PM Suraksha Bima Yojana 2024 :
PM Suraksha Bima Yojana 2024 : जीवन विमा संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम सुरक्षा विमा योजना सुरू केलेली आहे. ही योजना २०१६ रोजी सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत दोन लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळते. यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याल्या दोन ( 2 ) रूपये आणि वर्षाला २० रूपयाचा हप्ता जमा करावा लागेल. जाणून घ्या, या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
आजच्या धावपळीच्या काळात जीवन विमा असणे खूप आवश्यक झाले आहे. देशाची लोकसंख्या वेगाने वाढताना दिसत आहे. त्यासाठीच सरकार गरीब वर्गासाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत असते. ही योजना सामान्य व्यक्तीला आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात येते. केंद्र सरकारद्वारे पीएम सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही भारत सरकारची अपघात विमा पॉलिसी आहे. या पॉलिसअंतर्गत अपघात मृत्यू अथवा अपंग झाल्यास विमा रक्कम मिळण्यासाठी क्लेम करता येतो. मृत्यू अथवा पूर्णत: अपंग झाल्यास दोन लाख आणि अंशत: अपंगत्व आल्यास १ लाख रूपयांची विमा रक्कम दिली जाते. हा विमा एक वर्षांसाठी असतो आणि याला प्रत्येक वर्षानंतर रिन्यू (नुतनीकरण) करावा लागतो.
pradhanmantri Suraksha Bima Yojana 2024 : देशभरात अनेक विमा कंपन्यात आहेत. ऐवढ्या कंपन्या असतानाही केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसारखी योजना सुरू केली आहे. कारण विमा कंपन्या महागड्या दरात विमा संरक्षण देतात. मोठ्या प्रमाणात प्रिमियम वसूल करतात. तो सर्व व्यक्तींना भरणे परवडेलच असे नाही. मात्र आपले आणि आपल्याला कुटूंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी प्रत्येकाला विमा काढवा वाटत असतो. त्यामुळे सरकारने पुढाकार घेऊन सामान्य व्यक्तीला समोर ठेवून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना PM Suraksha Bima Yojana सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला कोणताही अपघात झाल्यास विमा संरक्षण देण्यात येते. आपण या लेखाच्या माध्यमातून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्ही या योजनेचा कसा लाभ घेऊ शकता ? यासाठी काय पात्रता आहे? यासाठी किती रूपये खर्च करवा लागतो? या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत काय काय लाभ मिळतात आदी विषयाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत…
- ठळक मुद्दे :-
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजन म्हणजे काय?
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा उद्देश काय?
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची थोडक्यात माहिती
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे महत्त्वाचे मुद्दे
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ
- ऑफलाइन करता येतो अर्ज ?
- ऑनलाइनही करता येतो अर्ज ?प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना साठी पात्रता
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत मिळणारी रक्कम
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये संशोधन
- अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना साठी राज्याचा टोल फ्री नंबर कसा पहावा
- या योजनेचा कसा भरावा हप्ता
- प्रीमियम रकमेचे विभाजन
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे खाते कधी होईल बंद ?
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या लाभार्थ्याची यादी कशी पहावी ?
- FAQ’S
what is PM Suraksha Bima Yojana प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजन म्हणजे काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ मे २०१५ ला पीएम सुरक्षा विमा योजनेची PM Suraksha Bima Yojana सुरूवात केली होती. या योजनेत माफक प्रिमियम भरून लाभार्थी होता येते. विमाधारकाचा अपघात झाल्यास या योजने मार्फत आर्थिक मदत मिळते. विमाधारक अपघात जखमी होणे, अपंग होणे किंवा अपघातात विमाधारकाचा मृत्यू झाल्यासही विमा रक्कम मिळते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा PMSBY लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. तुमच्या या बँक खात्यातून एक निश्चित रक्कम प्रिमियम स्वरूपात काटली जाते. या योजनेअंतर्गत १८ ते ७० वर्षांपर्यतच्या व्यक्तीचा विमा काढला जावू शकतो. मात्र ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीला या योजनेअंतर्गत विमा काढता येत नाही. तो व्यक्ती या योजनेसाठी पात्र नाही.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा PMSBY उद्देश काय?
एखादा अपघात झाल्यानंतर सर्व सामान्य कुटुंबाकडे उपचारासाठी पैसा नसतो आणि कुटुंब प्रमुखाचा अपघातात मृत्यू झाल्यास घर चालवण्यासाठी आर्थिक अडचणीचा सामना त्यांना करावा लागतो. ही समस्या पाहता केंद्र सरकारने पीएम सुरक्षा विमा योजनाची PM Suraksha Vima Yojanaसुरूवात केली आहे. यात एक लाखांपासून दोन लाख रूपयांपर्यंत विमा संरक्षण देण्यात येते. मात्र यासाठी तुमच्या बँक खात्यामध्ये ऑटो डेबिट सुविधा सुरू असणे आवश्यक आहे. तुमच्या बॅक खात्यातून प्रिमियमची रक्कम १ जून पूर्वी कापून घेतली जाते.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना |
केव्हा सुरू झाली | 8 मे 2015 |
कोणी सुरु केली | पंतप्रधान नरेंद्र मोदी |
लाभार्थी कोण | भारतातील नागरिक |
योजनेचा उद्देश | गरीब कुंटुंबांना विमा संरक्षण देणे |
विमा संरक्षण | 1 लाख ते 2 लाखापर्यंत |
अधिकृत वेबसाईट | https://www.jansuraksh.gov.in |
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे महत्त्वाचे मुद्दे
गरिबांसाठी हा सर्वात स्वस्त असा प्रीमियम हप्ता आहे यामुळे प्रत्येक कुटुंबाला विमा काढता येतो आणि एकही कुटुंब यापासून वंचित राहत नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला कमीत कमी बारा रुपयाचा प्रीमियम हप्ता भरावा लागतो ही रक्कम खातेधारकाच्या खात्यातून एक जून पूर्वीच कापून घेण्यात येते एक जूनला जर लाभार्थ्याचे खाते खात्यात ऑटो डेबिट ही सुविधा सुरू नसेल तर पहिले लाभार्थीने आपल्या बँकेत जाऊन ही सेवा सुरू करून घ्यावी त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल गरीब कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा एखाद्या अपघातात मृत्यू झाल्यास परिवाराच्या अन्य सदस्य समोर आर्थिक संकट उभे राहते अशा परिस्थितीत गरिबांना मदत होण्यासाठी पीएम सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली आहे समजा कोणत्या कारणामुळे परिवारातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास त्याच्या परिवाराला विम्याची पूर्ण रक्कम दिली जाते
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ PM Suraksha Bima Yojana 2024
देशभरातील गरिबांना डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सुरक्षा वीमा PM Suraksha Bima Yojana योजना सुरू केलेली आहे या योजनेत देशातील मागास आणि गरीब वर्गातील लोकांचा समावेश करण्यात आला आहे पीएम सुरक्षा विमा योजना अंतर्गत कोणाचा एक्सीडेंट झाल्यास आणि त्याला अपंगत्व आले असल्यास त्याला एक लाख रुपयाची रक्कम मदत म्हणून दिली जाते लाभार्थ्याचा रस्त्यात अपघात किंवा अन्य एखाद्या दुर्घटनेत मृत्यू झाल्या असल्यास नो मनी अथवा मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला कुटुंबातील सदस्याला या योजनेअंतर्गत 2 लाख रुपये दिले जातात.
- पंतप्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना प्रथम एका वर्षासाठी सुरू करण्यात येते तिला प्रत्येक वर्षी नूतनीकरण करावे लागते यासाठी विमाधारकाला केवळ बारा रुपये चे प्रीमियम म्हणून वर्षाला एकदा करावी लागतात त्यानंतर तो लाभार्थी बनतो या योजनेअंतर्गत केवळ तेव्हाच लाभ मिळतो जेव्हा विमाधारक इतर विमा कंपन्यांचे लाभ घेत नसेल.
- या योजनेअंतर्गत केवळ 18 ते 70 या वयोगटातील व्यक्तींनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
- सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या माध्यमातून विमा काढण्यात येतो.
- विमाधारकाचे एक पेक्षा अधिक खाते असतील तर अशावेळी त्याला केवळ एकाच बचत खात्या अंतर्गत विम्याचा लाभ दिला जातो प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजने मध्ये विमा संरक्षणाचा कालावधी एक जून ते 31 मे असा ठेवण्यात आला आहे.
- वार्षिक प्रीमियम भरल्यानंतरच या योजनेचा लाभ देण्यात येतो जर एखाद्या वेळेस काही कारणामुळे प्रीमियम भरता आला नसेल तर भविष्यामध्ये प्रीमियम पुन्हा भरून या योजनेचा लाभ सुरू केला जाऊ शकतो.
