Railway Budget 2025 in marathi : 2,179 कोटी रुपयांचा निधी मंजूर
Railway Budget 2025 in marathi : छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होत असल्यामुळे रेल्वे प्रवाशांना आनंद झाला आहे. कारण आता रेल्वेचा प्रवास हा जलद गतीने होणार. कुठेही क्रॉसिंगची आवश्यकता पडणार नाही.
Railway Budget 2025 in marathi : जिथे अडीच, तीन तास प्रवास होता तो आता कमी होईल. त्यामुळे प्रवासी सुखावले आहेत. या रेल्वे महामार्गाच्या कामासाठी सरकारने 2,179 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
Railway Development परभणी ते छत्रपती संभाजीनगरच्या मार्गाचे रेल्वेचे दुहेरीकरण होणार. रेल्वेच्या दुहेरी करणाला मंजुरी मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे महामार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्ण होणार आहे.
Railway Development या मार्गामुळे औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. प्रवासी व मालवाहतूक अधिक गतिमान होईल. अंकाई ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या काम प्रगतीपथावर असतानाच गुरुवारी छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
या दुहेरीकरणाबाबतचा निर्णयाची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट च्या माध्यमातून दिली. छत्रपती संभाजीनगर ते परभणी हा 177 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे. यासाठी 2179 कोटी रुपयांच्या निधीची अपेक्षा आहे.
Railway Budget 2025 अर्थसंकल्पात या निधीला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. या रेल्वे मार्गात 21 स्थानके, 29 भुयारी मार्ग, 28 मोठे पूल, 161 छोटे पूल, (दिनेगाव) जालना, दौलताबाद येथील माल धक्क्याला थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. जालना येथील ड्रायपोर्ट छत्रपती संभाजीनगरच्या डीएमआयसी प्रकल्पाला याचा भरपूर फायदा होईल.
Railway Budget 2025 मराठवाड्यातील औद्योगिक विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल सरकारने उचलले आहे. साधारण 2028-29 या दरम्यान हा मार्ग होण्याची अपेक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर ते अंकाई या 92 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
अंकाई ते करंजगाव आणि करंजगाव ते छत्रपती संभाजीनगर अशा या 2 टप्प्यांमध्ये हे काम होईल. अंकाई ते करंजगाव दरम्यान आतापर्यंत 30 किलोमीटरच्या जमिनीचे सपाटीकरण झाले असून या दुहेरीकरणाच्या दृष्टीने 10 पूलांवर कामे जवळपास पूर्ण झालेली दिसून येत आहेत.
Railway Budget 2025 यासाठी 350 शेतकऱ्यांच्या जमिनींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या हरकती मागवलेल्या असून त्यानंतर जिल्हा भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत जमीन संपादन प्रक्रिया राबवली जाईल.