Post Office scheme 2025 information in marathi : पती-पत्नीसाठी जबरदस्त आहे पोस्ट ऑफिसची ही योजना
Post Office scheme सध्या या पोस्ट ऑफिसच्या योजनेवर 7.7% व्याज दिले जाते. या योजनेत गुंतवलेली रक्कम 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच परत मिळते. 5 वर्षात तुम्हाला परतावा म्हणून 13 लाख रुपये मिळणार आहेत.
Post Office scheme is great for husband and wife make 13 lakh rupees in 5 years चला तर मग जाणून घेऊया पोस्ट ऑफिसची अशी कुठलीही भन्नाट योजना आहे की ज्याद्वारे 5 वर्षात तुम्हाला 13 लाख परतावा मिळू शकतो.
जर तुम्हालाही कुठल्याही धोक्याविना पैसा वाढवायचा आहे तर पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (एनएससी) ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. ही योजना सरकारची गॅरंटी असलेली योजना आहे. जी 5 वर्षांमध्ये मॅच्युअर होते.
जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही एनएससी योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता आणि चांगला व्याजदर मिळवून, चांगला परतावा मिळू शकतात. यामध्ये रिटर्न फिक्स मिळतो आणि तुमचे पैसे संपूर्णपणे सुरक्षित राहतात.
यासाठी तुम्ही केवळ तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जाऊन केवायसी आणि आवश्यक कागदपत्रे जमा करून नवीन खाते उघडू शकता.
कोण करू शकतो यामध्ये गुंतवणूक?
Post Office scheme is great for husband and wife make 13 lakh rupees in 5 years
या योजनेअंतर्गत कुठलाही व्यक्ती या योजनेचा गुंतवणूक करू शकते. तुम्ही तुमचे वैयक्तिक किंवा जॉइंट अकाउंट पण उघडू शकता. यामध्ये जास्तीत जास्त तीन जणांचा समावेश करता येतो. 10 वर्षापेक्षा अधिक वय असणारे मुलंही म्हणजेच मुलांच्या नावेही तुम्हाला अकाउंट उघडता येते.
जर मुलगा छोटा आहे किंवा एखादा व्यक्ती मानसिक अस्वस्थ आहे तर त्याचे नातेवाईक त्याच्या नावाने खाते उघडू शकतात. तुम्ही कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला नॉमिनी बनवू शकता. या योजनेत तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे खाते उघडू शकता.
कमीत- कमी 1 हजार रुपये गुंतवणे आवश्यक आहेत आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही रक्कम या योजनेअंतर्गत गुंतवू शकता. सर्वात विशेष बाब म्हणजे या योजनेत केलेली गुंतवणूक इन्कम टॅक्स टॅक्स ऍक्ट सेक्शन 80c अंतर्गत टॅक्स मध्ये सूट आहे. यामध्ये तुम्ही वर्षभरामध्ये दीड लाख रुपये पर्यंत टॅक्स फ्री गुंतवणूक करू शकता.
परतावा किती मिळणार?
सध्या या योजनेअंतर्गत वर्षाला 7.7% व्याज दिले जात आहे. यामध्ये बदल होत राहतात. व्याजाची रक्कम 5 वर्षे पूर्ण झाल्यावर मिळते. यापूर्वीच्या चार वर्ष मिळणारे व्याज तुमच्या रकमेमध्ये गुंतवणूक होत राहील, त्यावर टॅक्स सूट मिळत राहील. मात्र पाचव्या वर्षाचे व्याज टॅक्सेबल आहे.
गरज पडल्यास कर्ज घेऊ शकता?
जर कधी पैशाची गरज पडली तर तुम्ही एनएससीला बँक किंवा एनबीएफसी मध्ये गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता. यामुळे तुम्हाला तुमची सेविंग तोडण्याची गरज नाही आणि पैसेही तुम्हाला कर्जाच्या स्वरूपात मिळतील.
मात्र खाते 5 वर्षापर्यंत बंद करता येत नाही. मात्र काही परिस्थितीमध्ये जसे की गुंतवणूकदाराचा मृत्यू किंवा कोर्टाच्या आदेश आल्यास ते खाते बंद करता येते.
पती-पत्नी दोघांसाठीही फायद्याचे?
जर पती-पत्नी दोघेही नोकरी करत आहेत तर ते जॉईंट अकाउंट उघडून या योजनेचा फायदा घेऊ शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही दोघांनी मिळून 9 लाख रुपये गुंतवणूक केली तर पाच वर्षानंतर जवळपास तुम्हाला 13,04,130 रक्कम परत मिळेल. यातील 4,04,130 रक्कम व्याजाच्या स्वरूपात असेल.
एकूण मिळून ही योजना त्या लोकांसाठी आहे ज्यांना कमी धोका पत्करून गॅरंटीने परतावा, सुरक्षित रिटर्न पाहिजे आहे. Post Office पोस्ट ऑफिसची एनएससी योजनात केवळ पैसाचीच वाढ होत नाही तर टॅक्स वाचवण्यासाठी ही खूप महत्त्वाचे काम करते.