ST Bus Ticket Fare Hike 2025 In Marathi : महिला सन्मान योजना सुरू की बंद?
ST Bus Ticket Fare Hike 2025 In Marathi : एसटीला महाराष्ट्राची जीवन वाहिनी म्हणून ओळखले जाते. या जीवनवाहिनीचे राज्य सरकारने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. थोडी थोडकी नाही तर राज्य सरकारने तिकिटामध्ये तब्बल 15 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाडेवाडीच्या तुलनेत एसटीकडून प्रवाशांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नसल्याने प्रवाशांकडून नाराजीही व्यक्त केली जात आहे.
ST Fare Hike राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील एसटी भाड्यामध्ये तब्बल 15 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका महाराष्ट्रातील प्रवाशांना बसणार आहे. 24 जानेवारीपासून ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमाशी बोलताना काही प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामध्ये परिवहन मंत्री 50 टक्के सवलती बाबत काय म्हटले आहे हे आपण जाणून घेऊ…
काय म्हणाले परिवहन मंत्री
ST Fare Hike आम्ही राज्याचे प्रधान सचिव संजय शेट्टी यांच्याशी चर्चा केली आहे. गुरुवारी मंत्रालयात प्रधान सचिवांच्या माध्यमातून परिवहन विभागाचे प्रमुख आणि एडीजी यांच्यात प्राधिकरणाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एसटीची रखडलेली भाडेवाढीच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला आहे.
ST Bus Ticket Fare Hike त्यानुसार बैठकीत 14.95% एसटी तिकीटात भाडेवाढ करण्यात आली आहे. तसेच 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवारही करण्यात येणार आहे. मात्र याबाबत माझ्याकडे अधिकृतरित्या फाईल आलेली नाही. मात्र ती येईल असं मला वाटते असं परिवहन मंत्री सरनाईक यांनी म्हटले आहे.
ST Bus Ticket Fare Hike राज्यातील एसटी महामंडळाची भाडेवाढ प्रत्येक वर्षी करणे आवश्यक आहे. कारण प्रवाशांना सुख सोयी देताना डिझेल आणि सीएनजीचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे हा खर्च वाढत आहे. याबरोबरच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढ याचाही फटका बसत आहे.
ST Bus Fare Hike एसटी महामंडळाची स्थिती बघितली तर दर दिवशी सुमारे 3 तर दर महिन्याला 90 कोटी रुपयांचा आर्थिक तोटा महामंडळाला सहन करावा लागत असून त्यामुळे भाडेवाढ केल्याशिवाय आमच्याकडे कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले?
महिलांसाठीची 50% सवल सुरू राहणार का?
ST Bus Fare Hike राज्य सरकारने यापूर्वी ज्याप्रमाणे सवलती दिलेल्या आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नसल्याचेही सरनाईक यांनी यावेळी सांगितले. आमच्या सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना 50 टक्के एसटी तिकीटामध्ये सूट दिली आहे. ही सवलत कायम सुरू राहणार आहे. या सवलतीमुळेच एसटीचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे ही सवलत कुठे बंद केली जाणार नाही याचा लाभ महिलांना मिळत राहील.
प्रवाशांची नाराजी
ST Bus Ticket Price राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसचे भाडे वाढ झाल्यामुळे राज्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण या भाडेवाढीमुळे त्यांचा खिसा रिकामा होणार आहे. महामंडळाकडून एसटीच्या भाड्यामध्ये सतत वाढ केली जात आहे मात्र सुविधा देण्याच्या बाबतीत एसटी महामंडळ कुठे दिसत नाही असे प्रवासाचे म्हणणे आहे.
ST Bus Ticket Price एस टी महामंडळाने भाडेवाढीच्या तुलनेत प्रवाशांना सुविधा देणे आवश्यक आहे तसेच जादा बस सोडणे ही गरजेचे आहे. प्रवासी संख्या बघता तुटपुंज्या बस त्यातही अनेक बस मोडकळीला आलेल्या दिसत आहेत. एसटी वाढते अपघात याकडेही महामंडळाचे दुर्लक्ष झालेले दिसते. याकडे लक्ष देण्याची ही मागणी प्रवाशांकडून होत आहे.