Railway Update In Marathi : या तारखेपासून धावणार उशिरा रेल्वे
Railway Update In Marathi : छत्रपती संभाजीनगर पासून हैदराबादला जाणारी गुंटूर एक्सप्रेस बद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गुंटूर एक्सप्रेस 4 फेब्रुवारीपासून ते 27 मे पर्यंत छत्रपती संभाजीनगर वरून न निघता थेट जालना रेल्वे स्टेशन वरून निघणार आहे. या गाडीचा वेळ संध्याकाळी 5.30 वाजता जालना येथून रवाना होण्याचा आहे.
Chhatrapati sambhaji nagar/guntur express from jalna changes in sambhajinagar Hyderabad train journey या काळात ही रेल्वे छत्रपती संभाजीनगर वरून न निघता जालना इथून निघणार आहे. ती संध्याकाळी 5.30 वाजता जालना स्थानकावरून रवाना होईल.
मात्र या वेळेमध्ये छत्रपती संभाजीनगर वरून जालन्याला जाण्यासाठी कोणतीही रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांना बसने किंवा खाजगी वाहनाने जालना पर्यंत जावे लागेल.
Railway Update News In Marathi करमाड, दिनेगाव, बदनापूर ते जालना रेल्वे मार्गावर रोलिंग ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे 4 फेब्रुवारी ते 27 मे या कालावधीत दर आठवड्यात मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार या चार दिवस रेल्वे वाहतुकीवर परिणाम जाणवणार आहे.
गुंटूर वरून निघणारी ही एक्सप्रेस येताना देखील जालनापर्यंतच येईल. त्यामुळे त्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जालन्या ते छत्रपती संभाजीनगर पर्यंत खाजगी वाहन किंवा बसचा वापर करावा लागेल. सध्याच्या 4 फेब्रुवारी ते 27 मे वेळापत्रकानुसार ही रेल्वे जालना वरून दुपारी 5.30 वाजता सुटून परभणी, परळी, लातूर रोड, उदगीर, सिकंदराबाद पासून पुढे गुंटूर पर्यंत धावेल.
या रेल्वे उशिरा धावणार
Chhatrapati sambhaji nagar/guntur express from jalna changes in sambhajinagar Hyderabad train journey
3 फेब्रुवारी ते 26 मे या कालावधीत काचीगुडा-नगरसोल गाडी क्रमांक 17661 ही रेल्वे सेलू ते जालना या टप्प्यात सुमारे दीड तास उशिराने पोहोचणार आहे.
तसेच काचीगुडा-नगरसोल क्रमांक 17687 या दुसऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे, ती छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यान अंदाजे 20 मिनिटे उशिराने धावेल. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नियोजन करताना विलंबाची शक्यता लक्षात घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.