ration e kyc 2025 In Marathi : आता घरबसल्या करता येणार केवायसी

e kyc for ration 2025 In Marathi : 31 मार्चपर्यंत करता येणार केवायसी

ration e kyc 2025 In Marathi : सरकारने शिधापत्रिका धारकांसाठी e kyc करणे बंधनकारक केले आहे रेशन दुकानात जाऊन ई-पॉज मशीनद्वारे e kyc नागरिकांना करावी लागत आहे. त्यासाठी आतापर्यंत अनेक जणांनी केवायसी केली आहे.

ration e kyc 2025 परंतु अनेक नागरिकांची ठेवायची राहिलेली आहे त्यासाठी सरकारने आता एक याची मुदत वाढ केली आहे आता केवायसी ची तारीख 31 मार्च पर्यंत वाढवली आहे.

ration e kyc 2025 रेशन दुकानातून ई-पॉज मशीन द्वारे मोफत केवायसी केली जात जाते. परंतु लहान मुले आणि वृद्ध लोकांना बोटांचे ठसे आणि डोळ्यांद्वारे स्कॅन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने एक ॲप तयार केले आहे.

ration e kyc त्या ॲपद्वारे तुम्ही मोबाईल मध्ये घरबसल्या देखील आता केवायसी करू शकणार आहात. याचे नाव आहे Mera E-KYC आता लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता अगदी घरबसल्या केवायसी करता येणार आहे आणि त्यात आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी घरबसल्या काही मिनिटातच e-kyc पूर्ण करू शकतील.

e kyc for ration राज्य सरकारने NIC च्या सहकार्याने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी Mera E-KYC हे ॲप सुरू केले आहे. त्यामुळे आता नागरिकांना बाहेर जाऊन केवायसी करण्याची काहीही आवश्यकता नाही. चला तर मग या लेखाच्या माध्यमातून आपण या ॲपची संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

काय आहेत वैशिष्ट्ये

e kyc for ration Purpose

  • घरबसल्या सोप्या पद्धतीने E-KYC करता येणार
  • फेस ऑथेंटीकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी होईल
  • रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही सदस्य इ केवायसी करू शकेल
  • आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे
ration e kyc

कशी कराल ई-केवायसी

How to do e-KYC

तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर मधून 2 ॲप इंस्टॉल करा.
1 Mera E-KYC मोबाईल ॲप
2 Aadhar Face RD Service App

दोन्ही ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ॲप उघडा त्यामधील पुढील स्टेप फॉलो करा Step By Step Follow

राज्य निवडा
आधार क्रमांक टाका
मोबाईल वर ओटीपी येईल तो प्रविष्ट करा
त्यानंतर कॅपच्या कोड टाका

चेहऱ्याद्वारे पडताळणी करा

स्वतःसाठी समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करून घ्या
स्क्रीनवर दिलेल्या सूचनानुसार डोळ्यांची उघडझाप करा
दुसऱ्या व्यक्तीची केवायसी करत असल्यास बॅक कॅमेरा चा वापर करा

सत्यापन पूर्ण करा

यशस्वी पडताळणी झाल्यास लाभार्थ्याची माहिती रास्त भाव दुकानाच्या मशीन वर दिसेल याची खात्री करण्यासाठी ॲप मध्ये इ केवायसी स्टेटस तपासा जर E-KYC Status ‘Y’ दिसत असेल तर तुमची प्रक्रिया यशस्वी झालेली आहे.

थोडक्यात पण महत्त्वाचे

ही सेवा फक्त महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत
महाराष्ट्र बाहेर स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी IMPDS KYC पर्यायाचा उपयोग करावा
यासाठी ची शेवटची तारीख 31 मार्च 2025