Shaikshanik Loan Yojana 2024 Information : शैक्षणिक कर्ज योजना मराठी माहिती
Shaikshanik Loan Yojana 2024 : केंद्र शासन तसेच राज्य शासनामार्फत जनतेच्या कल्याणासाठी भरपूर कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या कल्याणकारी योजनांना आर्थिक मदत पुरवण्याची जबाबदारी ही केंद्र व राज्य शासनाची असते. राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी राज्य सरकार सतत प्रयत्नशील असते. यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी भरपूर योजना आलेल्या आहेत. आज आपण एका नवीन योजनेची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे Shaikshanik Loan Yojana शैक्षणिक कर्ज योजना. आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी सरकारने शिष्यवृत्ती योजना, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना, बेरोजगार भत्ता योजना अशा अनेक योजना राबविल्या आहेत. त्यातच अजून एक योजना म्हणजे आज पाहणार आहोत ती शैक्षणिक कर्ज योजना. आजच्या लेखात आपण शैक्षणिक कर्ज योजनेची संपूर्ण माहिती Shaikshanik Loan Yojana 2024 जाणून घेणार आहोत. शैक्षणिक कर्ज योजना म्हणजे काय?, शैक्षणिक कर्ज योजनेचा कोणाला मिळतो लाभ?, शैक्षणिक कर्ज योजनेचे वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, पात्रता, या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, तसेच मोफत सायकल वाटप योजनेसाठी कसा करावा लागेल आपल्याला अर्ज? या सर्वांची माहिती आजच्या लेखात आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Shaikshanik Loan Yojana 2024 राज्य शासना मार्फत चालवण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनेची आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे शैक्षणिक कर्ज योजना. महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब तसेच मागास प्रवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत 1 लाख 50 हजार रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. गरीब कुटुंबातील लोक आपल्या रोजच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकत नाहीत. त्यांचे जीवन अगदी हलकीचे जीवन आहे. त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्याकडे पैशाची खूप चणचण आहे त्यामुळे ते त्यांच्या मुलींना उच्च शिक्षण देखील देऊ शकत नाहीत. कुटुंबातील मुला मुलींना बारावीपर्यंत ते कसेबसे शिकवतात बारावी नंतरचे पुढील शिक्षण घेण्यासाठी मात्र त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. काहीजणांना तर हे शिक्षण सोडून देखील द्यावे लागते. ते शिक्षण सोडून त्यांना काही कामधंदा करावा लागतो. त्यामुळे या समाजातील मुलेही शिक्षणा पासून वंचित राहतात. हा सर्व विचार करून महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक कर्ज योजनेची Shaikshanik Loan Yojana 2024 सुरुवात केली आहे. राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांचे शिक्षण हे पूर्ण व्हावे त्यांना भरपूर शिक्षण घेता यावे हा उद्देश शैक्षणिक कर्ज योजनेचा आहे. आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे कुटुंब त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करू शकत नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये असे भरपूर शेतकरी वर्ग आहे जो की पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतीचे पीक जसे होईल त्यांना त्यातून जसं जसे पैसे मिळतील तसे त्यांना त्यांच्या मुला-मुलींना शिकवावे लागते. शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. यामध्ये कधी दुष्काळ येतो, तर कधी नैसर्गिक वादळ येतात, कधी रोगराई येते, तर कधी जमीन नापीक होते. या सर्व समस्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमधून कमी उत्पादन मिळते आणि मग त्यामुळे त्यांना पैसाही कमी मिळतो आणि मग ते त्यांच्या मुला मुलींचे शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. या सर्वांवर मात करण्यासाठी सरकारने Shaikshanik Loan Sahay Yojana ही योजना सुरू केली आहे. शैक्षणिक कर्ज योजना Shaikshanik Loan Sahay Yojana सुरू करण्याचा उद्देश म्हणजे हा की आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल या योजनेमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकतील, आणि चांगल्या नोकरीला लागू शकतील हा या योजनेचा सर्वात मोठा उद्देश सरकारने ठेवला आहे. Education Loan Scheme 2024
ठळक मुद्दे :
शैक्षणिक कर्ज योजनेची थोडक्यात माहिती
Education Loan Scheme 2024 In Short
शैक्षणिक कर्ज योजनेचे उद्देश
Shaikshanik Loan Sahay Yojana Purpose
शैक्षणिक कर्ज योजनेची वैशिष्ट्ये
Shaikshanik Loan Sahay Yojana Features
शैक्षणिक कर्ज योजनेचे फायदे
Education Loan Scheme Benefits
शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ
Shaikshanik Loan Sahay Yojana Benefits
शैक्षणिक कर्ज योजनेचे लाभार्थी
Shaikshanik Loan Yojana Benesior
शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभ रक्कम
शैक्षणिक कर्ज योजनेचे नियम
Shaikshanik Loan Yojana 2024 Conditions
शैक्षणिक कर्ज योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Shaikshanik Loan Sahay Yojana Documents
शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत येणाऱ्या बँका
Shaikshanik Loan Sahay Yojana Involve Bank
Education Loan Scheme योजनेअंतर्गत किती मिळते कर्ज
Education Loan Scheme 2024 योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे
शैक्षणिक कर्ज योजनेची अर्ज प्रक्रिया
Education Loan Scheme Apply
FAQ’s शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत वारंवार विचारली जाणारे प्रश्न
शैक्षणिक कर्ज योजनेची थोडक्यात माहिती
Education Loan Scheme 2024 In Short
योजनेचे नाव | शैक्षणिक कर्ज योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
लाभाची रक्कम | 1 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत |
उद्देश | विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे |
लाभार्थी | आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थी |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | https://sjsa.maharashtra.gov.in/ |
शैक्षणिक कर्ज योजनेचे उद्देश
Shaikshanik Loan Sahay Yojana Purpose
- गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचणी येऊ नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- राज्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- महाराष्ट्र राज्यांमध्ये असे भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती ही खूप कमजोरीची आहे त्यामुळे मुलांना शिक्षण घेता येत नाही ते शिक्षणापासून वंचित राहतात या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक कर्ज योजना सुरू केली आहे.
- विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे.
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या योजनेचा अधिक फायदा होणार आहे कारण की शैक्षणिक कर्ज मिळाल्यामुळे ते उच्च शिक्षण घेतील आणि नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहतील आत्मनिर्भर बनतील.
- शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत Shaikshanik Loan Sahay Yojana विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अत्यंत कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध केले जाते.
- या योजनेच्या माध्यमातून मुलांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- या योजनेमुळे उच्च शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या वेगवेगळ्या संधी निर्माण होतील.
शैक्षणिक कर्ज योजनेची वैशिष्ट्ये
Shaikshanik Loan Sahay Yojana Features
- शैक्षणिक कर्ज योजना Shaikshanik Loan Yojana 2024 ही महाराष्ट्र सरकार द्वारे विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे
- शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत Shaikshanik Loan Yojana आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना 1 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे
- या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन नोकरी करतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहतील स्वावलंबी बनतील
- शैक्षणिक कर्ज योजनेच्या Education Loan Scheme 2024 माध्यमातून मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल
- राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी सुरू करण्यात आलेली ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे
- शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत Education Loan Scheme 2024 जे कर्ज दिले जाणार आहे त्याचे व्याजदर अत्यंत कमी आहे
- या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा उद्देश आहे
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आता शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणाकडूनही अधिक व्याजदराने पैसे घेण्याची आवश्यकता नाही
- शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे या योजनेचा लाभ अत्यंत सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना घेता येईल
शैक्षणिक कर्ज योजनेचे फायदे
Education Loan Scheme Benefits
- शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत Shaikshanik Loan Yojana उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्याला 1 लाख 50 हजार रुपये पर्यंतचे कर्ज मिळते
- या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज हे फक्त 3 टक्के व्याज दरावर दिले जाते
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षण घेता यावे यासाठी त्यांना या योजनेचा लाभ होतो
- शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत Education Loan Scheme लाभार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या राहण्याचा खर्च तसेच त्यांचा कोर्सचा खर्च हा दिला जातो
- या योजनेअंतर्गत जोपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहे तोपर्यंत त्या विद्यार्थ्याला कर्ज मिळते
- शैक्षणिक कर्ज योजनेमुळे Education Loan Scheme विद्यार्थी आत्मनिर्भर तसेच स्वावलंबी बनतील
- शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्ज परतफेडची मुदत ही जास्त दिवसाची ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला कसलीही चिंता करायची आवश्यकता नाही
- या योजनेमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण अर्धवट सोडण्याची आवश्यकता नाही
- या योजनेमुळे विद्यार्थी त्यांचे शिक्षण तसेच उच्च शिक्षण पूर्ण करून नोकरी करतील
- शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत घेतलेले कर्ज हे विद्यार्थी त्याला नोकरी लागल्यानंतर 6 महिन्यापासून ते 5 वर्षापर्यंत कर्ज फेडू करत शकतो
- शैक्षणिक कर्ज योजनेमुळे विद्यार्थी स्वावलंबी बनतील
- शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण चालू असताना फक्त व्याजाची रक्कम भरावी लागेल
- विद्यार्थ्याला राज्यातील कोणत्याही सरकारी बँकेत किंवा खाजगी बँकेत किंवा स्वयंसेवी संस्था अंतर्गत हे खर्च उपलब्ध होईल
शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ
Shaikshanik Loan Sahay Yojana Benefits
- शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत अत्यंत कमी व्याजदर आकारला जातो
- शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत विद्यार्थी त्यांचे शिक्षण हे देशातच नव्हे तर परदेशात देखील पूर्ण करू शकतील
- या योजनेमुळे विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल
- शैक्षणिक कर्ज योजनेमुळे विद्यार्थी सशक्त बनतील
- शैक्षणिक कर्ज योजनेमुळे विद्यार्थी स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर बनतील
- या योजनेमुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होईल
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना त्यांच्या शिक्षणासाठी इतर बँकेतून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही
शैक्षणिक कर्ज योजनेचे लाभार्थी
Shaikshanik Loan Yojana Benesior
शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील सर्व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल
शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभ रक्कम
Shaikshanik Loan Yojana 2024 In Marathi शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना पात्र विद्यार्थ्यांना 1 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज दिले जाते त्यावर अत्यंत कमी व्याज दराने हे कर्ज परतफेड करावे लागते. शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत योजनेचे कर्जावरील व्याजदर शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत जे विद्यार्थी पात्र असतील त्या विद्यार्थ्यांना सरकारकडून महाराष्ट्र राज्यातील सरकारकडून दीड लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते आणि त्या कर्जाचा व्याजदर हा केवळ 3 टक्के आकारला जातो
शैक्षणिक कर्ज योजनेचे नियम
Shaikshanik Loan Yojana 2024 Conditions
- शैक्षणिक कर्ज योजनेचा Shaikshanik Loan Sahay Yojana लाभ हा फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळेल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी कोणत्याही संस्थेकडून शैक्षणिक कर्ज, कर्जाची परतफेड न केल्याचा बोजा नसावा.
- या योजनेचा लाभ महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थ्यांना दिला जाणार नाही.
- शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ हा अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्यांक समाजातील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिला जाईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असावे.
- शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 5 लाखापेक्षा कमी असावे.
- शैक्षणिक योजनेअंतर्गत मिळालेले कर्ज परतफेड करण्यासाठी उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिने ते पाच वर्षाच्या दरम्यानचा कालावधी आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक हे कोणत्याही सरकारी नोकरी करणारे नसावे. शैक्षणिक कर्ज योजनाअंतर्गत विद्यार्थ्याला कर्ज घेण्यासाठी मुलाचे आई-वडील जामीन म्हणून राहतील. जर विद्यार्थ्याने त्याचे शिक्षण हे मध्येच अर्ध्यातून सोडून दिले तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ हा 1 एप्रिल 2009 पासून शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होईल.
- ज्या विद्यार्थ्यांचे काही कारणास्तव महाविद्यालयातून नाव काढून टाकण्यात आले असेल त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
शैक्षणिक कर्ज योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Shaikshanik Loan Sahay Yojana Documents
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड
- विद्यार्थ्यांचे पॅन कार्ड
- ओळखपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकारात फोटो
- यापूर्वी कोणत्याही बँकेकडून शैक्षणिक कर्ज न घेतल्याचे प्रमाणपत्र
- मागील वर्षीची गुणपत्रिका
- शैक्षणिक खर्चाची आकडेवारी व अभ्यासक्रम कालावधीचा पुरावा
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
मोफत पिठाच्या गिरणीतून महिला होतायेत आत्मनिर्भर
सौभाग्य योजनेद्वारे प्रत्यकाचे घर प्रकाशमय
शेतीचा विकास करण्यासाठी आधुनिकतेची जोड
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ठरतेय प्रभावी
मुलींसाठी सायकल योजना ठरत आहे प्रभावी
शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत येणाऱ्या बँका
Shaikshanik Loan Sahay Yojana Involve Bank
स्टेट बँक ऑफ इंडिया
युनियन बँक
आयडीबीआय बँक
पंजाब नॅशनल बँक
बडोदा बँक
स्टेट बँक ऑफ हैदराबाद
बँक ऑफ महाराष्ट्र
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
युनायटेड बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया
सिंडिकेट बँक
इंडियन बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
एचडीएफसी बँक
कॅनरा बँक
आदी बँकांचा समावेश आहे.
शैक्षणिक कर्ज मिळणाऱ्या अभ्यासक्रमांची यादी, पदवी अभ्यासक्रम पदव्युत्तर अभ्यासक्रम मास्टर व पीएचडी व्यवसायिक अभ्यासक्रम, संगणक कृषी अभियांत्रिकी, पशुवैद्यकीय वैद्यकीय, विधी शैक्षणिक कर्ज,
Education Loan Scheme योजनेअंतर्गत किती मिळते कर्ज
शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत भारतातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 10 लाखापर्यंतचे कर्ज मिळते व परदेशातील शिक्षणासाठी जास्तीत जास्त 20 लाखापर्यंतचे कर्ज या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले जाते.
परंतु विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण घेण्याची गरज आणि त्यांच्या कर्ज परतफेड करण्याची क्षमता इत्यादी बाबी हे कर्ज देण्याअगोदर विचारात घेतल्या जातात.
Education Loan Scheme 2024 योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे
अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी नसेल तर या योजनेअंतर्गत केले गेलेला अर्ज रद्द होतो.
अर्जदार विद्यार्थी हा मागील वर्षी अनुत्तीर्ण असेल तर त्याचा अर्ज रद्द होतो.
अर्जदार विद्यार्थ्यावर सरकारी बँकेचे किंवा इतर संस्थेचे कर्ज असेल तर त्याचा अर्ज रद्द होतो.
अर्जदार विद्यार्थ्यांवर इतर कोणत्याही शैक्षणिक कर्ज परत न केल्याचा बोजा असेल तर अर्ज रद्द होतो.
अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त असेल तर अर्ज रद्द होतो.
शैक्षणिक कर्ज योजनेची अर्ज प्रक्रिया
Education Loan Scheme Apply
शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल, या योजनेच्या अर्जाची कोणतीही ऑनलाईन पद्धत नाही.
ऑफलाइन पद्धत कशी ती बघू
शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जवळील बँकेत जाऊन शैक्षणिक कर्ज योजनेतील बँकेतून शैक्षणिक कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी
अर्ज सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडावी
त्यानंतर तो अर्ज बँकेत जमा करावा
तुम्ही दिलेला अर्ज आणि त्यासोबत जोडलेली आवश्यक कागदपत्रे यांची बँक मॅनेजर तपासणी करेल
तपासणी झाल्यानंतर तुम्हाला शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत कर्ज रक्कम ही तुमच्या खात्यात जमा होईल
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही शैक्षणिक कर्ज योजनेचा अर्ज भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता
FAQ’s शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत वारंवार विचारली जाणारे प्रश्न
प्रश्न: शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत किती मिळते कर्ज?
उत्तर: शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत हे 1 लाख 50 हजार रुपये पर्यंतचे कर्ज मिळते.
प्रश्न: शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जाचा व्याजदर किती?
उत्तर: शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला जे कर्ज मिळणार आहे त्याचे व्याजदर फक्त 3 टक्के आहे.
प्रश्न: शैक्षणिक कर्ज योजनेचा परतफेड कालावधी किती?
उत्तर: शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत मिळालेले कर्ज हे विद्यार्थ्याला त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी लागल्यानंतर 6 महिन्यापासून ते 5 वर्षापर्यंत परतफेड कालावधी राहील.
प्रश्न: शैक्षणिक कर्ज योजनेची अर्ज प्रक्रिया? उत्तर: शैक्षणिक कर्ज योजनेचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागतो.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA