Ration Card e-KYC 2025 In Marathi : ही आहे शेवटची तारीख
Ration Card e-KYC 2025 In Marathi : केंद्र सरकार देशातील गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबाला आणि शेतकरी यांना राशन कार्ड च्या माध्यमातून मोफत राशन वाटप करत असते. मात्र आता रेशन कार्ड ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे नागरिक आपल्या रेशन कार्ड ची केवायसी करणार नाही त्यांना रेशन मिळणार नाही.
Ration Card e-KYC त्यामुळे तुम्ही रेशनची ई-केवायसी केली आहे का? याची अंतिम तारीख ही सरकारने जाहीर केली आहे. चला तर मग आपण ई केवायसी ची शेवटची तारीख काय आहे? ई केवायसी म्हणजे काय? याची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Ration Card e-KYC देशभरातील सार्वजनिक वितरण प्रणाली पारदर्शक बनवण्यासाठी आणि केवळ पात्र लाभार्थ्यांनाच राशन चा लाभ दिला जावा यासाठी राशनधारकांसाठी ई केवायसी प्रक्रिया सरकारने अनिवार्य केली आहे. पुरवठा विभागाने प्रक्रियेची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे जर तुम्हालाही रेशन मिळत असेल आणि त्याचा लाभ पुढेही चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला 28 फेब्रुवारी पर्यंत आपल्या राशन वर असलेल्या संपूर्ण व्यक्तींची ई केवायसी करणे अनिवार्य आहे.
ई केवायसी न केल्यास?
Ration Card e-KYC जर तुमच्याकडे ही रेशन कार्ड असेल आणि तुम्ही मुदतीमध्ये ई केवायसी पूर्ण केली नाही तर तुमचे रेशन कार्ड Ration Card वरील नाव रद्द केले जाईल आणि अशांना सरकारी रेशन मिळणार नाही. सरकारने बोगस कार्डधारकांना रोखण्यासाठी केवायसी अनिवार्य केली आहे. त्यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर आपल्या जवळच्या रेशन कार्ड दुकानात जाऊन तुम्ही ही केवायसी करून घ्या.
कुठल्याही दुकानात करता येणार ई-केवायसी
तुमचे नाव कुठलेही गावात असू द्या तुम्ही कुठल्याही शहरात राहत असू द्या तुमच्या जवळच्या कुठल्याही रेशन कार्ड Ration Card वर जाऊन तुम्ही रेशन कार्ड ई केवायसी करू शकता.
ई केवायसी ची प्रक्रिया
E-KYC
- रेशन धारकांना आपल्या जवळच्या रेशन दुकानातील पॉस मशीन
- द्वारे ही केवायसी करणे आवश्यक आहे. ई केवायसी ही प्रक्रिया पुरवठा विभागाने गेल्या दोन वर्षापासून सतत सुरू ठेवली आहे. मात्र अद्यापही अनेक लाभार्थ्यांनी E-KYC केली नाही त्यामुळे आता पुन्हा एकदा 28 फेब्रुवारी पर्यंत ची तारीख वाढवून पुरवठा विभागाने सर्वांना ई केवायसी करण्याचे आवाहन केले आहे.
ई केवायसी साठीची कागदपत्रे
E-KYC Documents
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
ई केवायसी चे महत्व
Importance Of E-KYC
E-KYC ई केवायसीच्या माध्यमातून आणि आधार कार्डचा आधारे लाभार्थ्याची ओळख आणि पत्त्याची पडताळणी करण्यात येते. यामुळे बोगस नोंदी टाळण्यास मदत होत आहे. शिधापत्रिकेत नमूद असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे सत्यापन करणे अनिवार्य आहे. सत्यापन न झाल्यास संबंधित व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मधून वगळले जाणार आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी त्या व्यक्तीची असेल.
लाभार्थ्यांनी अंतिम तारखेपूर्वी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून रेशन पुरवठा कायम ठेवावा असे आव्हान पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपल्या जवळच्या रेशन कार्ड दुकानात जाऊन आपल्या रेशन कार्ड ची केवायसी करून आपला पुरवठा सुरू ठेवावा.