Pradhan Mantri Rojgar Yojana 2024 In Marathi : तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुवर्णसंधी

Table of Contents

Pradhan Mantri Rojgar Yojana 2024 Information In Marathi : प्रधानमंत्री रोजगार योजना 2024 मराठी माहिती

Pradhan Mantri Rojgar Yojana 2024 प्रधानमंत्री रोजगार योजना 2024 ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली योजना आहे. देशातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणारी ही एक महत्त्वाची योजना आहे. या माध्यमातून तरुण स्वयंरोजगार निर्माण करून आपले आर्थिक विकास करून स्वतः सक्षम होऊ शकतात. ही योजना ज्या तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा तरुणांना आवश्यक आर्थिक मदत करून त्यांना सक्षम बनवण्याचे काम करत आहे.

Pradhan Mantri Rojgar Yojana

Pradhan Mantri Rojgar Yojana ज्या तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा इच्छुक बेरोजगार तरुणांनी प्रधानमंत्री रोजगार योजना 2024 चा लाभ घेता येईल. प्रधानमंत्री रोजगार योजनेचा लाभ घेऊन तरुण आपले नोकरीचे स्वप्न, उद्योग सुरू करून पूर्ण करू शकतात. जर तुम्हाला प्रधानमंत्री रोजगार योजना PMRY लाभ घ्यायचा असेल तर त्याची संपूर्ण माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

प्रधानमंत्री रोजगार योजना 2024 म्हणजे काय

What Is Pradhan Mantri Rojgar Yojana

Pradhan Mantri Rojgar Loan Yojana  2024 देशातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पीएम रोजगार योजना 2024 Pradhan Mantri Rojgar Yojana एक मोठी संधी देत आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असलेला कोणताही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार बेरोजगार तरुणांना बँकेच्या माध्यमातून कमीत कमी व्याजदरावर कर्ज मिळवून देत आहे. या कर्जाच्या माध्यमातून ते आपला व्यवसाय सुरू करू शकतील. या योजनेसाठी 18 ते 35 वयोगटातील सर्व व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतात.

Pradhan Mantri Rojgar Yojana  केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री रोजगार योजना च्या माध्यमातून देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला आणि अन्य मागासवर्गातील तरुणांना प्राधान्य दिले जाते. इतर प्रवर्गातील व्यक्तीही या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतात. अर्जदार सुरू करत असलेल्या व्यवसायाचे एकूण खर्च 2 लाख रुपये पेक्षा अधिक नसावा. या योजनेचा उद्देश म्हणजे देशातील बेरोजगार तरुणांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो हा सामना करावा लागू नये म्हणून त्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. जर तुम्हीही आर्थिक परिस्थितीमुळे हैराण असाल आणि संघर्ष करत असाल तर तुम्हीलाही प्रधानमंत्री रोजगार योजना PMRY च्या माध्यमातून रोजगार स्थापन करण्यासाठी मदत होईल.

या योजनेलाच Prime Minister Employment Generation Programme (PMEGP) म्हणून ओळखतात

ठळक मुद्दे

प्रधानमंत्री रोजगार योजना 2024 मराठी माहिती

Pradhan Mantri Rojgar Yojana 2024 Information In Marathi

प्रधानमंत्री रोजगार योजना 2024 म्हणजे काय

What Is Pradhan Mantri Rojgar Yojana

प्रधानमंत्री रोजगार योजनेची थोडक्यात माहिती

Pradhan Mantri Rojgar Yojana In Short

प्रधानमंत्री रोजगार योजनेचे फायदे

Pradhan Mantri Rojgar Yojana Loan 2024 Benefits

प्रधानमंत्री रोजगार योजनेसाठी कोण आहे पात्र?

Pradhan Mantri Rojgar Loan Yojana  Eligibility

प्रधानमंत्री रोजगार योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

Pradhan Mantri Rojgar Loan Yojana  2024 Documents

या योजनेच्या माध्यमातून कोणते उद्योग सुरू करता येतात?

Prime Minister Employment Generation Programme (PMEGP)

योजनेतून किती कर्ज मिळेल आणि गुंतवणूक किती करावी लागेल

Prime Minister Employment Generation Programme (PMEGP)

कर्ज सबसिडी किती?

Prime Minister Employment Generation Programme (PMEGP)

प्रधानमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे कर्जावर व्याजदर किती

Pradhan Mantri Rojgar Yojana Loan 2024

प्रधानमंत्री रोजगार योजनेचे रिपेमेंट

Pradhan Mantri Rojgar Yojana Loan 2024

प्रधानमंत्री रोजगार योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

Pradhan Mantri Rojgar Yojana Online Apply

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रधानमंत्री रोजगार योजनेची थोडक्यात माहिती

Pradhan Mantri Rojgar Yojana In Short

योजनेचे नावप्रधानमंत्री रोजगार योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
उद्देशबेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे
लाभ10 लाखापर्यंतचे कर्ज
अर्ज प्रक्रियाऑफलाइन आणि ऑनलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://www.dcmsme.gov.in/
Pradhan Mantri Rojgar Yojana

प्रधानमंत्री रोजगार योजनेचे फायदे

Pradhan Mantri Rojgar Yojana Loan 2024 Benefits

  • प्रधानमंत्री रोजगार योजना 2024 Pradhan Mantri Rojgar Yojana च्या माध्यमातून लाभार्थ्यांना 10 ते 20 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते.
  • या योजनेच्या माध्यमातून बँक केंद्र सरकार कडून 10 लाख रुपयापर्यंत कर्ज अर्ज देते.
  • याचा उद्देश म्हणजे बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे आणि त्यांना सक्षम म्हणून आत्मनिर्भर बनवणे हा आहे.
  • केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली PMRY योजना 2024 बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करते त्यामुळे देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे हा यामागील सरकारचा उद्देश आहे.
  • केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जाणारी ही योजना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या लाभार्थीसाठी 15 ते 20 दिवसाचे प्रशिक्षणही दिले जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना प्राधान्य दिले जाईल.
  • या योजनेसाठी पात्र व्यक्तींना 10 लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाते.
  • चहा बाग, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, बागायती क्षेत्र आदींना प्रोत्साहन देण्यात येते.

प्रधानमंत्री रोजगार योजनेसाठी कोण आहे पात्र?

Pradhan Mantri Rojgar Loan Yojana  Eligibility

केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री रोजगार योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही नियम आणि अटीची पूर्तता करावी लागेल त्या खालील प्रमाणे

  • अर्ज करणारा व्यक्ती बेरोजगार असावा आणि त्याचे वय 18 ते 35 वर्ष या दरम्यान असावे.
  • हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्जदाराचे शिक्षण कमीत कमी 8 वी पास असणे आवश्यक आहे.
  • अर्ज व्यक्ती 3 वर्षाचा एखाद्या गावचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • तुमचा पती किंवा पत्नी सहित तुमच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न कमीत कमी 40 हजार रुपये पर्यंत असावे मात्र 1 लाख रुपये पेक्षा अधिक असू नये.
  • अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे आणि तो कुठल्याही बँकेचा डिफॉल्टर असता कामा नये.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

अटल पेंशन योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

आभा कार्ड योजना

प्रधानमंत्री रोजगार योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

Pradhan Mantri Rojgar Loan Yojana  2024 Documents

अर्जदाराचे ड्रायव्हिंग लायसन्स असावे

आधार कार्ड

ईडीपी प्रशिक्षण प्रमाणपत्र

तुम्हाला सुरू करावयाचा व्यवसायाचा संपूर्ण माहिती अहवाल

अनुभव योग्यता आणि अन्य प्रमाणपत्र

जन्म प्रमाणपत्र (एसएससी प्रमाणपत्र किंवा शाळेतील टीसी)

रहिवासी प्रमाणपत्र (रेशन कार्ड)

MRO (मंडळ राजस्व अधिकारी) द्वारे दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र (जर तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर)

पासपोर्ट आकाराचा फोटो

Pradhan Mantri Rojgar Yojana

या योजनेच्या माध्यमातून कोणते उद्योग सुरू करता येतात?

Prime Minister Employment Generation Programme (PMEGP)

कृषी आधारित अन्नप्रक्रिया उद्योग

खनिज आधारित उद्योग व आधारीत उद्योग

खाद्य उद्योग

रसायन आधारित उद्योग

वस्त्र उद्योग

सेवा उद्योग

ग्रामीण अभियांत्रिकी उद्योग

योजनेतून किती कर्ज मिळेल आणि गुंतवणूक किती करावी लागेल

Prime Minister Employment Generation Programme (PMEGP)

प्रवर्गकर्ज रक्कमस्वतःची गुंतवणूक
सामान्य प्रवर्ग90%10%
मागासवर्गीय प्रवर्ग महिला अपंग व अन्य पात्र लाभार्थी95 %5%

कर्ज सबसिडी किती?

Prime Minister Employment Generation Programme (PMEGP)

प्रवर्गशहरी क्षेत्रग्रामीण क्षेत्र
सामान्य प्रवर्ग15%25%
मागासवर्गीय प्रवर्ग महिला अपंग अन्य पात्र लाभार्थी25%30%

प्रधानमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे कर्जावर व्याजदर किती

Pradhan Mantri Rojgar Yojana Loan 2024

केंद्र सरकार प्रधानमंत्री रोजगार लोन योजना 2024 Pradhan Mantri Rojgar Yojana Loan 2024 च्या माध्यमातून रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार विविध कर्ज योजनेसाठी वेगवेगळे व्याजदर निश्चित करते भविष्यात अर्जदाराला 25 हजार रुपये चा कर्जासाठी 12 टक्के व्याजदर आहे तर 25 हजार रुपये पासून 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला 15.5% व्याजदर आहे.

Pradhan Mantri Rojgar Yojana Loan 2024 या व्यतिरिक्त जशी रक्कम वाढेल तसा व्याजदर वाढत जातो. PMRY योजनेच्या माध्यमातून इच्छुक तरुणांना स्वयंरोजगार च्या दिशेने जाण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. निपक्ष आणि टिकाऊ लोन देण्यासाठी रिझर्व बँक द्वारे वेळेवर या व्याजदरामध्ये अपडेट करण्यात येते.

प्रधानमंत्री रोजगार योजनेचे रिपेमेंट

Pradhan Mantri Rojgar Yojana Loan 2024

एकदा तुमचा व्यवसाय सुरू झाला आणि तुमचे उत्पादन बाजारात येण्यास सुरुवात झाली विक्री होत असेल त्यानंतर व्याजासह कर्ज भरावे लागते. बँक PMRY नियमाचे पालन करत पुनर रिपेमेंट साठी एक योजना तयार करेल आणि ती अर्जदाराला सांगून पुढील 3 ते 7 वर्षाच्या कालावधीत त्याला हप्ते पाडून देईल त्यानुसार अर्जदार कर्जदाराने ते कर्ज फेडायचे आहे.

यादरम्यान आपले उत्पादन वाढवण्याचे लक्ष अर्जदाराने ठेवले पाहिजे. जर अर्जदार कर्ज भरण्यास यशस्वी झाला तर बँक संबंधित पोलीस विभागाच्या मदतीने संबंधित व्याजासहित कर्जाची वसुली कायदेशीर पद्धतीने करू शकते. या कर्जाला राजस्व वसुली अधिनियम च्या माध्यमातून कोणत्याही अन्य कर्जाप्रमाणे मांडले जाते. त्यामुळे अर्जदाराने आपला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी मोठी मेहनत करायला हवी आणि वेळेवर बँकेचे व्याजासहित कर्ज भरायला हवे मग त्याला या अशा समस्याला तोंड द्यावे लागणार नाही आणि त्याचा व्यवसाय ही चांगला चालेल.

Pradhan Mantri Rojgar Yojana

प्रधानमंत्री रोजगार योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

Pradhan Mantri Rojgar Yojana Online Apply

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम प्रधानमंत्री रोजगार योजनेचे अधिकृत वेबसाईटला भेट द्या

त्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज दिसेल त्यानंतर तुम्ही PMRY वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करा

अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा. त्यामध्ये तुमचे नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर आदी अर्ज भरल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडा

त्यानंतर हा अर्ज घेऊन तुमच्या जवळच्या बँक मध्ये जाऊन अर्ज कर्जासाठी अर्ज करा आणि हा अर्ज जमा करा

त्यानंतर बँक अर्ज आणि तुम्ही दिलेली सर्व कागदपत्रे तपासून पाहिल आणि त्यानंतर एक आठवड्याच्या आत तुमच्याशी संपर्क करतील

एकदा का अर्ज आणि कागदपत्राचे तपासणी झाल्यानंतर बँकेत या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मंजूर करेल आणि तुमचा अर्ज ला मान्यता दिली जाईल.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: प्रधानमंत्री रोजगार योजना PMEGP म्हणजे काय?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून देशातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करणे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

प्रश्न: PMRY या योजनेसाठी कोण अर्ज करू शकते?

उत्तर: 18 ते 35 वर्ष वय असलेले बेरोजगार व्यक्ती ज्यांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे अशी सर्वजण या योजनेसाठी अर्ज करू शकता. याला कुठलीही जातीची धर्माची अट नाही.

प्रश्न: PMEGP या योजनेअंतर्गत कर्ज फेडण्याचा कालावधी किती?

उत्तर: कर्ज परतफेड करण्याचा कालावधी वेगवेगळ्या प्रकल्पावर अवलंबून असतो पण कर्ज परतफेड करण्याचा कालावधी हा 3 ते 7 वर्षापर्यंत आहे.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA