

यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज दिसेल

या अर्जावर विचारलेली सर्व माहिती भरा आणि त्याला लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

यानंतर संपूर्ण अर्ज एकदा तपासून घ्या यावर भरलेली तुम्ही माहिती अचूक आहे का याची खात्री करा आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना साठी ऑनलाईन अर्ज करू शकता

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग प्रक्रिया योजनेचा हेल्पलाइन नंबर 011-26406500

FAQ’s

प्रश्न: PMFME चे संक्षिप्त रूप काय?

उत्तर:  PMFME योजनेचे संपूर्ण नाव प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना ही आहे.

प्रश्न: प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा PMFME अर्ज कसा करावा?

उत्तर: प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा अर्ज तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल.

प्रश्न: प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा PMFME उद्देश काय? उत्तर: लघु आणि सूक्ष्म उद्योगाची क्षमता वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA