Sebi Issues Warning Regarding Digital Gold Know The Risks Involved : डिजिटल जगात चमकणारी प्रत्येक गोष्ट सोने नसते

Sebi Issues Warning Regarding Digital Gold Know The Risks Involved : डिजिटल किंवा ई-गोल्ड किती सुरक्षित?, सेबीने दिला स्पष्ट इशारा

Sebi Issues Warning Regarding Digital Gold Know The Risks Involved : Digital Gold : तुम्ही डिजिटल गोड ला पूर्ण सुरक्षित मानून छोटी छोटी बचत गुंतवणूक करता तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जाणून घ्या यामध्ये कुठली रिक्स लपलेली आहे. आणि तुम्हाला काय सावधगिरी बाळगावी लागेल.


Digital Gold आजकाल तुम्हाला अनेक मोबाईल ॲप मध्ये केवळ 10 ते 15 रुपये पासून सोने खरेदी करण्याचा पर्याय दिला जात आहे. डिजिटल गोल्ड विक्री करणाऱ्या या ॲपद्वारे संदेश दिला जातो की, तुम्ही छोटी छोटी बचत करून सोने आपल्या नावावर करू शकता. मात्र तुम्हाला माहिती आहे का ही किती रिक्स आहे आणि किती सुरक्षित आहे?


Sebi सेबीकडून नुकतेच म्हटले आहे की डिजिटल किंवा गोल्ड कमोडिटी डेरीवेटिव्स किंवा सिक्युरिटीच्या श्रेणीमध्ये येत नाही.

सोने खरेदी परंपरा

आपल्या देशामध्ये प्रत्येक सणानिमित्त सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. आता तर लग्नाचे सीजन येणार आहे. त्यामुळे सोने खरेदी मध्ये अधिक वाढ होणार आहे. सोने केवळ गुंतवणुकीच्या उद्देशाने नाही तर ही आपली परंपरा म्हणून खरेदी केले जाते. त्यामुळे लोक केवळ लग्नासाठीच नाही तर दिवाळी, धनत्रयोदशी, नवरात्र, अक्षय तृतीया यासारख्या सणाच्या निमित्तानेही सोने खरेदी करतात. सण उत्सवा दरम्यान सोन्याच्या किमती मध्ये मोठी वाढ झालेली आपण पाहिलेली आहे. आता लोक फिजिकल गोल्ड कडून डिजिटल गोल्ड कडे आकर्षित होताना दिसत आहेत.

डिजिटल गोल्ड किती सुरक्षित?

Digital Gold सोन्याचे भाव ज्या वेगाने वाढत आहेत आणि केवळ एका वर्षामध्येच सोन्याने 50 टक्के पेक्षा अधिक परतावा दिला आहे. हे पाहून लोक आता सोने खरेदीकडे वळले आहेत. मात्र फिजिकल गोल्ड खरेदी साठी तुमच्याकडे मोठी रक्कम असणे आवश्यक असते. मात्र त्यामुळे लोक आता डिजिटल गोल्ड खरेदी करत आहेत.


गोल्ड ईटीएफ किंवा सेबी द्वारा अनुमोदित एक्सचेंज द्वारे डिजिटल गोल्ड खरेदी करणे एक वेळ योग्य होते. मात्र आता अनेक वेबसाईट आणि ॲप द्वारे डिजिटल गोल्ड विक्री केले जात आहे आणि ते तुम्हाला खूप स्वस्त मिळत आहे.

Sebi द्वारे अशाच ॲप आणि वेबसाईट च्या माध्यमातून होणाऱ्या खरेदी ला ड्रेस की असल्याचे म्हटले आहे. कारण अशा कंपन्या आर्थिक संकटामध्ये आल्या किंवा गोल्ड खरेदी संदर्भात कुठली समस्या झाली तर सेबीचे सुरक्षा नियम या कंपन्यांना लागू होणार नाहीत.

सेबीकडून इशारा

सेबीने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, तुम्ही सुरक्षित ठिकाणावरूनच सोने खरेदी करा. ते डिजिटल असो किंवा फिजिकल असो केवळ स्वस्त आणि ऑफर मुळे डिजिटल सोने खरेदी तुमच्यासाठी रिक्स होऊ शकते असे नाही की कुठल्याही वेबसाईट किंवा ॲपच्या माध्यमातून सेबीने डिजिटल गोल्ड खरेदी करण्यासाठी चुकीचे म्हटले आहे.

मात्र हे स्पष्ट केले आहे की केवळ त्यांच्या जाहिरातीच्या आधारावर किंवा स्वस्त सोने मिळत आहे म्हणून तुम्ही तेथून सोने खरेदी करू नका. खरेदी करण्यापूर्वी पूर्ण खात्री करून घ्या. कारण अशा ठिकाणाहून सोने खरेदी मध्ये गडबड होऊ शकते किंवा सोने बनावट असू शकते किंवा प्लॅटफॉर्मस बंद होऊ शकतो. तर अशा स्थितीमध्ये सेबी चे सुरक्षा कवच त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही म्हणजे नुकसान तुम्हालाच होईल यासाठी सुरक्षित खरेदी करणे आवश्यक आहे.