Rashtriya Swasthya Bima Yojana 2024 Information In Marathi : राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना 2024 मराठी माहिती
Rashtriya Swasthya Bima Yojana 2024 : देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून विविध जनकल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातूनच आता केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वास्थ विमा योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब नागरिकांना आरोग्य सेवा पुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे.
Rashtriya Swasthya Bima Yojana देशातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी लोकसंख्येचा एक छोटा भाग सामाजिक सुरक्षा उपक्रमांतर्गत समाविष्ट आहे. यातील अनेक नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सेवा परवडत नाहीत त्यामुळे त्यांना वेळेवर आणि चांगले उपचार मिळत नाहीत त्यासाठी ज्यांना आरोग्य सुविधा चांगल्या आणि दर्जा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वास्थ विमा योजना Rashtriya Swasthya Bima Yojana नावाने आरोग्य विमा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब नागरिकांना आरोग्य सेवा पुरवल्या जाणार आहेत. आज आपण या लेखाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वास्थ विमा योजना ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
राष्ट्रीय स्वास्थ विमा योजनेची सुरुवात
Rashtriya Swasthya Bima Yojana 2024
केंद्र सरकारने कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या माध्यमातून 1 एप्रिल 2018 रोजी राष्ट्रीय स्वस्त विमा योजना सुरू केली होती. या योजनेला 1 एप्रिल 2015 पासून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा एक भाग बनवण्यात आला आहे..
ठळक मुद्दे
राष्ट्रीय स्वास्थ विमा योजना 2024 मराठी माहिती
Rashtriya Swasthya Bima Yojana 2024 Information In Marathi
राष्ट्रीय स्वास्थ विमा योजनेची सुरुवात
Rashtriya Swasthya Bima Yojana 2024
राष्ट्रीय स्वास्थ विमा योजना म्हणजे काय
What Is Rashtriya Swasthya Bima Yojana
राष्ट्रीय स्वस्त विमा योजनेची वैशिष्ट्ये
Rashtriya Swasthya Bima Yojana Features
राष्ट्रीय स्वास्थ विमा योजना अशी करते काम
Rashtriya Swasthya Bima Yojana 2024 In Marathi
राष्ट्रीय स्वास्थ विमा योजनेचा निधी
Rashtriya Swasthya Bima Yojana
राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेत समाविष्ट काय नाही
Rashtriya Swasthya Bima Yojana Do Not Involve
राष्ट्रीय स्वास्थ विमा योजनेची पात्रता
Rashtriya Swasthya Bima Yojana Eligibility
या योजनेसाठी पात्र कामगाराची पात्रता
Rashtriya Swasthya Bima Yojana 2024 Eligibility
राष्ट्रीय स्वस्त विमा योजनेअंतर्गत दावा करण्याची प्रक्रिया
Rashtriya Swasthya Bima Yojana 2024
राष्ट्रीय स्वास्थ विमा योजना म्हणजे काय
What Is Rashtriya Swasthya Bima Yojana
Rashtriya Swasthya Bima Yojana या योजनेच्या माध्यमातून देशातील दारिद्र्यरेषेखालील बीपीएल प्रवर्गातील कुटुंबीयांना आरोग्य विमा संरक्षण देण्यात येते. यामध्ये असंघटित क्षेत्रातील मजूर कामगारांचा समावेश आहे. देशातील एकूण कामगारांपैकी 93 टक्के असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगारांची संख्या आहे अशा कुटुंबातील नागरिकांना अचानक रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यास त्यांना अनेक आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या योजनेत सहभागी असलेल्या सदस्यांना वैद्यकीय खर्चाची भरपाई दिली जाते जेणेकरून त्यांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होतील.
राष्ट्रीय स्वस्त विमा योजनेची वैशिष्ट्ये
Rashtriya Swasthya Bima Yojana Features
- देशातील दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून कॅशलेस पद्धतीने उपचार दिले जातात.
- RSBY राष्ट्रीय स्वस्त बीमा योजनेच्या माध्यमातून कामगारांना एक स्मार्ट कार्ड दिले जाते. या स्मार्ट कार्डच्या आधारे ते ठरलेल्या रुग्णालयात जाऊन दर्जेदार आरोग्य सेवा घेऊ शकतात.
- हे स्मार्ट कार्ड पोर्टेबल असल्यामुळे लाभार्थी कामगार देशातील कोणत्याही रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकतात.
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंब दर्जेदार आरोग्य सुविधा उपचार घेण्यासाठी शासकीय किंवा खाजगी रुग्णालय निवडू शकतात.
- RSBY या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांना अशा कुटुंबांना कॅशलेस उपचार देणे बंधनकारक आहे.
- या योजनेचा लाभ नागरिकांना व्हावा यासाठी मध्यस्थी म्हणून राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना अंतर्गत एनजीओ आणि एम एफ आय यांची मदत घेण्यात आली आहे.
- यामुळे योजनेची अधिक चांगली आणि व्यापक व्याप्ती निर्माण होईल आणि अधिकाधिक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल.
- स्मार्ट कार्ड बायोमेट्रिक सक्षम आहे त्यामुळे ते सुरक्षित आहे.
- RSBY या योजनेच्या माध्यमातून एकच स्मार्ट कार्ड दिले जाईल. ज्यामध्ये आम आदमी विमा योजना आणि राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना यासारख्या इतर सरकारी योजनांचा समावेश असेल.
- या योजनेचा पेपरलेस व्यवहार असणार आहे. त्यामुळे विमा कंपनीकडे ऑनलाइन दावे सादर करावे लागतील.
- लाभार्थी नागरिकांच्या तक्रारी हाताळण्यासाठी आणि त्यांना जलद निराकरण करण्यासाठी केंद्रीय तक्रार निवारण प्रणाली सीजीआरएस सुरू करण्यात आली आहे.
- केंद्र सरकारने ऑक्टोंबर 2014 पासून राष्ट्रीय स्वास्थ विमा योजनेतील नाव नोंदणी बँक खाते उघडणाऱ्या आणि आधार कार्डसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींची जोडण्यात आले आहे.
- RSBY या योजनेत नाव नोंदणी साठी कमाल वयाची मर्यादा नाही देशातील सर्व गटातील व्यक्ती म्हणजेच बीपीएल कुटुंबातील असतील तर त्यांना राष्ट्रीय स्वास्थ विमा योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.
राष्ट्रीय स्वास्थ विमा योजना अशी करते काम
Rashtriya Swasthya Bima Yojana 2024 In Marathi
Rashtriya Swasthya Bima Yojana या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबांना आरोग्य विमा संरक्षण देणाऱ्या विमा कंपन्यांची बोली लावून निवड केली जाते. यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या बोली लावू शकतात. प्रती कुटुंब सर्वात कमी वार्षिक प्रीमियम देणाऱ्या कंपनीची जिल्ह्यासाठी निवड केली जाते. विमा कंपनीची निवड झाल्यानंतर योजनेचे लाभार्थी ओळखपत्रासाठी पात्र बीपीएल कुटुंबाची यादी तयार केली जाते. राज्य सरकारने तयार केलेली बीपीएल योजना यादीचा वापर केला जातो. त्यानंतर ही यादी केंद्र सरकारला सादर केली जाते.
