Ration Card Rules In Marathi : केंद्र आणि राज्य सरकारचा मोठा निर्णय, रेशन कार्डचे 5 नियम बदलले

Ration Card Rules 2026 In Marathi : तुमचं नाव यादीतून कट होणार?

Ration Card Rules In Marathi : केंद्र आणि राज्य सरकारने रेशन कार्ड वरील नियम बदलले आहेत. हे नियम 1 एप्रिल 2026 पासून अनिवार्य केले जातील. ई-केवायसी ही अनिवार्य होणार आहे आणि उत्पन्न मालमत्ता निकष लागू केले जातील.

Ration Card Rules अलीकडे सरकारने रेशन कार्ड पात्रतेबाबत नवीन नियम जारी केले आहेत. ‘एक राष्ट्र एक रेशन कार्ड’ ही संकल्पना अधिक प्रभावी करण्यासाठी 1 एप्रिल 2026 पासून रेशन कार्ड नियमांमध्ये बदल केले जातील. Ration Card या नवीन बदलामुळे देशभरातील लाखो अपात्र लाभार्थ्यांची नावे रेशन कार्ड च्या यादीतून कायमची काढून टाकली जाण्याची अपेक्षा आहे.

Ration Card Rules 2026 In Marathi : केंद्र आणि राज्य सरकारने रेशन कार्ड साठी जे निकष लागू केले आहेत ते 1 एप्रिल पासून लागू होतील. फक्त गरजू आणि खऱ्या लाभार्थ्यांनाच मोफत धान्य मिळावे या उद्देशाने हे नियम लागू करण्यात आले आहेत.

यासाठी उत्पन्न आणि मालमत्तेची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जर यापैकी कोणतीही अट लागू झाली तर तुमचे रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला ई-केवायसी करणे देखील अनिवार्य करण्यात आलेले आहे. प्रशासकीय प्रक्रिया देखील कडक करण्यात आल्या आहेत.

Ration Card New Rules In Marathi सर्व रेशन कार्ड धारकांनी त्यांच्या जवळील रेशन दुकानात जाऊन आधार पडताळणी करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे असे न केल्यास रेशन कार्ड निलंबित केले जाईल. अनेक नागरिक त्यांची सत्य स्थिती लपवून रेशनचा लाभ घेत आहेत.

प्रशासनाने अशा व्यक्तींना कडक इशारा दिला आहे. जर चौकशी दरम्यान कोणतीही खोटी माहिती आढळून आली तर बाजारभावाने खरेदी केलेल्या धान्याची वसुलीसह त्याचे रेशन कार्ड रद्द केली जाईल. या व्यतिरिक्त कायदेशीर कारवाई केली जाईल.

सरकारच्या या निर्णयामुळे गरजू कुटुंबांना धान्य पुरवठा व्यवस्थित पुरवला जाईल अशी अपेक्षा आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार या नवीन पडताळणी प्रक्रियेमुळे देशभरातील अंदाजे 70 लाख अपात्र रेशन कार्ड निलंबित होण्याची अपेक्षा आहे.

काय आहे पात्रता

Ration Card Rules

  • शहरी भागात 3 लाखांपेक्षा जास्त आणि ग्रामीण भागात 2 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेले कुटुंब रेशन कार्ड योजनेसाठी अपात्र ठरतील.
  • चार चाकी वाहन असलेल्या कुटुंबांना रेशनचा लाभ मिळणार नाही.
  • 100 चौरस मीटर पेक्षा जास्त आकाराचा प्लॉट, फ्लॅट किंवा पक्के घर असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आयकर भरल्यास संपूर्ण कुटुंबाचे रेशन कार्ड रद्द केले जाईल.
  • एसी किंवा जनरेटर सारख्या सुविधा असलेली घरे देखील रेशन कार्ड च्या यादीतून वगळली जाणार आहे.