ration card KYC Last Date 2025 in marathi : हे काम आधी करा अन्यथा रेशन होईल बंद
ration card KYC Last Date अजून पर्यंत तुम्ही रेशन कार्ड ची इकेवायसी केली नसेल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण रेशन कार्ड ची केवायसी करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे.
ration card KYC Last Date जर तुम्ही अजूनही केवायसी केली नसेल तर तुमचे रेशन कार्ड आता बंद होऊ शकते, चला तर मग कोणती आहे शेवटची तारीख हे आपण पाहूया.
ration card KYC केंद्र सरकारने देशभरातील रेशन कार्डधारकांसाठी ही केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ही केवायसी करण्याची अंतिम तारीख सरकारने तीन वेळेस वाढवली आहे. मात्र अजूनही अनेक राशन कार्डधारकांनी आपली केवायसी केलेली नाही.
मात्र आता जर तुम्ही ही केवायसी केली नाही तर तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते. ई-केवायसी करण्याची प्रक्रिया ही खूप सोपी आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही रेशन कार्ड ची केवायसी करू शकता.
ration card KYC केंद्र सरकारने रेशन कार्ड ई केवायसी आवश्यक केली आहे. ई – केवायसी करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे. त्यामुळे देशातील ज्या नागरिकांनी अजूनही रेशन कार्ड ची इकेवायसी केलेली नाही त्यांनी तात्काळ जवळच्या रेशन कार्ड दुकानात जाऊन आपली ई केवायसी करून घ्यावी. अन्यथा त्यांचा रेशन कार्ड बंद होऊ शकतो.
तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने ही केवायसी करता येते. जर तुम्ही ही केवायसी केली नाही तर तुम्हाला इथून पुढे रेशनचा लाभ मिळणार नाही.
यापूर्वी रेशन कार्ड ई केवायसी करण्याची 31 मार्च ची शेवटची तारीख होती मात्र त्यानंतर ही मर्यादा वाढवून 30 जून 2025 करण्यात आली.
ई-केवायसी करण्याची ऑफलाइन पद्धत
ration card KYC Offline Process
ही ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही जवळच्या रेशन कार्ड दुकानात किंवा सीएससी केंद्रात जाऊन करू शकता.
तुमच्याजवळ रेशन कार्ड आणि सर्व कुटुंबाचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. यानंतर रेशन दुकानदार बायोमेट्रिक वेरिफिकेशन करतील. त्यानंतर तुमच्या आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक होईल आणि तुमची केवायसी पूर्ण होईल.
ऑनलाइन पद्धतीने केवायसी
ration card KYC Online Process
सर्वात प्रथम तुम्हाला मेरा रेशन किंवा आधार फेस आरडी ॲप डाऊनलोड करायचे आहे. त्यानंतर त्यावर आधार नंबर टाकून ओटीपी व्हेरिफिकेशन करावे लागेल. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मोबाईलच्या कॅमेऱ्यातून फेस स्कॅन करावे लागेल. त्यानंतर तुमची ई केवायसी प्रक्रिया अशा सोप्या पद्धतीने पूर्ण होऊन जाईल.