दारिद्र रेषेतील पात्र कुटुंबाची ओळख पटल्यानंतर विमा कंपनी द्वारे नाव नोंदणीचे वेळापत्रक जाहीर केले जाते. नाव नोंदणीची वेळ, तारीख दिली जाते. त्यानंतर पात्र कुटुंबांनी आपल्या नावाची नोंदणी करू घ्यावी. त्यानंतर प्रत्येक गावातील स्थानिक केंद्रावर मोबाईल नाव नोंदणी केंद्र स्थापन करून अशा नागरिकांची नोंदणी केली जाते. लाभार्थी त्यांची बायोमेट्रिक तपशील आणि छायाचित्रे देऊन नाव नोंदणी करतात नोंदणी शुल्क भरल्यावर नाव नोंदणी केल्यावर लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येते. याबरोबर निवडलेल्या रुग्णालयाची यादीची पुस्तिका लाभार्थी कुटुंबांना दिली जाते. जेणेकरून ते त्या रुग्णालयात जाऊन दर्जेदार आरोग्य सुविधेचा घेऊ शकतात एक फील्ड अधिकारी व सरकारी अधिकारी आहे तो विमा कंपनी स्मार्ट कार्ड कंपनीचे प्रतिनिधी नाव नोंदणी केंद्रावर उपस्थित असतात ते तुमचे नाव नोंदणी करून तुम्हाला स्मार्ट कार्ड देतील. स्मार्ट कार्ड दिलेल्या लाभार्थी कुटुंबाची यादी राज्य नोडल एजन्सीकडे पाठवली जाते.
राष्ट्रीय स्वास्थ विमा योजनेचा निधी
Rashtriya Swasthya Bima Yojana
RSBY केंद्र सरकार प्रति कुटुंब 750 अंदाजे वार्षिक प्रीमियमच्या 75 टक्के योगदान देते. याची मर्यादा वार्षिक 565 रुपये इतकी आहे. तसेच स्मार्ट कार्ड ची किंमत देखील कव्हर करण्यात आली आहे. वार्षिक प्रीमियमच्या उर्वरित 25 टक्के राज्य सरकारचे योगदान आहे. त्यामुळे दारिद्र रेषेखालील नागरिकांना ही सुविधा मोफत दिली जाते.
हॉस्पिटलिझेशन खर्च
रोग किंवा अपघाताच्या उपचारासाठी हॉस्पिटल खर्च समावेश करण्यात आला आहे. यात बोर्डिंग, नर्सिंग, सर्जन आणि भूलतज्ञशुल्क निदान, चाचण्या, औषधे आदी गोष्टींचा समावेश आहे. मात्र कव्हरेज मान्यताप्राप्त आरोग्य सुविधा वरच उपलब्ध आहेत.
फ्री हॉस्पिटलायझेशन
यामध्ये रुग्णालयामध्ये दाखल होण्यापूर्वी एक दिवस आधीपर्यंत औषधे आणि निदान चाचण्या समाविष्ट आहे.
पोस्ट-हॉस्पिटल: डिस्चार्ज मिळाल्यानंतर पाच दिवसापर्यंत शस्त्रक्रियेचा खर्च
वाहतूक खर्च: वाहतूक खर्च म्हणून शंभर रुपयांच्या खर्चाची प्रतिकृती करते वार्षिक 1 हजार रुपये मर्यादा
दंत उपचार: अपघातामुळे दंत उपचार घेतल्यास त्यावरही मदत दिली जाते.
डेकेअर ट्रीटमेंट: यामध्ये बाह्य रुग्ण क्रिया उपचाराचा समावेश करण्यात आला आहे.
मातृत्व लाभ: सामान्य आणि सिझेरियन प्रसूतीचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. पॉलिसीधारक नैसर्गिक प्रसुतीसाठी 2500 आणि सिझेरियन प्रसूतीसाठी 4500 साठी दावा करू शकतात.
नवजात कव्हरेज: विम्या अंतर्गत नवजात बालकांना देखील कव्हर करण्यात येते पॉलिसी कालावधी संपेपर्यंत याचा लाभ घेता येतो.
राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेत समाविष्ट काय नाही
Rashtriya Swasthya Bima Yojana Do Not Involve
- हॉस्पिटललायझेशन या योजनेअंतर्गत समाविष्ट नाही
- डॉक्टर ने दिलेले टॉनिक जीवनसत्व यांचा समावेश यामध्ये नाही.
- रूट कॅनॉल, कॉस्मेटिक दंत उपचार आणि पोकळी भरणे या सुविधा यामध्ये उपलब्ध नाहीयेत
- जन्मजात बाह्य रोगांचा अंतर्भाव नाही.
