Sanjay Gandhi Niradhar Yojana information : संजय गांधी निराधार योजना 2024
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 in marathi महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत आहे. अशीच एक योजना आम्ही आज तुमच्या समोर या लेखातून मांडणार आहोत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील निराधार व्यक्ती, अंध व्यक्ती, अपंग व्यक्ती, अनाथ मुले, मोठे आजार, घटस्फोटीत महिला, दुर्लक्ष महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर इत्यादींचा समावेश असेल. संजय गांधी निराधार योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana ही केंद्र सरकारने 1980 रोजी सुरू केलेली योजना आहे. आर्थिक मदत मिळावी या हेतूने सुरू करण्यात आलेल्या योजनेची माहिती संजय गांधी निराधार योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana या लेखातून घेणार आहोत. या लेखांमध्ये आपण संजय गांधी निराधार योजना म्हणजे? काय आहे या योजनेचे उद्देश? या योजनेची वैशिष्ट्ये? यासाठी मिळणारे लाभाची रक्कम? या योजनेसाठी अर्ज कसा करावा? याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी व्यक्तीला 1500 रुपये दरमहा सरकार आर्थिक मदत करणार आहे.
ठळक मुद्दे :
संजय गांधी निराधार योजनेची थोडक्यात माहिती
संजय गांधी निराधार योजनेचा उद्देश
संजय गांधी निराधार योजनेची वैशिष्ट्ये
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठीची वयोमर्यादा
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा कोणाला मिळेल लाभ
या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी प्रक्रिया
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ
संजय गांधी निराधार योजनेसाठी ची पात्रता
संजय गांधी निराधार योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
संजय गांधी निराधार योजनेचा ऑफलाईन अर्ज कसा करावा
संजय गांधी निराधार योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
संजय गांधी निराधार योजना हेल्पलाइन नंबर
FAQ
संजय गांधी निराधार योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | संजय गांधी निराधार योजना |
कधी सुरू झाली | 1980 |
कोणी सुरू केली | केंद्र शासन |
लाभार्थी | राज्यातील निराधार व्यक्ती |
लाभ रक्कम | 1500 रुपये दरमहा |
उद्देश | समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन / ऑनलाईन |
अधिकृत वेबसाइट | https://aaplesarkar.mahaonline.gov.in |
आभा कार्ड बनवा आणि डिजिटल व्हा वाचा : https://yojanamazi.com/abha-card-yojana-2024-in-marathi/
संजय गांधी निराधार योजनेचा उद्देश
Purpose of Sanjay Gandhi Niradhar Yojana
देशभरात जे निराधार व्यक्ती आहेत त्यांना दर महिन्याला आर्थिक मदत देणे हा संजय गांधी निराधार योजनेचा Sanjay Gandhi Niradhar Yojana मुख्य उद्देश आहे.
राज्यातील निराधार व्यक्तींचे जीवनमान सुधारणे.
निराधार व्यक्तींना आत्मनिर्भर बनवणे.
राज्यातील निराधार व्यक्तींचा आर्थिक विकास तसेच सामाजिक विकास व्हावा.
राज्यातील निराधार व्यक्ती दैनंदिन खर्चासाठी कोणावर अवलंबून राहू नये त्यांना दुसऱ्यांसमोर आर्थिक मदत मागण्याची गरज पडू नये हा उद्देश संजय गांधी निराधार योजनेचा आहे.
संजय गांधी निराधार योजनेची वैशिष्ट्ये
Features of Sanjay Gandhi Niradhar Yojana
Sanjay Gandhi Niradhar Yojana संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात केंद्र शासनाने केली आहे.
या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदाराला किती आपत्य आहेत याची अट नाही.
अनाथ मुले-मुली यांना या योजनेचा लाभ मिळेल.
संजय गांधी निराधार योजनेचा Sanjay Gandhi Niradhar Yojana अर्ज करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धती आहेत ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्ही घरी बसल्या या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचतील.
या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम ही लाभार्थ्याच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येईल.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठीची वयोमर्यादा
संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज करण्यासाठी व्यक्तीचे वय हे 60 वर्षापेक्षा कमी असावे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न
या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 21 हजार पेक्षा जास्त नसावे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा कोणाला मिळेल लाभ
निराधार व्यक्ती तुरुंगात शिक्षा भोगत असलेले कैद्यांची पत्नी
अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री-पुरुष
अनाथ मुले
घटस्फोटीत महिला ज्यांची पोटगी झालेली नाही.
मोठ्या आजाराने ग्रस्त झालेले व्यक्ती
दुर्लक्षित महिला
वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया
अत्याचारी महिला
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी
कर्करोग, पक्षाघात, क्षयरोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचे घर न चालवू शकणारे पुरुष व महिला
या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी प्रक्रिया
Sanjay Gandhi Niradhar Yojana दरवर्षी 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधी दरम्यान लाभार्थ्यांना त्यांचे ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते आहे तेथील मॅनेजरकडे किंवा पोस्ट मास्तरकडे हजर राहावे लागेल. म्हणजे ते हयात असल्याची नोंद मॅनेजर किंवा पोस्ट मास्टर त्यांच्या नोंदवहीत करतील. जर कोणत्याही कारणामुळे लाभार्थी हजर राहू शकला नाही, तर त्याला नायब तहसीलदार यांच्यासमोर हजर राहून हयातीबाबतचे प्रमाणपत्र संबंधित तहसीलदाराकडे द्यावे लागेल. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची पात्रता तपासणी प्रत्येक वर्षातून एकदा होते. या तपासणी दरम्यान जर एखादा लाभार्थी अपात्र ठरत असेल तर त्या लाभार्थीस त्याचे कारण सांगून त्याचा लाभ त्वरित बंद करण्यात येईल.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ
Benefits of Sanjay Gandhi Niradhar Yojana
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत Sanjay Gandhi Niradhar pension Yojana लाभार्थ्याला 1500 रुपयांची दरमहा आर्थिक मदत करण्यात येते. ज्या कुटुंबात एकापेक्षा अधिक लाभार्थी आहेत त्या कुटुंबाला 1500 रुपये दरमहा आर्थिक मदत करण्यात येते.
निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
निराधार व्यक्तींचे जीवनमान सुधारेल .
निराधार व्यक्तींचा आर्थिक विकास होईल.
निराधार व्यक्ती हे आत्मनिर्भर बनततील.
संजय गांधी निराधार योजनेसाठी ची पात्रता
Eligibility of Sanjay Gandhi Niradhar Yojana
अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांना होईल.
अर्जदार व्यक्तीचे कुठल्याच प्रकारचे मिळकतीचे साधन नसावे.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना या योजनेचा लाभ घेत येईल.
अर्जदाराच्या नावाने जमीन असता कामा नये.
अर्जदार हा कमीत कमी पंधरा वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
अर्जदाराचे वय 60 वर्षापेक्षा कमी असावे.
अर्जदार हा केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे योजनेतील कोणत्याही पेन्शनचा लाभ मिळवत असल्यास त्या अर्जदाराला या योजनेचा लाभ होणार नाही.
ज्यांना मुलं मुली आहेत त्यांना जो आर्थिक लाभ मिळेल तो लाभ ते सज्ञान होईपर्यंत संबंधित पालकांना देण्यात येईल.
लाभार्थी व्यक्तीला जर फक्त मुलीच असतील तर त्या मुलीचे वय 25 वर्षाचे होईपर्यंत किंवा त्या अविवाहित असेपर्यंत लाभ मिळेल.
कुटुंबातील मुलाला नोकरी मिळाल्यानंतर मुलाचे व कुटुंबाचे उत्पन्न लक्षात घेऊन पुढील लाभ देण्यास पात्र आहे की नाही हे ठरवण्यात येईल.
एखाद्या लाभार्थीचा मृत्यू झाल्यास त्याचे आर्थिक मदत बंद होईल.
लाभार्थ्यांचा मृत्यू ज्या तारखेला झालेला आहे त्या तारखेपर्यंत जर काही थकबाकी निघत असेल ती रक्कम त्या तारखेपर्यंतचा हिशोब करून ती लाभाची रक्कम त्याच्या पती / पत्नीला किंवा कायदेशीर वारसाला देण्यात येईल.
