PM Vishwakarma Yojana Information In Marathi : पीएम विश्वकर्मा योजना
PM Vishwakarma Yojana In Marathi : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाला 2 वर्ष पूर्ण झाल्यावर सरकारने अपडेट दिली आहे. या योजनेमध्ये जवळपास 30 लाख कारागीर आणि शिल्पकारांनी नोंदणी केलेली आहे. यातील 26 लाख लोकांनी प्रशिक्षण घेतले आहे.
41 हजार 188 कोटी रुपये च्या 4.7 लाख कर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत. सर्वाधिक नोंदणी राज मिस्त्री असणाऱ्यांनी केले आहेत.
PM Vishwakarma Yojana कारागिरांना आधुनिक उपकरण उपलब्ध करण्यासाठी 23 लाख पेक्षा अधिक इ-वाउचर जारी करण्यात आले आहेत.
PM Vishwakarma Yojana केंद्र सरकारने देशातील शिल्पकार आणि कलाकारांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या योजनेच्या माध्यमातून कारागिरांना खूप मदत होत आहे.
त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या योजनेचा लाभ ते घेत आहेत
pm Vishwakarma yojana 30 lakh artisans registered सरकारच्या माहितीनुसार या योजनेमध्ये सर्वाधिक नोंदणी राज, मिस्त्री असलेल्या लोकांनी केलेली आहे. यातून दिसून येते की, जुने पारंपरिक व्यवसाय ही आज पण मोठ्या संख्येने लोकांमध्ये रोजी रोटी साठी आजही साधन आहेत.
या योजनेचा मुख्य उद्देश केवळ नोंदणी करणे एवढाच नाही तर कारागिरांना आधुनिक उपकरण उपलब्ध करून देणे हा आहे. यासाठी 23 लाख पेक्षा अधिक ई-वाउचर टूलकिट प्रोत्साहन म्हणून देण्यात आली आहेत.
या वाउचर द्वारे कारागीर नवीन अवजारे खरेदी करू शकतात आणि आपले काम अधिक चांगले आणि सोपे करू शकतात.
pm Vishwakarma yojana 30 lakh artisans registered प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची सुरुवात 17 सप्टेंबर 2023 ला विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेसाठी वार्षिक 13000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
जी आर्थिक वर्ष 2023-24 ते 2027-28 पर्यंत लागू आहे. सरकारने या योजनेला एक परिवर्तन कार्य योजना म्हटले आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे पारंपारिक कारागीर आणि शिल्पकारांना त्यांच्या संबंधित व्यवसायासाठी संपूर्णपणे प्रोत्साहन करून आर्थिक पाठबळ देणे हा आहे.
केंद्र सरकारची ही योजना ग्रामीण आणि शहरी क्षेत्रामध्ये शिल्पकला ला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे. याबरोबर महिला सशक्तिकरण आणि वंचित अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्ग, दिवाण यांना मदत करणे हा पण आहे. जेणेकरून ते स्वतःची कला लोकांपर्यंत पोहोचवून त्यातून आर्थिक कमी करू शकते.