- प्लास्टिक शस्त्रक्रिया जोपर्यंत अपघात किंवा रोगामुळे होत नाही तोपर्यंत वगळण्यात आले आहेत.
- आयुष्य उपचार किंवा आरोग्यदायी काळजी देखील त्यातून वगळण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वास्थ विमा योजनेची पात्रता
Rashtriya Swasthya Bima Yojana Eligibility
बीपीएल कुटुंबातील असंघटित क्षेत्रातील कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
कामगाराच्या कुटुंबातील व्यक्तींनाही या योजनेचा लाभ दिला जातो याद्वारे कुटुंबातील पाच सदस्यांना लाभ दिला जातो.
या योजनेसाठी पात्र कामगाराची पात्रता
Rashtriya Swasthya Bima Yojana 2024 Eligibility
मनरेगा कामगार म्हणून पंधरा दिवसापेक्षा अधिक काम केले असावे.
स्वच्छता कर्मचारी, खान कामगार, रिक्षा चालक, ऑटो चालक, रेल्वेचे खोली, रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम कामगार, ज्यांची कल्याणकारी मंडळाने असणे आवश्यक आहे
राष्ट्रीय स्वस्त विमा योजनेअंतर्गत दावा करण्याची प्रक्रिया
Rashtriya Swasthya Bima Yojana 2024
लाभार्थी व्यक्तीने निवडलेल्या हॉस्पिटल मधील हेल्पडेस्कशी संपर्क साधावा
त्यानंतर स्मार्ट कार्ड दाखवून आपलं बोटाचा ठसा देऊन लाभार्थ्यांनी स्वतःची ओळख सत्यापित करावी
लाभार्थ्याची ओळख पटल्यानंतर लाभार्थ्याला रुग्णालयात कॅशलेस उपचार उपलब्ध करून दिले जातात
हॉस्पिटललायझेशन च्या बाबतीत RSBY हेल्प डेस्क वरील प्रतिनिधी ज्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे त्याचे पॅकेज दर असेल पॅकेज दर असलेली पूर्वनिर्दिष्ट यादी आहे जर रुग्णालयात दाखल होण्याचे कारण त्या यादीतील आजार किंवा दुखापतीमुळे असेल तर विहित दाव्याचे पॅकेज निवडले जाते
यादीमध्ये उपचार नमूद केल्यास प्रतिनिधी विमा कंपनीकडे उपचाराच्या लागू खर्चाबाबत तपासेल
त्यानंतर लाभार्थी रुग्णालयात कॅशलेस उपचार घेऊ शकतात
लाभार्थ्यांना डिस्चार्ज नंतर स्मार्ट कार्ड हेल्प डेस्कवर स्वाईप केले जाते आणि स्मार्ट कार्ड उपलब्ध असलेल्या कव्हरेज मर्यादेतून उपचाराची रक्कम वजा करण्यात येते.
रुग्णालय लाभार्थ्याला वाहतूक खर्चासाठी 100 रुपये देते
वाहतूक खर्चाचा दावा करण्यासाठी लाभार्थ्याला कोणत्याही प्रकारचा पुरावा सादर करावा लागत नाही
उपचार पूर्ण झाल्यानंतर आणि रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर हॉस्पिटल नंतर विमा कंपनी ला किंवा तिच्या TPA कडे उपचार आणि त्यासाठी लागणारा खर्च सांगणाऱ्या इलेक्ट्रॉनिक अहवाल पाठवते
वीमा कंपनी किंवा TPA सबमिट केलेल्या अहवालांचे पडताळणी करते त्यानंतर उपचारांच्या खर्चासाठी थेट हॉस्पिटलला पैसे देते.
ही पेमेंट एका विशिष्ट कालावधी दरम्यान केली जाते यावर हॉस्पिटल आणि विमा कंपनी यांच्यात सहमती असते.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024
महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट
महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024