ऑफलाइन करता येतो अर्ज ?
आर्थिक दृष्ट्या गरीब असलेला कोणताही व्यक्ती प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ बँक के च्या कोणत्याही शाखेत जाऊन घेऊ शकतो तेथे त्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे
ऑनलाइनही करता येतो अर्ज ?
प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना साठी लाभार्थ्याला या योजनेच्या अधिकृत साइटवर जाऊनही आपले विभाग संरक्षण कवच घेता येते यासाठी https ://jansuraksh.gov.in वर भेट देऊनही तुम्ही अर्ज करू शकता.
सर्वात प्रथम होम पेजवर जा तिथे फॉर्मवर क्लिक करा क्लिक करताच तुमच्यासमोर तीन पर्याय असतील पहिला पर्याय प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना दुसरा पर्याय प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना PMSBY आणि तिसरा पर्याय अटल पेन्शन योजना यातील प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना या विकल्पावर क्लिक करा यानंतर तुमच्यासमोर एप्लीकेशन फॉर्म हा विकल्प येईल त्यावर तुम्ही क्लिक करा त्यानंतर आपली भाषा निवडा त्यानंतर तुमच्यासमोर एक पीडीएफ (PDF) फॉर्म दिसेल तो फॉर्म डाऊनलोड करून त्यात विचारलेल्या सर्व प्रश्नांची माहिती चांगल्या पद्धतीने भरा त्यात तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार कार्ड नंबर, आदीची माहिती अचूक पद्धतीने भरावी
त्यानंतर आवश्यक कागदपत्रे झेरॉक्स स्वरूपात या फॉर्म सोबत जोडावेत त्यानंतर ज्या बँकेत तुमचे खाते आहे तेथे जाऊन हा फॉर्म जमा करावा त्यानंतर तुमचा अर्ज पूर्ण होईल.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना साठी पात्रता
- लाभार्थी हा भारताचा नागरिक असावा.
- मागास आणि गरीब वर्गातील लवकर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना चा लाभ घेऊ शकतात.
- अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे यासोबतच बँक खाते मध्ये ऑटो डेबिट ही सुविधा सुरू असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्ष या दरम्यानच असावे.
- अर्जदाराचे बँक खाते बंद झाले तर विमा पॉलिसी ही त्यासोबत बंद होते.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे documents of PM Suraksha Bima Yojana
- आधार कार्ड
- निवडणूक कार्ड रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन अन्य ओळखपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- बँकेचे पासबुक
- वयाचा पुरावा असलेले कागदपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर आदी
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत मिळणारी रक्कम
विमा धारकाची स्थिती– रक्कम
- अपघातात मृत्यू झाल्यास— दोन लाख रुपये
- अपघातात दोन्ही हात किंवा दोन्ही पाय किंवा एक हात एक पाय निकामी झाल्यास किंवा एक डोळा ची दृष्टी पूर्णपणे गेल्याच्या स्थितीमध्ये या किंवा पूर्ण डोळे बरे न झाल्यास— दोन लाख रुपये
- एक हात एक पाय गमावल्यास किंवा एक डोळा ची दृष्टी गेल्यास आणि परत यायचे स्थितीमध्ये– एक लाख रुपये
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये संशोधन
केंद्र सरकारने आता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना PM Suraksha Vima Yojana चा प्रीमियम रकमेमध्ये वाढ केली असून आता वर्षाला वीस रुपये द्यावे लागतात यापूर्वी 12 रुपये प्रति वर्ष प्रीमियम हप्ता भरावा लागत होता
अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी
आपण केलेल्या अर्जाची स्थिती या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासू शकता त्यासाठी तुम्हाला https ://jansuraksh.gov.in वर जावं लागेल
होम पेजवर गेल्यावर अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी विकल्प पर्याय निवडावा त्यानंतर एक नवीन लिंक सुरू होईल त्यावर आपला एप्लीकेशन नंबर टाकून सर्च बटनावर क्लिक करावे त्यानंतर अर्जाची सध्या काय स्थिती आहे हे तुमच्यासमोर डिस्प्ले होईल.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना साठी राज्याचा टोल फ्री नंबर कसा पहावा
तुम्ही आपल्या घरी बसूनही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना चे आपल्या राज्यातील टोल फ्री नंबर काढू शकता त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत साइटवर जावे लागेल होम पेजवर कॉन्टॅक्टस या पर्यायाची निवड करावी लागेल त्यानंतर तुमच्यासमोर विविध राज्यातील टोल फ्री क्रमांक येतील त्यातील अचूक आपल्या राज्याचा टोल फ्री क्रमांक काढून घेऊ शकता आणि त्यावर फोन करून तुम्हाला प्रश्न पडलेल्या प्रश्नांची उत्तरेही मिळू शकतात.
या योजनेचा कसा भरावा हप्ता
सर्वात प्रथम या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे कुठल्याही बँकेत खाते असणे आवश्यक आहे तसेच त्या खात्याची ऑटो डेबिट ही सुविधा सुरू असायला हवी ही सुविधा बँकेद्वारे सुरू केली जाते विमा काढलेल्या व्यक्तीच्या खात्यामधून प्रत्येक वर्षी विमा प्रीमियम म्हणून बारा रुपये काढले जातात ही प्रीमियम रक्कम एक जून च्या पूर्वी कापली जाते मात्र एक जूनला तुमच्या बँक खाते मध्ये ऑटो डेबिट ही सुविधा सुरू नसेल तरीपण ही सुविधा सुरू केली जाईल जेव्हा प्रीमियम रक्कम भरणे सुरू होईल
प्रीमियम रकमेचे विभाजन
प्रीमियम विभाजनाचे प्रकार — प्रीमियम रक्कम
विमा कंपनीला दिला जाणारी प्रीमियम रक्कम-10 रुपये
सूक्ष्म कॉर्पोरेट बीसी एजंट ला दिली जाणारी रक्कम-1 रुपया
बँकेला परिचारक खर्चासाठी —एक रुपया
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे खाते कधी होईल बंद ?
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना PM Suraksha Vima Yojana चा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे वय 18 ते 70 या दरम्यान असायला हवे ज्यावेळी व्यक्तीचे वय 70 पेक्षा अधिक होते त्यावेळी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही बंद करण्यात येते
जर तुमच्या बँक खात्यात अनेक वर्षापासून प्रीमियम कापून घेण्यासाठी रक्कमच नसेल अशावेळी ही तुमची ही योजना बंद केली जाते प्रीमियमच्या वेळी अपर्याप्त रक्कम बँक खाते मे खात्यात असेल तर ही सेवा बंद केली जाते या योजनेचा लाभ केवळ एकाच बचत गटासाठी घेता येतो जर विमाधारकाने एक पेक्षा अधिक बँक खात्यामध्ये विमा मिळवण्यासाठी नोंदणी केली असेल तर ही माहिती मिळताच सर्व प्रीमियम जप्त केला जाऊ शकतो आणि विमा कव्हरही समाप्त केले जाईल
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या लाभार्थ्याची यादी कशी पहावी ?
या योजनेच्या लाभार्थ्याची यादी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता त्यासाठी साईटच्या होम पेजवर जा लाभार्थी सूची ला क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज असेल त्यावर राज्य जिल्हा ब्लॉक निवडा त्यानंतर त्या परिसरातील प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेत असलेल्या व्यक्तींची यादी तुमच्यासमोर असेल या यादीत तुम्ही तुमचे नाव शोधू शकता.
FAQ’S
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विचारली जाणारी काही प्रश्न
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजे काय ?
- या योजनेअंतर्गत तुम्हाला अपघात विमा कव्हर दिल्या जाते त्यामुळे एखाद्या वेळी जर अपघात झाला तर आर्थिक अडचणीमुळे उपचारास कुठल्याही व्यक्ती येऊ नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी कोण आहे पात्र ?
- आर्थिक दृष्ट्या मागास आणि गरीब वर्ग या योजनेसाठी पात्र आहे.
- या योजनेचा कोणाला घेता येतो लाभ ?
- वयवर्ष 18 ते 70 या वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो तसेच त्या व्यक्तीचे कुठल्याही बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- किती येतो खर्च प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना चे कवच घेण्यासाठी ?
- तुम्हाला केवळ बारा रुपये प्रति वर्ष एवढा माफक खर्च येतो आता या खर्चामध्ये काही प्रमाणात वाढ होऊन ती वीस रुपये प्रति वर्ष विमा दिला जातो.
- या योजनेसाठी कसा करावा अर्ज ?
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँक खाते असलेल्या बँकेत जाऊन अर्ज भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता तसेच ऑनलाइन पद्धतीनेही या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊनही तुम्ही तुमचा अर्ज भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता