post office popular small savings schemes in marathi : या 5 योजनेत मिळते 7% पेक्षा अधिक व्याज
post office popular small savings schemes in marathi : पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. येथे कुठल्याही प्रकारची जोखीम नाही. जर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडता तर तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच 5 योजना बद्दल माहिती पाहणार आहोत याद्वारे तुम्हाला मोठा परतावा मिळतो. कुठल्या आहेत अशा पोस्टच्या योजना जाणून घेऊ
post office popular small savings schemes आज प्रत्येकाला गुंतवणुकीचे महत्त्व कळाले आहे. याच कारणामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या गरजेनुसार व्यक्ती गुंतवणूक करत आहेत. जर तुम्हालाही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवायचा असेल तर पोस्ट ऑफिसच्या या योजना चांगल्या ठरू शकतात. इथे कुठलीही प्रकारची जोखीम नाही. गॅरंटीसह परतावा मिळतो. ज्यांना चांगला परतावा हवा आहे त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसच्या या योजना वरदान ठरतात. post office popular small savings schemes monthly income scheme good return
पोस्ट ऑफिस मंथली इनकम योजना
post office popular small savings schemes monthly income scheme good return
post office monthly income scheme जर तुम्हालाही रेगुलर इन्कम पाहिजे असेल तर पोस्ट ऑफिस ची मंथली इनकम स्कीम तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला 7.4% व्याज दिले जाते. या योजनेमध्ये तुम्ही सिंगल अकाउंट मध्ये अधिक तर 9 लाख रुपये आणि जॉईंट अकाउंट मध्ये 15 लाख पर्यंत गुंतवणूक करू शकतात.
पब्लिक प्रायव्हेट फंड
Public Private Fund
पब्लिक प्रायव्हेट फंड PPF मध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला 500 रुपये ते 1.5 लाख रुपये पर्यंत वर्षाला गुंतवणूक करता येते. सध्या PPF वर 7.10% व्याज दिले जात आहे. याचा कार्यकाळ 15 वर्षाचा आहे. यामध्ये इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन 80c नुसार टॅक्स मध्येही फायदा मिळतो.
सुकन्या समृद्धी योजना
Sukanya Samriddhi Yojana
जर तुम्ही आपल्या मुलीचे भविष्य उज्वल करण्यासाठी गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी सुकन्या समृद्धी योजना हाच सर्वात चांगला पर्याय आहे. ही योजना विशेष करून मुलींसाठी बनवण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. याद्वारे मुलीचे शिक्षण, लग्नाचा खर्च करण्यासाठी पूर्ण मदत केली जाते.
या योजनेमध्ये वर्षाला कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. या योजनेअंतर्गत 8.20% व्याजदर दिले जाते. या योजनेअंतर्गतही 80c अंतर्गत तुम्हाला टॅक्स सूट मिळते. हा एक लॉन्ग टर्म सेविंग पर्याय आहे. यामुळे मुलीचे उच्च शिक्षण आणि लग्नासारखे मोठे खर्च सहज पूर्ण केले जाऊ शकतात.
टाईम डिपॉझिट TD
पोस्ट ऑफिस ची टाईम डिपॉझिट योजना अंतर्गत गुंतवणूक तुम्हाला करता येते. या योजनेअंतर्गत 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षापर्यंत पैसे जमा केले जाऊ शकतात. 1 वर्षाच्या गुंतवणुकीसाठी 6.9% व्याज दिले जाते, तर 2 आणि 3 वर्षासाठी गुंतवणूक केल्यावर 7% टक्के व्याजदर दिले जाते, तर 5 वर्षासाठी पोस्ट ऑफिस ची या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.5% व्याजदर दिले जाते.
या योजनेमध्ये किती रक्कम गुंतवणूक करावी यावर कुठलीही मर्यादा नाही. नियमित तुम्ही 1000 रुपये जमा करू शकता. पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षाच्या FD वर आयकर अधिनियम कलम 80c अंतर्गत टॅक्स सूट मिळत
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट
National Seving Certificate
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट भारत सरकारची एक योजना आहे. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट एक फिक्स इन्कम इन्वेस्टमेंट स्कीम आहे. कुठलाही भारतीय नागरिक कुठल्याही पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनेचा लाभ घेऊ शकतो. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ही महत्त्वाची योजना आहे. या योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे या योजनेमध्ये तुम्ही केवळ 1000 रुपये पासून गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला 7.7% परतावा दिला जातो.
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट मध्ये रिटर्न
जर तुम्ही नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये 5 लाख रुपये गुंतवणूक केली असेल तर मॅच्युरिटी म्हणजे 5 वर्षानंतर तुम्हाला एकूण 7 लाख 24 हजार 517 रुपये मिळतील. अशा स्थितीमध्ये तुम्हाला एकूण 2 लाख 24 हजार 517 रुपये (रिटर्न) परतावा मिळेल.