Shabari Gharkul Yojana 2024 In Marathi : शबरी घरकुल योजनेतून मिळवा हक्काचे घर

Table of Contents

Shabari Gharkul Yojana 2024 Information In Marathi : शबरी घरकुल योजना 2024 मराठी माहिती

Shabari Gharkul Yojana 2024 महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी नवनवीन योजना अमलात आणत असते. या योजनांमध्ये आज आपण एक योजना पाहणार आहोत ती म्हणजे शबरी आदिवासी घरकुल योजना Shabari Adivasi Gharkul Yojana  ही योजना अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी स्वतःचे घर नाही अशांसाठी सरकारने सुरू केली आहे. राज्यातील अनुसूचित जमातीच्या लोकांना त्यांचे स्वतःचे घर नाही, त्यांच्या जीवनात मूलभूत गरजांचा अभाव आहे. कुटुंबाचे उत्पन्न कमी असल्यामुळे नागरिक त्यांच्या स्वतःचे हक्काचे घर घेऊ शकत नाहीत. यामुळे त्यांना झोपड्यांमध्ये किंवा कच्च्या घरांमध्ये राहावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शबरी घरकुल योजना सुरू केली आहे.

Shabari Gharkul Yojana 2024 शबरी घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती वर्गातील ज्या नागरिकांना स्वतःचे घर नाही अशांना स्वतःची हक्काची घरे उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. आदिवासी जमातीचे नागरिक हे झोपडीत राहतात किंवा कच्च्या मातीच्या घरात राहतात, त्यामुळे त्यांना राहण्यासाठी पक्के घर उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. यासाठी सरकारमार्फत आर्थिक मदत मिळते. शबरी घरकुल योजना Shabari Gharkul Yojana 2024अंतर्गत घर बांधण्यासाठी सरकारकडून 1 लाख 20 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यासोबतच त्यांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला जाईल.

Shabari Gharkul Yojana

Shabari Adivasi Gharkul Yojana आदिवासी भागातील लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत होणार आहे. शबरी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड ही ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ठिकाणी योग्यरीत्या कार्यवाही करून दिली जाते. राज्यातील आदिवासी जमातीच्या कुटुंबांना, पारधी जमातीच्या कुटुंबांना, निराधार, विधवा महिलांना, दुर्गम भागातील कुटुंबांना प्राधान्य देण्यात येते. ज्यांची घरे ही कच्च्या मातीची आहेत, नागरिक बेघर आहेत अशा आदिवासी कुटुंबातील लाभार्थ्यांना घर उपलब्ध करून देण्यासाठी या विभागाच्या 28 मार्च 2013 शासन निर्णयाद्वारे शबरी आदिवासी घरकुल योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी 1 लाख 32 हजार रुपये, नगरपालिका क्षेत्रासाठी 1 लाख 50 हजार रुपये तर महानगरपालिका व मुंबई महानगर विकास प्राधिकरण या भागासाठी 2 लाख रुपये एवढ्या रकमेचे अनुदान दिले जाते. आजच्या लेखामध्ये आपण शबरी आदिवासी घरकुल योजना म्हणजे काय? शबरी आदिवासी घरकुल योजनेची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, लाभ, फायदा, पात्रता काय आहे?, शबरी घरकुल योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तसेच या योजनेसाठी अर्ज कसा करावा या संपूर्ण बाबींची माहिती आजच्या लेखात आपण पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

शबरी घरकुल योजना म्हणजे काय

What Is Shabari Gharkul Yojana

राज्यातील काही भागात अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी त्यांचे स्वतःचे हक्काचे घर नाही किंवा ते कच्च्या घरामध्ये किंवा झोपडी मध्ये राहतात. जसे की ऊन, वारा, पाऊस यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने अशा कुटुंबांना त्यांची स्वतःची हक्काचे घर बांधून देण्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना Shabari Adivasi Gharkul Yojana  सुरू केली आहे. सन 2023-24 च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतूद लक्षात घेऊन शासनाने 1,07,099 घरे देण्याचे नियोजन केले असून, या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबाला 269 चौरस फुट क्षेत्रफळ असलेले एक पक्के घर बांधून दिले जाईल. त्यासोबतच त्या लाभार्थी कुटुंबाला स्वच्छ भारत मिशन या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी देखील आर्थिक मदत केली जाईल. लाभार्थ्याला घराच्या बांधकामादरम्यान त्यांना जर काही बदल करायचे असतील तर ते त्या दरम्यान करू शकतात, परंतु त्यामध्ये जर अधिक खर्च लागणार असेल तर ती लाभार्थ्याला स्वतःला भरावी लागेल त्यासाठी सरकार तुम्हाला मदत करणार नाही. या योजनेसाठी आदिवासी जमाती, पारधी जमाती पात्र आहेत. या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड ही प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतरच केली जाईल. त्याचप्रमाणे ही निवड करताना ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत या लाभार्थ्यांना वेतन मंजूर करण्यात येईल.

ठळक मुद्दे :

शबरी घरकुल योजना म्हणजे काय

शबरी घरकुल योजनेची थोडक्यात माहिती

शबरी घरकुल योजनेचे फायदे

शबरी घरकुल योजनेचे उद्दिष्टे

शबरी घरकुल योजनेची वैशिष्ट्ये

शबरी घरकुल योजनेअंतर्गत घराच्या बांधकामासाठी दिली जाणारी आर्थिक मदत

शबरी घरकुल योजनेचे लाभ

शबरी घरकुल योजनेची पात्रता

शबरी घरकुल योजनेच्या अटी

शबरी घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 

शबरी घरकुल योजना अंमलबजावणी प्रक्रिया

शबरी घरकुल योजना 2024 देखरेख यंत्रणा

शबरी घरकुल योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे

FAQ शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत वारंवार विचारले जाणारे प्रश्न

शबरी घरकुल योजनेची थोडक्यात माहिती

Shabari Gharkul Yojana in Short

योजनेचे नावशबरी घरकुल योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
विभागआदिवासी विकास विभाग महाराष्ट्र
लाभार्थीअनुसूचित जमातीतील गरीब कुटुंब
काय मिळेल लाभलाभार्थ्यांना पक्की घरे बांधून दिली जातील
उद्देशलाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळणे
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
Shabari Gharkul Yojana

शबरी घरकुल योजनेचे फायदे

Shabari Gharkul Yojana Benefits

Shabari Aawas Yojana शबरी घरकुल योजनेअंतर्गत ज्या कुटुंबांना त्यांच्या स्वतःचे घर नाहीये कच्चे घर आहे अशांना त्यांचे पक्के घर बांधून देण्यासाठी आर्थिक मदत करणे.  

या योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये पर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळते.  

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते.  

मनरेगा योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 90 दिवसांचा रोजगार देखील उपलब्ध करून दिला जातो.

या योजनेमुळे राज्यातील अनुसूचित जमातीतील गरीब कुटुंबाचे भविष्य उज्वल होईल.  

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागाचा विकास होईल.  

या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे गरीब कुटुंबांना त्यांचे स्वतःचे हक्काचे घर बांधून मिळेल आणि त्यासाठी त्यांना कोणालाही पैसे उधार मागण्याची आवश्यकता नाही किंवा कुठलेही बँक कर्ज घेण्याची आवश्यकता नाही.

शबरी घरकुल योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबांचे राहणीमान बदलेल.  

शबरी घरकुल योजनेचे उद्दिष्टे

Shabari Gharkul Yojana Purpose

अनुसूचित जमातीतील कुटुंबांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.

राज्यातील अनुसूचित जमातीतील कुटुंब हे कच्च्या घरामध्ये किंवा तात्पुरत्या बांधलेल्या घरांमध्ये किंवा झोपडीमध्ये राहतात अशा कुटुंबांना पक्की घरी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

Shabari Gharkul Yojana

शबरी घरकुल योजनेची वैशिष्ट्ये

Shabari Gharkul Yojana Features

शबरी घरकुल योजनेअंतर्गत 1,07,099 कुटुंबांना त्यांचे स्वतःचे पक्के घर बांधून देण्यात देणे हे या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

या योजनेमुळे राज्यातील ग्रामीण भागाचा विकास होतो.  

शबरी घरकुल योजना राज्यातील ज्यांना स्वतःचे हक्काचे घर नाही अशांना हक्काची घरे बांधून सशक्त बनवते.

आर्थिक सहाय्यक हे 12000 रुपयांचे केले जाते

शबरी घरकुल योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाची रक्कम बँक खात्यात जमा होईल

शबरी घरकुल योजना अंतर्गत अपंग व्यक्तीच्या कुटुंबाला 5 टक्के आरक्षण देखील दिले जाणार आहे

शबरी घरकुल योजनेअंतर्गत Shabari Gharkul Yojana 2024घराच्या बांधकामासाठी दिली जाणारी आर्थिक मदत

ग्रामीण भागासाठी 1 लाख 32 हजार रुपये

डोंगराळ व नक्षलवादी क्षेत्रातील भागासाठी 1 लाख 42 हजार रुपये

नगरपालिका भागासाठी 1 लाख 50 हजार रुपये

महानगरपालिका भागासाठी 2 लाख रुपये

शबरी घरकुल योजनेचे लाभ

Shabari Gharkul Yojana Benefits

शबरी घरकुल योजनेअंतर्गत कुटुंबांना त्यांचे कच्चे घर पक्के बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळते.  

या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.  

या योजनेमुळे राज्यातील आदिवासी कुटुंबाचे ऊन, वारा, पाऊस या सर्व वातावरणा पासून संरक्षण मिळेल.  

या योजनेमुळे गरीब आदिवासी कुटुंबांना त्यांचे स्वतःचे पक्के घर मिळेल.  

मनरेगा योजनेच्या माध्यमातून 90 दिवसांचा रोजगार देखील लाभार्थ्यास उपलब्ध करून दिला जाईल.  

शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

 

Shabari Gharkul Yojana

शबरी घरकुल योजनेची पात्रता

Shabari Gharkul Yojana Eligibility

अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा.

राज्यातील अनुसूचित जमाती कुटुंब यासाठी पात्र असतील.

शबरी घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्याची निवड सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011 नुसार केली जाईल.

शबरी घरकुल योजनेच्या अटी

Shabari Gharkul Yojana Conditions

शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र असावा.  

महाराष्ट्र बाहेर कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.  

लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा.  

अर्जदार हा महाराष्ट्र राज्यात कमीत कमी 15 वर्षापासून तरी राहत असावा.  

अर्जदाराचे स्वतःचे घर नसावे.  

अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची घर बांधण्यासाठी जमीन असणे आवश्यक आहे किंवा सरकारने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे.  

अर्जदार जर शहरी भागातील असेल तर त्याचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा कमी असावे आणि जर ग्रामीण भागातील असेल तर त्याचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असावे.  

यापूर्वी राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या घरकुल योजनेअंतर्गत अर्जदार कुटुंबाने लाभ घेतलेला नसावा.  

शबरी घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे  

Shabari Gharkul Yojana Documents

आधार कार्ड

मतदान कार्ड

रेशन कार्ड

ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र

उत्पन्नचे प्रमाणपत्र

बँक खाते पासबुक

पासपोर्ट आकाराचा फोटो

जात प्रमाणपत्र

वयाचा दाखला

जागेचा 7/12 उतारा व 8 अ उतारा

मोबाईल नंबर

ई-मेल आयडी

मालमत्ता कर भरल्याची पावती

शबरी घरकुल योजना अंतर्गत लाभाचे स्वरूप

ग्रामीण भागासाठी 100% अनुदान

नगरपरिषद भागासाठी 7.50% लाभार्थी हिस्सा

महानगरपालिका क्षेत्रासाठी 10% लाभार्थी हिस्सा

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना अंमलबजावणी प्रक्रिया

Shabari Gharkul Yojana 2024  शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्यांच्या कच्च्या घराचे जॉब कार्ड मॅपिंग तयार केले जाते. निधी वितरण करण्यासाठी लाभार्थी व्यक्तीचे खाते PFMS प्रणालीशी जोडून पंचायत समिती लाभार्थ्यांची नावे जिल्हास्तरावर मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवते.

त्यानंतर या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या व्यक्तीच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने रक्कम जमा केली जाते.

घराचे बांधकाम सुरू असताना वेळोवेळी जिओ टॅग व अन्य तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तालुका जिल्हास्तरावरून बांधकामाची संपूर्ण माहिती घेतली जाते त्यानुसार पुढील हप्ते लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले जातात. लाभार्थ्यांनी आपल्या स्वतःचे घर त्याला हवे असेल त्या पद्धतीने बांधकाम करून घ्यावे जेणेकरून घराचा दर्जा चांगला राहील. मनरेगा योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला 90 दिवसांसाठी रोजगार व त्यासाठी 18 हजार रुपये रक्कम दिली जाते.

याबरोबरच स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून स्वच्छालय बांधण्यासाठी सरकार 12000 रुपये देते.

शबरी घरकुल योजना 2024 देखरेख यंत्रणा

Shabari Gharkul Yojana 2024  या योजनेवर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्याची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी सरकारच्या वतीने एक ॲप तयार करण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून यावर नियंत्रण ठेवले जाते त्यामुळे योजनेअंतर्गत होणारे काम पारदर्शक पद्धतीने आणि दर्जेदार होते जिल्हास्तरावर योजनेचे समन्वय जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, तालुकास्तर पंचायत समिती द्वारे ही योजना राबवली जाते.

शबरी घरकुल योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे

Shabari Gharkul Yojana 2024

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी नसल्यास अर्ज रद्द होतो.  

अर्जदार पक्क्या घरात राहत असल्यास रद्द होतो.  

अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे शासनाने सांगितलेल्या रकमेपेक्षा जास्त असेल तर अर्ज रद्द होतो.  

जर अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतला असेल तर अर्ज रद्द होतो.  

जर अर्जदाराकडे स्वतःची जमीन नसेल तर अर्ज रद्द होतो.  

अर्ज भरताना जर अर्जदाराने खोटी माहिती लिहिली असेल तर अर्ज रद्द होतो.  

शबरी घरकुल योजनेची अर्ज प्रक्रिया

Shabari Gharkul Yojana Application Process

शबरी घरकुल योजनेची अर्ज प्रक्रिया ही ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागांसाठी या दोन्ही भागासाठी आहे. हे दोन्ही भाग आपण पाहणार आहोत.

ग्रामीण भागातील अर्ज प्रक्रिया

ग्रामीण भागातील अर्जदारांनी सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्हा कार्यालयात जावे.  

तेथे जाऊन तेथील कर्मचाऱ्यांकडून शबरी घरकुल योजनेचा अर्ज घ्यावा.  

तो अर्ज वाचून त्यामध्ये तुमची अचूक माहिती भरावी आणि त्यासोबतच आवश्यक ती कागदपत्रे अर्जाला जोडून कार्यालयातील आदिवासी विकास प्रकल्प संबंधित अधिकाऱ्याकडे तुमचा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जमा करावा.  

शहरी भागातील अर्ज प्रक्रिया

शहरी भागातील अर्जदारांनी सर्वप्रथम महानगरपालिका किंवा नगरपालिका येथील कार्यालयात जावे.

तेथील कर्मचाऱ्यांकडून शबरी घरकुल योजनेचा अर्ज घ्यावा.  

विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून अचूकपणे भरावी.  

त्यासोबतच आवश्यक असलेली कागदपत्रे जोडून तो अर्ज तेथील कार्यालयात आदिवासी विकास प्रकल्प संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावा.  

FAQ शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: शबरी घरकुल Gharkul Yojana योजना कोणासाठी आहे?

उत्तर: शबरी घरकुल Gharkul Yojana योजना ही महाराष्ट्र राज्यातील आदिवासी तसेच अनुसूचित जमाती यांच्यासाठी आहे

प्रश्न: शबरी घरकुल Gharkul Yojana योजना अंतर्गत आर्थिक मदत किती मिळते?

उत्तर: Gharkul Yojana या योजनेअंतर्गत लाभयार्थ्याच्या कुटुंबाला स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी ग्रामीण क्षेत्रात 1 लाख 32हजार,  डोंगराळ भागात 1 लाख 42हजार,  नगरपरिषद भागात 1 लाख 50 हजार आणि महानगरपालिका क्षेत्रात 2 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. त्यासोबतच शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

प्रश्न: शबरी घरकुल Gharkul Yojana योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर: शबरी घरकुल Gharkul Yojana योजनेचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA