Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana in Marathi : गरिबांच्या कल्याणासाठी मिळणार 5 वर्ष मोफत अन्नधान्य

Table of Contents

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana 2024 Information : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 2024 मराठी माहिती

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना गरिबांसाठी मोफत अन्नधान्य पुरवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे. तसेच आत्मनिर्भर भारतचा एक भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत जवळपास 81.35 कोटी लाभार्थ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून पुढील पाच वर्षासाठी मोफत अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय लाभार्थ्यांचे कल्याण लक्षात घेऊन घेण्यात आला आहे आणि गरिबांना धान्य पुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

देशातील एकही व्यक्ती अन्नविना उपाशी पोटी झोपू नये यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली आहे. यामुळे कोट्यवधी लोकांचा खाण्यापिण्याचा प्रश्न सुटला आहे.

आजच्या लेखात आपण प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना म्हणजे काय, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे फायदे, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये तसेच पात्रता काय आहे ही बघणार आहोत, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा कोणाला मिळणार लाभ हीही बघणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजे काय

What is Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana 2024  देशभरात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 2013 च्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत 2020 मध्ये कोविड काळात सुरू करण्यात आलेली ही योजना आहे. यामध्ये पात्र शिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती प्रति महिना पाच किलो मोफत धान्य देण्याचा या योजनेचा उद्देश होता. ह्या योजनेची कालबाह्यता डिसेंबर 2022 ला झाली त्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत हा कालावधी वाढवण्यात आला होता आणि आता मोदी सरकारने पुन्हा एकदा पुढील 5 वर्षासाठी मोफत अन्नधान्य पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारची ही योजना सुरू झाल्यापासून केंद्रीय खरेदी पूल मधून 3.9 लाख अब्ज रुपये खर्चून 1118 लाख मॅट्रिक टन अन्नधान्य चे वाटप करण्यात आले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना PMGKAY 1 जानेवारी 2024 पासून पुढील पाच वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. या पुढील पाच वर्षात मोफत अन्नधान्य वाटप करण्यासाठी सरकारवर 11.80 लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

देशातील 81.35 कोटी लाभार्थ्यांना मिळणार पाच वर्षासाठी मोफत अन्नधान्य

केंद्र सरकारने 1 जानेवारी 2024 पासून पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana अंतर्गत जवळपास 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हा निर्णय ऐतिहासिक असून या योजनेने जगातील सर्वात मोठ्या सामाजिक कल्याण योजना मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील 81.35 कोटी नागरिकांना अन्य आणि पोषण सुरक्षा पुरवणे आहे. पाच वर्ष मोफत अन्नधान्य पुरवण्यासाठी अंदाजे खर्च 11.80 लाख कोटी रुपये केंद्र सरकारला येणार आहे.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana देशातील नागरिकांची मूलभूत गरज म्हणून अन्न आणि पोषण विषयक गरजा पूर्ण करून कार्यक्षम आणि रक्षित कल्याणसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वचनबद्धता या निर्णयातून दिसून येत आहे. देशाच्या अमृतकाळात अशा प्रकारची योजना सुरू करणे हा महत्त्वाकांक्षी निर्णय आहे आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी हा निर्णय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

1 जानेवारी 2024 पासून पुढील 5 वर्षासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana 2024 देशातील नागरिकांना मोफत अन्नधान्य( गहू, तांदूळ आणि भरडधान्य) देण्यात येईल. यामुळे देशातील नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध होईल. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील 5 लाखाहून अधिक रेशन दुकानदारांच्या जाळ्याच्या माध्यमातून मोफत अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे.

ONORC वन नेशन वन रेशन कार्ड (एक देश एक शिधापत्रिका) उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही रेशन दुकानात जाऊन मोफत अन्नधान्य घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे तुम्ही कुठेही राहत असला तरी तुम्हाला संबंधित रेशन दुकानदाराकडे तुमचे कार्ड दाखवून तुम्ही तिथेही रेशन घेऊ शकता. डिजिटल इंडिया अंतर्गत तंत्रज्ञान आधारित सुविधांचा भाग म्हणून स्थलांतरितांना राज्य अंतर्गत आणि आंतरराज्य सुविधा पात्रता मिळून देण्यात येणार असल्याने हा उपक्रम स्थलांतरितांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. देशात एक देश एक शिधापत्रिका या योजनेच्या अंतर्गत मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे.

देशभरातील गरीब नागरिकांना 5 वर्ष मोफत अन्नधान्य देण्यासाठी केंद्र सरकारला 11.80 लाख कोटी रुपयाचा खर्च करावा लागणार आहे. केंद्र सरकार PMGKAY अंतर्गत पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी अंदाजे 11.80 लाख कोटी रुपयाचा खर्च करणार आहे.

पुढील पाच वर्षासाठी मोफत अन्नधान्याची तरतूद राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वचनबद्धता आणि दूरदृष्टी या निर्णयातून दिसून येते. मोफत अन्नधान्य वाटप केल्यामुळे समाजातील गरीब वर्गाला कोणत्याही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही. आणि लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य मिळेल.

देशातील लाभार्थ्यांचे कल्याण लक्षात घेऊन केंद्र सरकारने अन्नधान्याची उपलब्धता, फायदेशीरता आणि सुलभता या दृष्टीने अन्नसुरक्षा मजबूत करण्यासाठी तसेच राज्यामध्ये एक समानता राखण्यासाठी PMGKAY योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षासाठी मोफत अन्नधान्य देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील अन्न आणि पोषण सुरक्षा बळकट करण्यासाठी पंतप्रधानांनी घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय दूरदृष्टी दाखवतो.

ठळक मुद्दे :

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजे काय

देशातील 81.35 कोटी लाभार्थ्यांना मिळणार पाच वर्षासाठी मोफत अन्नधान्य

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची थोडक्यात माहिती

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची उद्दिष्टे

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची वैशिष्ट्ये

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे फायदे

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची पात्रता

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी अंमलबजावणीचे टप्पे

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया

FAQ’s  वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची थोडक्यात माहिती

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana in Short

योजनेचे नावप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची
कोणी सुरू केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी
कधी सुरू केली2020
उद्देशदेशातील नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप करणे
फायदा5 किलो मोफत अन्नधान्य मिळते
कोणाला मिळतो लाभदेशतील सर्व शिधापत्रिकाधारक
अर्ज प्रक्रियाऑफलाइन

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची उद्दिष्टे

Purpose of Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana

PMGKAY देशातील अनेक नागरिक आर्थिक दृष्ट्या मागास असल्यामुळे त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची ही व्यवस्था नसते त्यामुळे देशातील अशा गरीब कुटुंबातील लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात येते.

कोरोनाच्या काळात अनेकांना दोन वेळेचे अन्न मिळणे मुश्किल झाले होते. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने पुढाकार घेत ही योजना सुरू केली आणि त्यांना मोफत अन्नधान्य वाटप केले होते.

उपासमारी कमी करणे: देशातील सर्वात गरीब घटकातील व्यक्तींना मोफत अन्नधान्य पुरवून त्यांची भूक आणि पौष्टिक कमतरता दूर करणे.

गरिबांना आधार : गरिबांना मोफत अन्न दिल्यामुळे त्यांचा अन्नावरील घरगुती खर्च कमी करणे.

अन्नधान्याचा वापर वाढवणे : अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि यातून शेतकऱ्यांचा फायदा करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची वैशिष्ट्ये

Features of Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana

पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत PMGKAY प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना मोफत अन्नधान्य रेशन दुकानाच्या माध्यमातून दिले जाते.

पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील 81.35 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना पाच किलो गहू, तांदूळ दिले जातात. याबरोबच प्रत्येक कुटुंबाला एक किलो हरबरा दाळ, तेल पाकिट दिले जाते.

या योजनेअंतर्गत मोफत गहू-तांदूळ मिळत असल्याने आर्थिक दृष्ट्या दुर्लब घटकातील नागरिकाच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न मिटला आहे.

ही योजना भारत सरकारच्या अर्थमंत्रीद्वारे घोषणा केल्यानुसार तीन महिन्यांसाठी BPL (दारिद्रय रेषेखालील) कुटुंबियांना मोफत सिलेंडरही दिले गेले. पीएम गरीब कल्याण योजनाच्या माध्यमातून व्यक्तींना विना व्याज रक्कमेचा ५० टक्के रक्कम भरावी लागेल.

पीएम गरीब कल्याण योजना गरीबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. यासाठी आतापर्यंत ५० हजार कोटी रूपये खर्च करण्यात आलेला आहे.

पीएम गरीब कल्याण योजनाअंतर्गत PMGKAY फ्रंटलाइन वर्कर्सला ५० लाख रूपयांचा विमा संरक्षणही देते. ही योजना २२ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण प्रदान करते.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

महिला बचत गट लोन योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे फायदे

Benefits of Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana

देशातील सर्व शिधापत्रिकाधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

देशभरातील 80 कोटी पेक्षा अधिक लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत मोफत धान्य केले जाणार आहे.

पुढील पाच वर्ष देशातील नागरिकांना रेशन दुकानातून मोफत अन्नधान्य मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात येते यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, तेल आदीचा समावेश आहे.

शिधापत्रिका असलेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना PMGKAY अंतर्गत पाच किलो मोफत अन्नधान्य मिळते तसेच सध्या सार्वजनिक वितरण प्रणाली पीडीएफ द्वारे उपलब्ध असलेल्या पाच किलो अनुदानित धान्य व्यतिरिक्त ही धान्य दिले जाते.

देशातील सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना (गुजरात, हरियाणा, पंजाब, चंदीगड, राजस्थान, दिल्ली) गहू देण्यात आला आहे. तर इतर राज्याने केंद्रशासित प्रदेशांना तांदूळ दिला गेला आहे.

गरिबी आणि आर्थिक अडचणीमुळे अनेकांना अन्न मिळत नाही मात्र या योजनेमुळे सर्वांना अन्न मिळत आहे.  

या योजनेमुळे देशातील नागरिकांना दोन वेळेचे अन्न मिळत असल्याने कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी या योजनेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची पात्रता

Eligibility of Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana

गरीब कल्याण योजना अंत्योदय अन्न योजना AAY आणि प्राधान्य कुटुंब गटातील कुटुंबांसाठी उपलब्ध आहे.

या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे अशा सर्वांना या योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य रेशन दुकानातून घेता येते.

विधवा, आजारी रुग्ण, अपंग किंवा 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्यांच्याकडे उत्पन्नाचा स्त्रोत नाही आणि सामाजिक मदत नाही अशा कुटुंबांनाही या योजनेचा लाभ दिला जातो.

या योजनेचा कुली ,रिक्षाचालक, हातगाडे ओढणारे, फळे विक्रेते, सर्पमित्र, मोची, निराधार, ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील इतर तत्सम श्रेणी, भूमिहीन चेतक शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर यामध्ये कुंभार, चांभार, विणकर, लोहार, सुतार आदींचा समावेश होतो. त्यांनाही या योजनेचा लाभ मिळतो.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी PMGKAY अंमलबजावणीचे टप्पे

केंद्र सरकार राज्यांना त्यांच्या लाभार्थी नागरिकांच्या संख्येवर आधारित अन्नधान्य पुरवठा करते.

राज्य सरकारी रेशन दुकानदारांच्या माध्यमातून या मोफत अन्नधान्याची वाटप करतात.

या योजनेचा लाभ घेण्याचे लाभार्थ्याकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Documents of Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana

शिधापत्रिका

आधार कार्ड (जर रेशन कार्ड सोबत जोडलेले असेल)

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana Apply

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा PMGKAY अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.

तुम्हाला जर तुमचे राशन कार्ड तयार करायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ही रेशन कार्ड तयार करू शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन दुकानदाराकडे जाऊनही तुमच्या नावाचे रेशन कार्ड बनवून घेऊ शकता.

नागरिकांनी रेशन कार्ड घेऊन जवळच्या रास्त भाव दुकानात सादर करावे.

लाभार्थी हे शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार कार्ड नंबर देशतील कोणत्याही रेशन दुकानातील विक्रेत्याला दाखऊ शकतात.

लाभार्थी फिंगरप्रिंट किंवा बुबुळ आधारित त्यांची ओळख आधारासाठी वापरू शकतात.   

FAQ’s  वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न : देशातील किती लोकांना या योजनेचा लाभ मिळतो

उत्तर : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना PMGKAY अंतर्गत देशातील 81.35 कोटी लोकांना योजनेचा लाभ मिळणार आहे

प्रश्न : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना PMGKAY कधी सुरू झाली

उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 ला ही योजना सुरू केली होती त्यानंतर ही योजना पुन्हा वाढवण्यात आली आहे एक जानेवारी 2024 पासून ही योजना पुढील पाच वर्षासाठी मोफत अन्नधान्य वाटप करणार आहे

प्रश्न : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा PMGKAY लाभ कसा घ्यावा

उत्तर : या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे राशन कार्ड असणे आवश्यक आहे

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News  https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA