SBI Stree Shakti Yojana 2024 Information : स्त्री शक्ती योजना मराठी माहिती
SBI Stree Shakti Yojana 2024 : नमस्कार वाचकहो आजच्या लेखात आपण स्त्री शक्ती योजना या बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांसाठी नवनवीन योजना राबवत आहे. महिलांना सक्षम बनवण्यासाठी, महिलांचे समाजात उच्च स्थान निर्माण होण्यासाठी, महिलांचे समाजात आर्थिक स्थान वाढविण्यासाठी सरकारने आतापर्यंत भरपूर योजना राबविल्या आहेत. त्यातच केंद्र सरकारने महिलांसाठी स्त्री शक्ती योजना सुरू केली आहे. स्त्री शक्ती योजनेदरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया SBI महिलांना अत्यंत कमी व्याजदरात त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देते. यामुळे या योजने अंतर्गत महिलांना कर्ज देऊन स्वतःची कंपनी सुरू करण्यासाठी सक्षम बनविले जाते. या योजनेद्वारे महिलांना कर्ज मिळण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही आणि त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा राहता येते. महिला या योजनेमुळे आत्मनिर्भर आणि सक्षम बनतात. तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्त्री शक्ती योजनेद्वारे Stree Shakti Yojanaकर्ज घेऊन तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
SBI Stree Shakti Yojana 2024केंद्र सरकार आणि राज्य सरकारने महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी स्त्री शक्ती योजना सुरू केली आहे. ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु त्यांच्याकडे तेवढे भाग भांडवल नाहीये. अशा महिलांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार स्त्री शक्ती योजनेतून कर्ज उपलब्ध करून देत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया महिलांना या योजनेअंतर्गत अत्यंत कमी व्याज दराने कर्ज देते. स्त्री शक्ती योजनेअंतर्गत महिलांना कर्ज घेण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय अगदी सुरळीत आणि सहज सुलभपणे सुरू करता येतो. आजच्या लेखात आपण SBI स्त्री शक्ती योजना म्हणजे काय? SBI स्त्री शक्ती योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, फायदे, स्त्री शक्ती योजनेचा कोणाला होतो लाभ? स्त्री शक्ती योजनेची आवश्यक कागदपत्रे, स्त्री शक्ती योजनेची अर्ज प्रक्रिया, याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
स्त्रीशक्ती योजना म्हणजे काय?
What Is Stree Shakti Yojana
SBI Stree Shakti Yojana सरकारने महिलांकरिता अनेक नवनवीन योजना राबविल्या आहेत. समाजात महिलांना उच्च स्थान प्राप्त व्हावे, समाजात महिलांना त्यांचे आर्थिक स्थान मिळावे, यासाठी सरकारने स्त्री शक्ती योजना Stree Shakti Yojana सुरू केली आहे. स्त्रीशक्ती योजनेअंतर्गत महिलांना सरकारमार्फत पाच लाख रुपये कर्ज दिले जाते. त्यासाठी काहीही तारण ठेवण्याची आवश्यकता नाही. तसेच या कर्जावरील व्याजदर हा अत्यंत कमी व्याजदर आहे. सरकारने स्त्रीशक्ती योजनेची सुरुवात 19 नोव्हेंबर 2022 रोजी महिला उद्योजक दिनाचे औचित्य साधून ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना अत्यंत कमी व्याजदर आणि 5 लाख रुपयांचे विनातारण कर्ज उपलब्ध करून दिले जाते. देशातील व्यवसायाचा विचार केला तर त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पुरुषांचा सहभाग आहे. महिलांचा व्यवसायात कमी सहभाग आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने स्त्रीशक्ती योजना सुरू केली आहे. स्त्रीशक्ती योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थान दिले जाणार आहे. अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांच्याजवळ भाग भांडवल नसल्यामुळे त्या त्यांचा व्यवसाय सुरू करू शकत नाही. अशा महिलांना या योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया कडून 25 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळते. या कर्जाचे व्याजदर हे अत्यंत कमी व्याजदर आहे. जर एखाद्या महिलेला एसबीआय स्त्रीशक्ती योजनेअंतर्गत SBI Stree Shakti Yojana कर्ज मिळवायचे असेल, तर तिचा व्यवसायामध्ये किमान 50 टक्के हिस्सा असणे आवश्यक आहे. स्त्री शक्ती योजनेलाच महिला शक्ती योजना म्हणून देखील ओळखले जाते. ग्रामीण भागातील सूक्ष्म, लघु, मध्यम आकाराच्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित केले जाते. या योजनेअंतर्गत महिलांना 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अत्यंत कमी व्याज दरात मिळते. याशिवायत अत्यंत कमी कागदपत्रे या कर्जासाठी घेतले जातात. या योजनेचा अर्ज करण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत दिलेली आहे. या योजनेमुळे महिला त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. त्यांचा आर्थिक विकास होतो. या योजनेअंतर्गत महिलांना सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. यासाठी महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करत असताना सरकार मार्फत महिलांना 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. यात विशेष बाब अशी की, या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी काहीही तारण ठेवण्याची आवश्यकता नाही. केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेसोबत सहकारी करार केलेला आहे. एसबीआय बँकेची शाखा ही संपूर्ण देशात असल्यामुळे या बँकेच्या माध्यमातून महिलांना वेळेवर कर्ज मिळू शकते. लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने स्त्री शक्ती योजना सुरू केली आहे. यामुळे महिला त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात. या योजनेअंतर्गत महिलांना कर्ज घेते वेळेस कोणतीही अडचणी येणार नाही.
SBI Stree Shakti Yojanaकेंद्र सरकारने स्त्री शक्ती योजना सुरू केल्यामुळे महिला आता त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील, कुटुंबाला हातभार लावू शकतील, आर्थिक मदत करू शकतील, त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतील. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या मदतीने केंद्र सरकारकडून देशातील महिलांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत सरकारमार्फत महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 25 लाख रुपये पर्यंतचे अत्यंत कमी व्याज दराने कर्ज मिळते.
ठळक मुद्दे :
स्त्रीशक्ती योजना म्हणजे काय?
What Is Stree Shakti Yojana
स्त्रीशक्ती योजनेची थोडक्यात माहिती
SBI Stree Shakti Yojana In Short
एसबीआय स्त्रीशक्ती योजनेची वैशिष्ट्ये
SBI Stree Shakti Yojana Features
स्त्रीशक्ती योजनेचे उद्देश
Stree Shakti Yojana Purpose
स्त्री शक्ती कर्ज योजनेचे फायदे
SBI Stree Shakti Yojana Benefits
स्त्री शक्ती योजनेअंतर्गत कर्ज रक्कम
SBI Stree Shakti Yojana 2024
स्त्रीशक्ती योजनेअंतर्गत समाविष्ट असलेले व्यवसाय
SBI Stree Shakti Yojana 2024
स्त्री शक्ति योजनेचा व्याजदर
SBI Stree Shakti Yojana Interest Rate
स्त्री शक्ती योजनेसाठीची पात्रता
Stree Shakti Yojana Eligibility
स्त्री शक्ती योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
SBI Stree Shakti Yojana Documents
स्त्री शक्ती योजना अर्ज प्रक्रिया
Stree Shakti Yojana Apply
FAQ’s स्त्री शक्ती या योजनेअंतर्गत वारंवार विचारली जाणारी प्रश्न
स्त्रीशक्ती योजनेची थोडक्यात माहिती
SBI Stree Shakti Yojana In Short
योजनेचे नाव | स्त्री शक्ती योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
विभाग | स्टेट बँक ऑफ इंडिया |
लाभार्थी | अशा महिला ज्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे |
उद्देश | देशातील महिलांना स्वावलंबी बनवणे |
कर्ज रक्कम | 25 लाख रुपयेपर्यंत कर्ज |
लाभ | अत्यंत कमी व्याजदर |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://sbi.co.in/ |
एसबीआय स्त्रीशक्ती योजनेची वैशिष्ट्ये
SBI Stree Shakti Yojana Features
- SBI Stree Shakti Yojana स्त्रीशक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार मार्फत 25 लाख रुपये यांची आर्थिक मदत मिळते.
- एसबीआय देशातील महिलांना स्त्री शक्ती योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी वित्त पुरवठा देते
- Stree Shakti Yojana या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कर्जाचा व्याजदर हा अत्यंत कमी आहे.
- महिलांसाठी हे कर्ज अनेक श्रेणींमध्ये उपलब्ध असल्यामुळे मार्जिन 5% ने कमी होऊ शकते.
- जर एखाद्या महिलेला 5 लाख रुपयांचे कर्ज हवे असेल तर तिला कोणत्याही प्रकारचे तारण ठेवण्याची आवश्यकता नाही.
- या व्यवसायांतर्गत महिलेला 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक कर्ज हवे असेल तर तिला 0.5% कमी व्याजदर लागेल
- Stree Shakti Yojana स्त्री शक्ती योजनेअंतर्गत 50,000 रुपयांपासून ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिला त्यांचा लघुउद्योग सुरू करू शकतात.
- या योजनेमुळे महिला स्वावलंबी तसेच सशक्त बनतात.
स्त्रीशक्ती योजनेचे उद्देश
Stree Shakti Yojana Purpose
- देशभरातील महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने एसबीआय बँके मार्फत 25 लाख रुपये पर्यंतचे कर्ज महिलांना देते. जेणेकरून महिला स्वावलंबी बनतील आणि त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेमुळे देशातील महिला स्वावलंबी बनतात.
- केंद्र सरकार या योजने अंतर्गत महिलांना एसबीआय बँकेत कडून 25 लाख रुपयांचे कर्ज मिळते.
- Stree Shakti Yojana या योजनेचा उद्देश म्हणजे महिला सक्षमीकरणाला चालना देणे हा आहे.
- या योजनेमुळे महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनतात.
- या योजनेमुळे महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास होतो.
स्त्री शक्ती कर्ज योजनेचे फायदे
SBI Stree Shakti Yojana Benefits
- या योजनेचा व्याज कर्ज चा व्याजदर हा अत्यंत कमी आहे.
- स्त्री शक्ती योजनेचा अंतर्गत महिलांना त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारमार्फत 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.
- Stree Shakti Yojana स्त्रीशक्ती योजनेअंतर्गत नोंदणी कंपन्यांना 50,000 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.
- जर एखाद्या महिलेला स्त्री शक्ती योजनेअंतर्गत 2 लाख रुपये किंवा त्या अधिक कर्ज घ्यायचे असेल तर त्या महिलेला 5% कमी व्याज द्यावे लागते.
- एखाद्या महिलेला 50,000 रुपये पर्यंतचे कर्ज हवे असेल तर तिला कुठल्याही प्रकारचे तारण ठेवण्याची आवश्यकता नाही.
स्त्री शक्ती योजनेअंतर्गत कर्ज रक्कम
SBI Stree Shakti Yojana 2024
किरकोळ व्यापारी | व्यवसाय उपक्रम | व्यावसायिक | एस एस आय |
50 हजार ते 2 लाख | 50 हजार ते 2 लाख | 50 हजार ते 25 लाख | 50 हजार ते 25 लाख |
स्त्रीशक्ती योजनेअंतर्गत समाविष्ट असलेले व्यवसाय
SBI Stree Shakti Yojana 2024
दुग्ध व्यवसाय
कपडा व्यवसाय
घरगुती उत्पादने
शेती उत्पादन
पापड बनवण्याचा व्यवसाय
कॉस्मेटिक वस्तू किंवा ब्युटी पार्लरचा व्यवसाय
कुटीर उद्योग
पशुपालन करणाऱ्यांसाठी कडबा कुटती योजना फायद्याची
प्रक्रिया उद्योगातून व्हा आत्मनिर्भर
स्त्री शक्ति योजनेचा व्याजदर
SBI Stree Shakti Yojana Interest Rate
एसबीआय स्त्रीशक्ती योजनेअंतर्गत एखाद्या महिलेला दोन लाख रुपये किंवा त्याहून अधिक कर्ज घ्यायचे असेल तर त्या महिलेला 0.5% कमी व्याज दराने कर्ज मिळते.
वैयक्तिक श्रेणींसाठी लागू असलेले मार्जिन 5% ने कमी केले जाईल.
तसेच कर्ज घेतलेल्या रकमेनुसार कर्जाचे व्याजदर बदलतात.
स्त्री शक्ती योजनेसाठीची पात्रता
Stree Shakti Yojana Eligibility
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला ही भारतीय रहिवासी असणे बंधनकारक आहे.
या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच होईल.
या योजनेअंतर्गत कर्ज किरकोळ व्यवसाय, सेवा प्रधात्यांसारख्या छोट्या व्यवसायांसाठी देखील या योजनेचा लाभ घेता येईल.
कंपनीचा 50 % हिस्सा जर एखाद्या महिलेकडे असेल तर ती महिला या योजनेच्या कर्जासाठी पात्र असेल.
डॉक्टर, लेखापाल आणि वास्तुविशारद यासारख्या छोट्या कर्मचारी सेवांमध्ये काम करणाऱ्या महिला या व्यवसाया अंतर्गत कर्ज घेण्यासाठी पात्र असतील.
स्त्री शक्ती योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
SBI Stree Shakti Yojana Documents
आधार कार्ड
मतदान कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
कंपनी मालकीचे प्रमाणपत्र
भागीदारी कंपनी असेल तर बँक स्टेटमेंट आणि त्याची आवश्यक कागदपत्रे
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचे फोटो
मागील दोन वर्षांचा पुराव्यासह व्यवसाय योजना नफा व तोटा विवरण
स्त्री शक्ती योजना अर्ज प्रक्रिया
Stree Shakti Yojana Apply
स्त्री शक्ती योजनेचा SBI Stree Shakti Yojana अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धत वापरावी लागेल.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भेट द्यावी लागेल.
बँकेत गेल्यानंतर कर्ज संबंधित कर्मचाऱ्यांची भेट घ्या.
बँक कर्मचाऱ्यांकडून या योजनेच्या कर्ज संबंधित संपूर्ण माहिती घ्या.
त्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज मिळेल.
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा.
त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे या अर्जासोबत जोडा.
त्यानंतर हा अर्ज बँक कर्मचाऱ्यांकडे जमा करा.
बँक कर्मचारी आणि मॅनेजर तुमच्या अर्जाची छाननी करतील, त्यानंतर तुमची कर्ज रक्कम तुमच्या बँक खात्यात 24 ते 48 तासाच्या आत जमा होईल.
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही स्त्रीशक्ती योजनेचा लाभ घेऊ शकता.
FAQ’s स्त्री शक्ती या योजनेअंतर्गत वारंवार विचारली जाणारी प्रश्न
प्रश्न: स्त्रीशक्ती योजनेअंतर्गत कोणत्या बँकेतून कर्ज मिळते?
उत्तर: स्त्रीशक्ती योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेतून कर्ज मिळते.
प्रश्न: स्त्रीशक्ती योजनेअंतर्गत किती कर्ज मिळते?
उत्तर: स्त्रीशक्ती योजनेअंतर्गत 50000 पासून 25 लाख पर्यंतचे कर्ज मिळते.
प्रश्न: स्त्रीशक्ती योजने साठी अर्ज कसा करावा?
उत्तर: स्त्रीशक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA