Pradhanmantri Janaushadhi Kendra in marathi : गरिबांसाठी स्वस्त औषधासोबतच रोजगार निर्मिती

Pradhanmantri Janaushadhi Kendra 2024 information in marathi : प्रधानमंत्री जन औषधी योजना 2024

Pradhanmantri Janaushadhi kendra : आपण पाहतो की, ब्रँडेड औषधी या अतिशय महागड्या दरात विकल्या जातात. आणि त्यामुळे सामान्य औषधींपेक्षा त्यांची किंमत खूप आहे असे वाटते. उपचार करायला जेवढे पैसे लागतात तेवढेच औषधांनाही लागतात अगदी एवढा खर्च औषधांवर केला जातो. देशभरातील गरीब व्यक्तीला हा खर्च न परवडणारा आहे. त्यासाठी कमी दरात चांगल्या प्रकारची औषध बाजारात उपलब्ध करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. आणि त्याचा फायदा सर्वांनाच होईल. आपण या लेखांमध्ये प्रधानमंत्री जन औषधी योजनेची Pradhanmantri Jan aushadhi yojana संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये प्रधानमंत्री जन औषधी योजना म्हणजे काय ? त्याचे फायदे ? त्याचे उद्दिष्टे? त्याचे लाभ? त्यासाठीचा अर्ज कसा करावा? त्यासाठी स्टोअर उघडण्याची काय प्रक्रिया आहे? या सर्व गोष्टींची माहिती या संपूर्ण लेखात जाणून घेणार आहोत, त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Pradhanmantri Janaushadhi Kendra

प्रधानमंत्री जन औषधी योजना म्हणजे काय ?

What is Pradhanmantri Janaushadhi yojana

1 जुलै 2015 पासून संपूर्ण देशात प्रधानमंत्री जन औषधी योजना Pradhanmantri Jan aushadhi yojana लागू करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला सुरुवात केली. प्रधानमंत्री जन औषधी योजनेअंतर्गत उच्च दर्जाची औषधे सर्वसामान्य नागरिकांना कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने हे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे प्रत्येक शहरात जन औषधी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. या औषधी स्टोअर मध्ये उच्च दर्जाची औषधे कमीत कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत. ब्रॅण्डेड फार्मा कंपन्यांच्या औषधांमध्ये जे महागडे प्रोडक्ट वापरले जातात तेच या औषधांमध्ये देखील वापरले जाणार आहेत. त्यामुळे हे औषधे घेण्यासाठी कुठलिही चिंता नसेल.

जन औषधी ही मोहीम औषध विभागाने केंद्रीय सार्वजनिक औषध Department of Pharmaceuticals in association with Central Pharma Public Sector क्षेत्रांतर्गत चांगल्या प्रतीची औषधे कमी किमतीत मिळावी यासाठी स्थापन केली आहे. जन औषधीची दुकाने ही कमी किमतीमध्ये चांगल्या प्रकारची औषधे उपलब्ध करून देण्यासाठी उघडली आहे. जशी ब्रॅण्डेड औषधांमध्ये गुणवत्ता असते अगदी तसेच या जेनेरिक औषधांमध्ये देखील प्रभावी गुण आहेत. देशातील गरीब नागरिकांना कमी दरात जीवनावश्यक औषधी मिळाव्यात याकरिता, केंद्र सरकारने प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना Pradhan Mantri Bharatiya Janaushadhi Pariyojana सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारने आर्थिक दुर्बल नागरिकांसाठी प्रधानमंत्री जन औषधी केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी हे औषध नागरिकांना सहजपणे उपलब्ध करून दिली जातील.

ठळक मुद्दे :

प्रधानमंत्री जन औषधी योजना म्हणजे काय ?

प्रधानमंत्री जन औषधी योजनेबद्दल थोडक्यात माहिती

जन औषधी स्टोअर विषयी थोडक्यात माहिती

प्रधानमंत्री जन औषधी योजनेचा उद्देश

प्रधानमंत्री जन औषधी योजनेचे फायदे

प्रधानमंत्री जन औषधी योजनेची उद्दिष्टे

प्रधानमंत्री जन औषधी योजनेची पात्रता

प्रधानमंत्री जन औषधी योजनेसाठीची कागदपत्रे

जन औषधेचे PMBJP दुकाने उघडण्यासाठी आवश्यक घटक

जन औषधीचे PMBJP स्टोर उघडण्याची प्रक्रिया

प्रधानमंत्री जन औषधी योजनेचा अर्ज कसा करावा

प्रधानमंत्री जन औषधी केंद्र हेल्पलाइन नंबर

प्रधानमंत्री जन औषधी योजनेबद्दल थोडक्यात माहिती

Pradhanmantri Janaushadhi yojana in short

योजनेचे नावप्रधानमंत्री जन औषधी योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
कधी सुरू झाली2015
लाभार्थी कोणभारतातील सर्व नागरिक
उद्दिष्टकमी किमतीत चांगल्या दर्जाची औषधे उपलब्ध करून देणे
अधिकृत वेबसाईटhttps://janaushadhi.gov.in/index.aspx

