student scholarship get 12000 rupees under nmms scheme : काय आहे सरकारची ही योजना
student scholarship get 12000 rupees under nmms scheme : नमस्कार वाचकहो, केंद्र सरकार सतत महिलांसाठी, मुलींसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच देशातील प्रत्येक नागरिकांसाठी कोणत्या ना कोणत्या योजनेची अंमलबजावणी करत असते. आज आपण विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सरकारने सुरू केलेल्या एका शिष्यवृत्ती योजनेची माहिती पाहणार आहोत.
Scholarship for Student केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत 8वी तील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेत विद्यार्थ्यांना 12000 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
Scholarship for Student या योजनेसाठी कोण पात्र आहे? या योजनेचा अर्ज कसा करावा? याची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. त्यामधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 9वी ते 12वी पर्यंत दरवर्षी 12000 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यामुळे विद्यार्थी त्यांचे पुढील शिक्षण घेण्यासाठी आत्मनिर्भर बनतात. केंद्र सरकार द्वारे ही शिष्यवृत्ती दिली जाते. 8 वी च्या विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्ती परीक्षा डिसेंबर महिन्यात असते.
केंद्र सरकार द्वारे घेतल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण 90 प्रश्न विचारले जातात. शैक्षणिक क्षमता चाचणी अंतर्गत विचारशक्ती आणि तर्क तपासणारे 90 प्रश्न विचारले जातात. यामध्ये गणित, समाजशास्त्र, विज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न असतात. एकाच दिवशी दोन्ही पेपर घेतले जातात.
Student Scholarship या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न आणि वर्गातील गुण चेक केले जातात. आठवी नंतर अनेक विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत, विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून ही योजना सरकारने सुरू केली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना 4 वर्ष प्रत्येकी 12000 रुपये मिळतात.
योजनेच्या अटी
Student Scholarship या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये 55% गुण मिळालेले असावेत. या सोबतच विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 3.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.