Property Buying Tips In Marathi : घर खरेदी करण्यापूर्वी या गोष्टीकडे लक्ष द्या नाहीतर होईल मोठे नुकसान

Property Buying Tips In Marathi : वाचा सविस्तर

Property Buying Tips In Marathi : देशात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे. अशावेळी शहरांमध्ये आपल्या स्वप्नातील घर दुकान किंवा मालमत्ता खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र हे घर खरेदी करत असताना अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. तर तुमची ही फसवणूक होऊ नये. यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.

Property Buying Tips देशाभरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. देशातील टीआर 1 शहरासह टी आर 2 आणि टीआर 3 शहरांमध्ये घराच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आयुष्यभराची कमाई लोक एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी लावत आहेत. अशा परिस्थितीमध्ये घर दुकान किंवा मालमत्ता खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
Business News

या गोष्टीची काळजी घ्या?

Home Buying Tips

Home Buying घर खरेदी करत असताना प्रॉपर्टी दोन प्रकारच्या फॉर्ममध्ये उपलब्ध असतात. एक अंडर कंट्रक्शन आणि दुसरी रेडी टू प्रॉपर्टी. रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी मध्ये घर तयार असते, घर खरेदी केल्यानंतर तातडीने घरात शिफ्ट होता येते. अनेक जण हा पर्याय निवडतात. रेडी टू प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

घर- मालमत्ता किती जुनी आहे?

Property Buying Tips

घर खरेदी करत असताना जेवढे घर जुने असेल तेवढी त्याची किंमत कमी असते. यासाठी मालमत्ता किती जुनी किंवा किती वर्षाची आहे याची माहिती घेणे आवश्यक आहे. यासाठी स्ट्रक्चरल इंजिनियर, परिसरातील लोक आणि प्रॉपर्टी डीलर सोबत चर्चा करून ही माहिती तुम्ही घेऊ शकता आणि संपूर्ण माहिती मिळाल्यावरच तुम्ही घर खरेदी करावे.

अशी मालमत्ता खरेदी करत असताना अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकरण अनेकदा समोर येत असतात. यामुळे प्रॉपर्टी डीलर आणि खरेदी दारामध्ये वादही होतात. यापासून वाचण्यासाठी तुम्हाला मालमत्तेच्या मालकीच्या स्थितीची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही प्रॉपर्टीची कागदपत्रे महसुली विभागाच्या अधिकाऱ्याकडे जाऊन पाहू शकता. त्याच्याकडे घर कुणाच्या नावावर आहे हेही पाहू शकता.

जी मालमत्ता किंवा घर तुम्ही खरेदी करत आहात तेथील संपूर्ण पायाभूत सुविधांची तुम्ही चौकशी करा. तिथे वीज, पाण्याची स्थिती काय आहे. पुरवठा सुरळीत आहे की नाही. याचा विचार करून तुम्ही घर खरेदी करा.

तुम्ही घर किंवा प्रॉपर्टी करत खरेदी करत आहात? तिथून शाळा, मार्केट, रुग्णालय यासारखी अत्यावश्यक सुविधा जवळ आहेत की नाही? याचीही खातरजमा करून घ्या. जेणेकरून घर खरेदी केल्यानंतर तुम्हाला कुठल्या अडचणीचा सामना करावा लागू नये.