जन औषधी स्टोअर विषयी माहिती

PradhanMantri Bharatiya Janaushadhi Pariyojana प्रत्येक उपचारादरम्यानच्या औषधी जनाऔषधी दुकानांमध्ये उपलब्ध असतील. कामकाजाची वेळ ही सकाळी 8 ते रात्री 8 अशी असेल. जन औषधींची दुकाने ही देशभर उघडली गेली आहे. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय मिळणारी औषधे कोणीही घेऊ शकतात, परंतु काही विशिष्ट औषधांसाठी डॉक्टरांची परवानगी घेणे आवश्यक असेल. प्रत्येक औषधीची गुणवत्ता, सुरक्षितता आणि औषधांचा प्रभावीपणा हे तपासण्यासाठी औषधांची प्रत्येक बॅच CPSUP सोबतच खाजगी पुरवठादारांकडून विकत घेऊन NABL ची मान्यता मिळालेल्या प्रयोगशाळेतून याची चाचणी केली जाते. ही गुणवत्ता तपासून मोठ्या दुकानाला आणि जन औषधी दुकानदारांना BPPI या कोठारातून पाठवली जाते.

प्रधानमंत्री जन औषधी योजनेचा उद्देश

Purpose of Pradhanmantri Janaushadhi yojana

प्रधानमंत्री जन औषधीयोजना Pradhanmantri Janaushadhi yojana सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या देशात राहणाऱ्या नागरिकांना कमी किमतीत चांगली औषधे उपलब्ध करून देणे हा आहे.

या योजनेअंतर्गत नागरिकांना बाकीच्या दुकानातील दरापेक्षा 50 ते 90 टक्के कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देणे हा सरकारचा प्रयत्न आहे.

आपल्या देशात अशी बरीच कुटुंबे आहेत ज्यांची आर्थिक परीस्थिती खूप अडचणीची आहे. अशा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कोणताही आजार झाला तर त्यांची आर्थिक परीस्थिती हालाकीची असल्यामुळे ते उच्च दर्जाची औषधे घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार होत नाहीत. परिणामी या कारणामुळे त्यांचा जीवही धोक्यात येतो. म्हणूनच केंद्र सरकारने आपल्या देशातील सर्व शहरांमध्ये ही औषधे उपलब्ध करून दिली आहेत. जी प्रत्येक नागरिकाला सहजपणे उपलब्ध होऊ शकतात.

जन औषधी केंद्रामध्ये PMBJP 1759 औषधे आणि 280 शस्त्रक्रिया एवढी उपकरणे आहेत.

यासोबतच नवीन औषधे आणि न्यूट्रास्युटिकल्स उत्पादने जसे की प्रोटीन पावडर माल्ट- आधारित अन्न पूरक, प्रोटीन बार, इम्युनिटी बार, सॅनिटायझर, मास्क, ग्लुकोमीटर, ऑक्सिमीटर इत्यादी उपलब्ध आहे.

Pradhanmantri Janaushadhi Kendra

प्रधानमंत्री जन औषधी योजनेचे फायदे

Benefits of Pradhanmantri Janaushadhi yojana

प्रधानमंत्री जन औषधी योजनेअंतर्गत 2024 Pradhanmantri Janaushadhi yojana 2024 कमी किमतीत योग्य दर्जाची औषधे सहज उपलब्ध होतात.

या योजनेअंतर्गत PMBJP नागरिकांना योग्य व कमी दरात औषधे दिली जाणार आहेत.

या योजनेचा PMBJP लाभ भारतातील सर्व नागरिकांना घेता येतो.

या योजनेअंतर्गत PMBJP जेनेरिक औषधे खरेदी करण्यावर भर दिला जातो.

या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जन औषधी केंद्र Pradhan Mantri Bharatiya Janaushadhi Pariyojana उघडल्यानंतर सरकारकडून त्यांना आर्थिक मदतही मिळते.

या योजनेअंतर्गत PMBJP दिली जाणारी रक्कम ही अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

प्रधानमंत्री जन औषधी योजनेच्या Pradhanmantri Janaushadhi yojana मदतीने आर्थिक स्थिती ही मजबूत होते.

या योजनेमुळे बेरोजगारी कमी होऊन लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतात.

देशभरात तब्बल एकूण 11261 जन औषधी केंद्र आहेत.

जन औषधी केंद्र Pradhan Mantri Bharatiya Janaushadhi Pariyojana सुरू करण्यासाठी केंद्र सरकार दोन लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत करते.

या योजनेअंतर्गत फर्निचर साठी एक लाख रुपयांची परतफेड केली जाईल.

प्रधानमंत्री जन औषधी योजनेअंतर्गत Pradhanmantri janaushadhi yojana लाभार्थ्याला कॉम्प्युटर, इंटरनेट, प्रिंटर इत्यादी गोष्टी घेण्यासाठी पन्नास हजार रुपये मिळतील.

या योजनेअंतर्गत लाभार्थींना औषधांच्या छापील किमतीवर 20 टक्के पर्यंत लाभ मिळतो.

या योजनेअंतर्गत PMBJP लाभार्थ्याने बारा महिन्यांमध्ये जेवढी विक्री केली आहे, त्या विक्रीवर 10 टक्के अतिरिक्त प्रोत्साहन मिळते. म्हणजेच जन औषधी केंद्राचे मालक हे महिन्याला 50 हजार ते एक लाख रुपये कमवू शकतात.

ईशान्य कडील राज्य आणि नक्षलग्रस्त भागातील लाभार्थी यांना 15 टक्के प्रोत्साहन या योजनेअंतर्गत दिले जाते.

आभा कार्ड योजनेच्या माहितीसाठी इथे क्लिक करा.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माहितीसाठी इथे क्लिक करा.

प्रधानमंत्री जन औषधी योजनेची उद्दिष्टे

Objectives of Pradhanmantri Janaushadhi Yojana

Pradhan Mantri Bharatiya Janaushadhi Pariyojana प्रधानमंत्री जन औषधी योजनेची मुख्य उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत :

कमीत कमी किमतीची औषधे ही उत्तम दर्जा मध्ये सर्वांसाठी उपलब्ध करून देणे.

जे गंभीर आजाराने ग्रस्त झालेले लोक आहेत त्यांच्या उपचारा मधून युनिट कॉस्ट ची रक्कम कमी करणे.

जास्त पैसा दिल्याने औषधे चांगले मिळतात आणि त्यांची गुणवत्ता देखील अधिक असते असा गैरसमज असणाऱ्या लोकांना गैरसमज दूर करणे.

सर्वसामान्य औषधांना कमी किमतीच्या मुख्यत्वे करून सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना सर्वसामान्य औषधी लिहून देण्यास प्रोत्साहन देणे.

प्रधानमंत्री जन औषधी योजनेची पात्रता

Eligibility of Pradhanmantri Janaushadhi Yojana

अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

कोणत्याही वर्गातील लोक ही योजना सुरू करू शकतात.

बेरोजगार तसेच नोकरी करणारे हे दोन्ही लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

अर्जदाराचा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय असावा.

अर्जदार हा डॉक्टर किंवा मेडिकल स्टोअरमध्ये काम करणारा असावा.

अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.

अर्जदाराकडे बी-फार्मा किंवा डी-फार्मा पदवी असावी.

अर्जदाराकडे किमान 120 चौरस फूट क्षेत्रफळाची स्वतःची किंवा भाड्याने करार केलेली जागा असावी.

Pradhanmantri Janaushadhi Kendra

प्रधानमंत्री जन औषधी योजनेसाठीची कागदपत्रे

Documents of Pradhanmantri Janaushadhi Yojana

बँक खाते

आधार कार्ड

जात प्रमाणपत्र

वैद्यकीय कागदपत्रे

ग्राउंड कागदपत्रे

मोबाईल नंबर

शैक्षणिक कागदपत्रे

पासपोर्ट आकाराचा फोटो

जन औषधेचे PMBJP दुकाने उघडण्यासाठी आवश्यक घटक

2000 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट सोबत सांगितलेल्या नमुन्यानुसार योग्य प्रकारे भरलेला अर्ज.

स्वतःची मालकीची जागा किंवा भाड्याने घेतलेली जागा जी योग्य प्रकारे करार करून लीज वर घेतली असेल. 120 स्क्वेअर फुट जागा असणे आवश्यक आहे. जी BPPI ने मान्य केली आहे.

अर्जदाराला सक्षम प्राधिकरण कडून रिटेल औषध विक्री परवाना असणे आवश्यक आहे. संगणकाचे ज्ञान तसेच फार्मासिस्ट चे शिक्षण घेतलेला पुरावा असावा. त्यात फार्मासिस्टचे नाव, राज्य परिषदेमध्ये म्हणजेच स्टेट कौन्सिल मध्ये नोंदणी केलेले प्रमाणपत्र असावे. मागील तीन वर्षाचे बँक स्टेटमेंट असावे.

अर्जदाराला स्टोअर चालवण्याची आर्थिक क्षमता सिद्ध करण्यासाठी मागच्या तीन वर्षा पासून ऑडिट खात्याची माहिती असावी.

जन औषधीचे PMBJP स्टोर उघडण्याची प्रक्रिया

BPPI ही सर्व राज्य सरकारांना त्यांच्या राज्यांमध्ये जन औषधीचे स्टोरउघडण्यासाठी विनंती अर्ज लिहून पाठवतो. राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत काही नावे सुचवली जातात. जे की अशा प्रकारचे स्टोर चालू शकतील. आणि नंतर जिल्हा रुग्णालयाच्या लोकांना सांगते की BPPI आणि मान्य केलेल्या दर्जानुसार दवाखान्याच्या परिसरात अशा स्टोरसाठी जागा मिळवून द्या त्यासाठी चे ठिकाण अशा ठिकाणी असेल जिथून रुग्णांना खरेदी करणे सोपे जाईल. शक्यतोवर दवाखान्याच्या गेट जवळ आजूबाजूलाच हे स्टोअर असावे. तसेच ती जागा त्याला मोफत असेल. राज्य सरकारने जेनेरिक औषधांविषयीच्या सूचना दवाखान्यातील डॉक्टर्सला देणे आवश्यक आहे. BPPI  जन औषधीचे काम सुरू करण्यापूर्वी BPPI  आणि ऑपरेटिंग एजन्सी मध्ये करार करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर BPPI   औषधांच्या पुरवठ्याची जबाबदारी घेईल.

प्रधानमंत्री जन औषधी योजनेचा अर्ज कसा करावा

Pradhanmantri Janaushadhi Yojana online application

सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री जन औषधीयोजनेच्या Pradhan Mantri Bharatiya Janaushadhi Pariyojana अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल. त्या पेजवर तुम्हाला Apply for kendra हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

त्या पर्यायावर क्लिक करताच नवीन होम पेज उघडेल. या नवीन होम पेजवर Apply Online  हा पर्याय असेल त्या पर्यायावर क्लिक करा.

Apply Online या पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला register now हा पर्याय आहे.

register now या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर नोंदणी फॉर्म उघडेल.

या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा.

त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा.

नोंदणी करताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिला असेल त्यावर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड नंबर पाठवला जाईल.

त्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री जन औषधी योजनेसाठी साइन इन करून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

प्रधानमंत्री जन औषधी केंद्र हेल्पलाइन नंबर

Helpline number Pradhanmantri Janaushadhi Yojana

टोल फ्री क्रमांक 1800-180-8080 या नंबर वर ग्राहक सेवा अधिकारी सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6 पर्यंत उपलब्ध असतात.

FAQ

प्रधानमंत्री जन औषधी योजनेचा लाभ कोणाला घेता येतो?

प्रधानमंत्री जन औषधीयोजनेचा लाभ हा भारतातील प्रत्येक नागरिकाला घेता येतो.

प्रधानमंत्री जन औषधी योजनेचा उद्देश काय आहे ?

गरीब जनतेला कमी किमतीत उच्च दर्जाची औषधे उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे.

प्रधानमंत्री जन औषधी योजना कधी सुरू करण्यात आली?

1 जुलै 2015 पासून संपूर्ण देशात प्रधानमंत्री जन औषधीयोजना लागू करण्यात आली.

जन औषधी स्टोअरच्या कामकाजाची वेळ काय?

सकाळी 8 ते रात्रीचे 8 या वेळेत जन औषधीचे स्टोअर चालू असते

प्रधानमंत्री जन औषधी केंद्रात काय काय उपलब्ध आहे?

प्रधानमंत्री जन औषधीकेंद्रामध्ये 1759 औषधे तर 280 शस्त्रक्रिया उपकरणे उपलब्ध आहेत. याशिवाय प्रोटीन पावडर, माल्ट-आधारित अन्न पूरक, प्रोटीन बार, इम्युनिटी बार, सॅनिटायझर, मास्क, ग्लुकोमीटर, ऑक्सिमीटर इत्यादि उपलब्ध आहे.