PM SVANidhi Yojana in marathi हमीशिवाय मिळते आधार कार्डवर 50 हजारांचे कर्ज

PM SVANidhi Yojana 2024 information : पीएम स्वनिधी योजना 2024 मराठी माहिती

PM SVANidhi Yojana देशातील गरीब आणि गरजू कुटुंबासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना सतत राबवत असते. PM SVANidhi Yojana  पंतप्रधान स्वनिधी योजनेचे पूर्ण नाव : PM Street Vendor’s AtmaNirbhar Nidhi Scheme पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना म्हणजेच पंतप्रधान मार्ग विक्रेत्याची आत्मनिर्भर निधी योजना आहे.

पीएम स्वनिधी योजना म्हणजे काय?

What is PM SVANidhi Yojana

PM SVANidhi loan Yojana केंद्र सरकार गरजू लोकांना पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून आधार कार्डच्या आधारे ५० हजारांचे कर्ज उपलब्ध करून देत आहे. या योजनेअंतर्गत सरकार त्यांना आर्थिक मदत करण्याचे काम करते. अशाच प्रकारची एक योजना मोदी सरकारने कोरोना संकटाच्या काळात सुरू केली होती. आता ही योजना खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत गरजूंना ५० हजार रूपयांचे कर्ज कोणत्याही हमी शिवाय दिले जाते. ही योजना ज्यांना छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी आहे. पंतप्रधान स्वनिधी योजना Pradhanmantri SVANidhi Yojana असे या योजनेचे नाव ठेवण्यात आले आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जून 2020 रोजी सुरू केली. या योजनेचा छोट्या व्यवसायीकांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे.

PM SVANidhi Yojana विशेष करून ही योजना रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी आहे. कारण कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात छोट्या व्यवसायीकांची हानी झाली होती. अशा लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने पीएम स्वनिधी योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेचे यश आणि लोकप्रिय झाल्याने सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवली आहे. जर तुम्हाला रोजगारासाठी एखादा छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकार कोणत्याही हमी शिवाय तुम्हाला पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देत आहे. या योजनेद्वारे रस्त्यावर छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांना कर्ज मिळते. याबरोबरच सरकार रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देत आहे. यात भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि फास्ट फूडची छोटी दुकाने चालवणाऱ्यांचा समावेश असून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

PM SVANidhi Yojana

केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या PM SVANidhi Yojana माध्यमातून ५० हजारांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. मात्र तुम्हाला ५० हजारांचे कर्ज घेण्यासाठी प्रथम विश्वासार्हता निर्माण करावी लागते. त्यानंतर तुम्हाला ५० हजारांचे कर्ज मिळते. विश्वासार्हता म्हणजे या योजनेअंतर्गत कोणालाही कर्ज घेताना सुरुवातीला १० हजार रूपायांचे कर्ज दिले जाते. पहिल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर तुम्हाला दुप्पट रक्कम दुसऱ्यांदा कर्ज म्हणून बँकेकडून दिली जाते.

ठळक मुद्दे :

पीएम स्वनिधी योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची थोडक्यात माहिती

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा उद्देश काय

60 लाख लाभार्थ्यांना 10 हजार 544 कोटी रुपये जारी

पीएम स्वनिधी योजना 2024 वैशिष्ट्ये

प्रधानमंत्री स्वनिधी योजना साठीची पात्रता

असे मिळवा ५० हजारांचे कर्ज

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे?

छोटे- मोठे व्यवसायिक योजनेसाठी पात्र

कोणत्याही हमीशिवाय मिळते कर्ज

प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2024 साठी अर्ज कसा करावा

FAQ’s

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची थोडक्यात माहिती

PM SVANidhi Yojana in short

योजनेचे नावप्रधानमंत्री स्वनिधी योजना
कोणी सुरू केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी
कधी सुरू झाली1 जून 2020
लाभार्थी कोणछोटे आणि मध्यम व्यवसायिक
उद्देश कायकुठल्याही हमी शिवाय 50 हजारापर्यंत लोन देणे
कर्ज रक्कम10,000 ते 50,000
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://pmsvanidhi.mohua.gov.in

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा उद्देश काय

Purpose of PM SVANidhi Yojana

केंद्र सरकार द्वारे प्रधानमंत्री स्वनिधी योजना PM Svanidhi Yojana सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे लहान आणि मध्यम व्यवसायिकांना कुठल्याही हमीशिवाय कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या लोकांना आपला व्यवसाय पुढे वाढवण्यासाठी स्वनिधी योजने द्वारे मदत केली जात आहे, त्यांना कुठल्याही हमीशिवाय 10 हजारापासून 50 हजारापर्यंत लोन दिले जात आहे. यासाठी त्यांना काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही.

कर्जावर सात टक्के सबसिडी

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत PM Svanidhi Yojana केंद्र सरकारने दिलेल्या कर्जाच्या लागलेल्या व्याजावर सात टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. या सबसिडीचा लाभ वेळेआधी कर्ज परत करणारा मिळतो. याव्यतिरिक्त व्यवसायिक डिजिटल पेमेंट वापरत असतील तर त्यांना कॅशबॅकही दिला जातो. हा कॅशबॅक २५ रुपये पेक्षा अधिक व्यवहार करणारा मिळतो. हा कॅशबॅक एक महिन्यात शंभर रुपये पर्यंत दिला जातो.

PM SVANidhi Yojana

60 लाख लाभार्थ्यांना 10 हजार 544 कोटी रुपये जारी

केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री स्वनिधी योजना PM Svanidhi Yojana अंतर्गत लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत या अंतर्गत साठ लाख लोकांना या योजनेचा लाभ दिला देण्यात आला आहे. त्यासाठी सरकार द्वारे या लाभार्थीना 10 हजार 544 कोटी रुपये कर्ज दिले आहे. या योजनेअंतर्गत स्वयंरोजगाराला प्रोत्साहन करण्यासाठी तसेच गरीब आणि गरजूंना रोजगार व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे.

पीएम स्वनिधी योजना 2024 वैशिष्ट्ये

Features of PM SVANidhi Yojana

या योजनेअंतर्गत छोटे आणि मध्यम व्यापारी कुठल्याही हमीशिवाय कर्ज घेऊ शकतात.

या व्यवसायिकांना 10 ते 50 हजार रुपयापर्यंत कर्ज दिले जाते.

प्रथम 10 हजार रुपयाचे लोन दिले जाते त्याची परतफेड केल्यानंतर 20 हजार रुपये तर तिसऱ्या वेळेस 50 हजार रुपये कर्ज दिले जाते.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना PM Svanidhi Yojana अंतर्गत दिलेले कर्ज बारा महिन्याच्या आत म्हणजेच वर्षभराच्या आत परतफेड करणे आवश्यक आहे.

वेळेपूर्वी कर्जाची परतफेड करणाऱ्या व्यवसायाला सात टक्के सबसिडी चा लाभ दिला जातो.

याव्यतिरिक्त सरकार या योजनेअंतर्गत डिजिटल पेमेंट पेमेंट करणाऱ्याला कॅशबॅक देखील देते.

लाभार्थ्याला पंचवीस रुपये ते शंभर रुपयापर्यंत कॅशबॅक मिळतो.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी PM Svanidhi Yojana ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही अर्ज करू शकता आणि कर्ज मिळवू शकतात.

छोट्या आणि मध्यम व्यवसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढण्यासाठी या योजनेअंतर्गत मदत केली जात आहे.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनासाठीची पात्रता

Eligibility of PM Svanidhi Yojana

पीएम स्वनिधी योजनेचा pradhanmantri SVANidhi Yojana लाभ घेण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.

देशातील गरीब आणि गरजू गरजवंत लोक अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.

कोरोना काळात ज्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

लहान आणि मध्यम व्यवसायिकाबरोबरच रस्त्यावर भाजीपाला विकणारे फळ विकणारे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता.

कर्जाची परतफेड लाभार्थी एकरकमी किंवा हप्त्याने या दोन्ही स्वरूपात करू शकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही ग्यारंटीची आवश्यकता नाही.

PM SVANidhi Yojana

असे मिळवा ५० हजारांचे कर्ज

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा PM Svanidhi Yojana लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल. आणि बँकेला लागणारी आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील. अर्ज जमा करताना अर्ज आणि कागदपत्रे एकत्र जमा करावे लागतील. यानंतर तुमच्या अर्ज आणि कागदपत्राची तपासणी होईल. यातील सर्व माहिती अचूक असल्यास तुम्हाला कर्ज दिले जाईल.

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

पीएम सूर्य घर योजना

आभा कार्ड योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे?

Documents of PM Svanidhi Yojana

आधार कार्ड

ओळखपत्र

अर्जदार सध्या करत असलेल्या कामाची माहिती

पॅन कार्ड

शिधापत्रिका

पासपोर्ट आकाराचा फोटो

बँकेत बचत खाते असणे गरजे आहे

उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे

या कर्जासाठी कोणतीही हमीची गरज नाही

छोटे- मोठे व्यवसायिक योजनेसाठी पात्र

देशभरातील लहान आणि मध्यम व्यवसायीकांना केंद्र सरकारने केवळ आधार कार्डच्या आधारे 50 हजारांचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली आहे.

स्वनिधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार 50 हजारांचे कर्ज देते.

मात्र ५० हजार रूपयांचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला प्रथम विश्वासार्हता निर्माण करावी लागते.

या योजनेद्वारे कोणालाही प्रथम 10 हजारांचे कर्ज दिले जाते

पहिल्यांदा कर्जाची परतफेड केल्यास दुप्पट रक्कम दुसऱ्यांदा कर्ज देताना दिली जाते.

कोणत्याही हमीशिवाय मिळते कर्ज

PM SVANidhi loan Yojana केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत PM Svanidhi Yojana छोट्या व मध्यम व्यवसायीकांना कोणत्याही हमीशिवाय कर्ज देण्यात येते. तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कत तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. रस्त्यावरील विक्रेत्यांनी कॅश-बॅकसह डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेच्या बजेटमध्ये वाढ करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत घेतलेले कर्ज तुम्हाला एका वर्षांच्या कालावधीत परत करावे लागते. तुम्ही दरमहा कर्जाचा हप्ता भरूनही ही रक्कम परत करू शकतो. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या योजनेद्वारे कर्ज घेण्यासाठी तुम्ही जवळच्या सरकारी बँकेत कर्जासाठी अर्ज करून कर्ज घेऊ शकता.

PM SVANidhi Yojana

प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2024 साठी अर्ज कसा करावा

PM SVANidhi Yojana Online Apply

तुम्हालाही प्रधानमंत्री स्वनिधी योजना PM Svanidhi Yojana अंतर्गत कर्ज हवे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया वाचून अर्ज करू शकता.

सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या PM Svanidhi Yojana अधिकृत वेबसाइटला pmsvanidhi.mohua.gov.in  भेट द्यावी लागेल.

या लिंक वर क्लिक करताच तुमच्यासमोर एक होमपेज उघडेल.

या होमपेज वर apply loan 10k/ apply loan 20k/ apply loan 50k या पैकी तुम्ही नियमानुसार कोणत्या कर्ज रक्कमसाठी पात्र आहात यावर क्लिक करा.

त्यानंतर तुमचं मोबाइल नंबर टाका. त्यावर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाका.

ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या समोर पीएम स्वनिधी योजनेचा PM Svanidhi Yojana फॉर्म उघडेल.

त्या फॉर्मची प्रिंट काढून घ्या.

तो फॉर्म काळजीपूर्वक भरा. आणि आवश्यक कागदपत्रे उपलोड करा.

केंद्र शासनाने जी स्वनिधी केंद्र उघडले आहेत तिथे हा फॉर्म कागदपत्रांसाहित जमा करा.

त्या नंतर फॉर्मची पडताळणी केल्यानंतर पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत PM SVANidhi Yojana कर्ज रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.

आशा पद्धतीने तुम्ही ऑनलाइन पंढहतीने अर्ज करून पीएम स्वनिधी योजनेचा PM SVANidhi Yojana लाभ घेऊ शकता.

किंवा खालील पद्धतीने देखील तुम्ही प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा PM SVANidhi Yojana अर्ज करू शकता.

सर्वात प्रथम तुम्हाला जवळच्या सरकारी बँकेत जावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज प्राप्त करावा लागेल.

त्यानंतर अर्जावर विचारण्यात आलेली माहिती अचूक पद्धतीने भरावा लागेल.

सर्व माहिती भरल्यानंतर मागितलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत जोडावे लागतील.

अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला कुठल्या व्यवसायासाठी लोन घ्यायचे आहे हे सांगावे लागेल.

बँकेकडून तुमची कागदपत्रे तपासणी जातील.

कागदपत्राची तपासणी झाल्यानंतर तुम्हाला कर्ज दिले जाईल.

FAQ’s

प्रधानमंत्री स्वनिधी योजना svanidhi yojana कोणासाठी सुरू केली आहे?

लहान आणि मध्यम व्व्यवसायिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. याची व्याप्ती वाढवत आता भाजी विक्रेता, फळे विकणारे आणि फास्ट फूड ची लहान दुकान चालवणारे व्यवसायिकांनाही या योजनेअंतर्गत लोन दिले जाणार आहे.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना svanidhi yojana अंतर्गत किती मिळते कर्ज?

प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत विना हमीशिवाय 10 हजार ते 50 हजार रुपये पर्यंत कर्ज दिले जाते.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना svanidhi yojana अंतर्गत लाभार्थ्याला किती रुपयाची सबसिडी मिळते?

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत लाभार्थ्याला वेळेपूर्वी कर्ज परतफेड केल्यास सात टक्के सबसिडी चा लाभ दिला जातो.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना svanidhi yojana अंतर्गत अर्ज कसा करावा?

प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर जवळचा सरकारी बँक मध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.