मुलींचे लग्न होईपर्यंत किंवा मुलीला नोकरी लागेपर्यंत या योजनेचा लाभ मिळेल त्यानंतर नोकरीमध्ये नोकरीच्या अनुषंगाने मुलीचे उत्पन्न आणि कुटुंबाचे उत्पन्न या दोन्हींचा विचार करून लाभार्थ्याची पुढील पात्रता ठरविण्यात येईल
अपंग व्यक्ती जी अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद अशी आहेत जी किमान 40 टक्के अपंगत्व आहेत असे स्त्री-पुरुष या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असते.
घटस्फोटीत महिलांना या योजनेचा लाभ होईल त्यात अशा घटस्फोटीत महिला ज्यांचा घटस्फोट झालाय परंतु पोटगी मिळालेली नाही.
मुलीचे लग्न झाल्यानंतर तिच्या पालक कुटुंबाला हा लाभ पुढे चालू ठेवता येईल.
संजय गांधी निराधार योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Documents of Sanjay Gandhi Niradhar Yojana
अर्जदाराचा फोटो
पॅन कार्ड
आधार कार्ड
मतदान कार्ड
निमशासकीय ओळखपत्र
आरएसबीवाय कार्ड
ड्रायव्हिंग लायसन्स
रहिवाशी प्रमाणपत्र
किमान 15 वर्षापासून राज्याचा रहिवासी
दुर्धर आजाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन)
शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकाचा दाखला
उत्पन्नाचा दाखला
दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याचा साक्षांकित उतारा
वयाचा पुरावा कोणताही एक
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
निवडणूक मतदार यादी किंवा शिधापत्रिकेमध्ये नमूद केलेला वयाचा उतारा
ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या जन्मा नोंदवहीतील प्रत
ग्रामीण नागरी दवाखान्याच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा किंवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या वयाचा दाखला.
संजय गांधी निराधार योजनेचा ऑफलाईन अर्ज कसा करावा
Sanjay Gandhi Niradhar Yojana offline form
संजय गांधी निराधार योजनेचा ज्या व्यक्तीला लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीला आपल्या जवळील जिल्हा कार्यालयात, तहसीलदार कार्यालयात जाऊन संजय गांधी निराधार योजनेचे संबंधित अधिकारी आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुमच्या फॉर्म मध्ये अचूकपणे भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून तो फॉर्म तुम्हाला त्या अधिकाऱ्यांजवळ जमा करावा लागेल.
अशा प्रकारे तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
संजय गांधी निराधार योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
Sanjay Gandhi Niradhar Yojana Online Application
संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर aaplesarkar.mahaonline.gov.in जावे लागेल
वेबसाईटवर क्लिक करताच क्षणी तुमच्या समोर एक होम पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला नवीन युजर नोंदणी नाव दिसेल.
नवीन युजर नोंदणी वर क्लिक करताच एक नवीन पेज उघडेल. त्यामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती त्यात भरावी लागेल. जसे की तुमचे नाव, वडिलांचे नाव, वय, लिंग, व्यवसाय, मोबाईल नंबर, पत्ता, ओळखीचा पुरावा, फोटो इत्यादि
ही सर्व माहिती काळजीपूर्वक भरून झाल्यावर खाली तुम्हाला नोंदणी करा हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
नंतर तुमच्यासमोर संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म उघडेल.
त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही लिहिलेली माहिती अचूक आहे ना याची खात्री करून सबमिट या बटनवर क्लिक करा.
अशा अगदी सोप्या पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेचा ऑनलाईन फॉर्म पूर्ण करू शकता.
संजय गांधी निराधार योजना हेल्पलाइन नंबर 1800-120-8040
FAQ
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा?
अर्जदाराचे वय 60 वर्षापेक्षा कमी असावे.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न किती असावे?
संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपयापेक्षा कमी असावे.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत किती रुपयांची आर्थिक मदत मिळते?
दरमहा 1500 रुपये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यास मिळते.