sukshma sinchan yojana 2025 In Marathi : सूक्ष्म सिंचन योजना
sukshma sinchan yojana 2025 देशाच्या विकासामध्ये कृषी क्षेत्राचे योगदान अनन्यसाधारण आहे. राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रगतिशील पद्धतीने शेती करतात. मात्र कुठलेही पीक घ्यायचे म्हटले तर त्यासाठी पाणी आवश्यक असते.
sukshma sinchan yojana in marathi : ही बाब लक्षात घेऊनच सरकारने सूक्ष्म सिंचन योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पाण्याची कार्यक्षमता वाढून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न केला जातो.
या योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान
sukshma sinchan yojana Anudan
- अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदान दिले जाते.
- अन्य शेतकऱ्यांना 45% अनुदानाचे निकष आहेत. यासाठी क्षेत्राची मर्यादा 5 हेक्टर ठेवण्यात आलेली आहे.
ही योजना सर्व 34 जिल्ह्यांमध्ये राबवली जाते.
लाभ क्षेत्र मर्यादा
sukshma sinchan yojana Benefits
सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून आयुरमान 7 वर्ष ठेवण्यात आलेले आहे. ज्या लाभार्थ्यांनी 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादित सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे. अशा लाभार्थ्यास 7 वर्षानंतर पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
एखाद्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत स्पिंकलर तुषार सिंचनाचा संच घेतला असेल तर त्याला 3 वर्षानंतर पुन्हा या योजनेच्या अंतर्गत तुषार सिंचनाचा संच घेण्यासाठी अर्ज करता येतो.
ठिबक संचास effective differential subsidy नुसार अनुदान दिले जाते.
लाभार्थी शेतकऱ्यांची पात्रता
sukshma sinchan yojana Eligibility
शेतकऱ्याकडे मालकी हक्काचे सातबारा आणि आठ अ उतारा असणे आवश्यक आहे. सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे विहीर, बोर असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया
sukshma sinchan yojana Online Apply
कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे.
फार्मर आयडी आणि त्याच्याशी संबंधित माहिती कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या महाडीबीटी प्रणालीशी एपीआय द्वारे स्ट्रिक याप्रमाणे जोडण्यात आलेली आहे.
त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा किंवा आठ अ ही कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही.
सरकारने 2025-26 पासून महाडीबीटी पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्याचा 21 मे 2025 रोजी निर्णय घेतला आहे.
सध्या या योजनेअंतर्गत 65,515 लाभार्थ्यांची निवड प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली आहे.
अर्ज साठीचा खर्च
अर्ज करतेवेळी शेतकऱ्यांना 20 रुपये शुल्क व जीएसटी 3. 60 मिळून 23.60 रुपये शुल्क ऑनलाईन भरावे लागेल.
आवश्यक कागदपत्रे
sukshma sinchan yojana Documents
सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी इतर खातेदाराची समती पत्र देणे आवश्यक आहे
अज्ञान पालक खातेदाराचा वयाचा दाखला व पालकाचे घोषणापत्र देणे आवश्यक आहे
लाभार्थी संस्था यांना शेतजमीन भाडेतत्त्वावर घेऊन सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास मालकी हक्क असलेला सातबारा आठ अ
लाभार्थ्यांनी अर्ज मंजूर झालेल्या दिनांक पासून 7 वर्षासाठी शेतमालकासोबत केलेल्या नोंदणीकृत कराराची प्रत जोडावी लागेल
अर्ज छाननी नंतर पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी एकत्रित संघनिक प्रणाली द्वारे पूर्वसंमती प्रदान करतात
संच खरेदी करून देयक अपलोड करणे
संमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यास त्यांच्या पसंतीच्या उत्पादकाकडून किंवा अधिकृत केलेल्या वितरक किंवा इतरत्याकडून 30 दिवसाच्या आत सूक्ष्म सिंचन संच बसवणे आवश्यक आहे आणि त्यानंतर देयकाची कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.
सिंचन संच खरेदी केल्यानंतर महाडीबीटीवर हे कागदपत्रे अपलोड करण
शेतकऱ्याचे हमीपत्र देयकाची मूळ प्रत कंपनी प्रतिनिधी तयार केलेला सूक्ष्म सिंचन संच आराखडा व प्रमाणपत्र
असा करा ऑनलाइन अर्ज
sukshma Sinchan Online Form
या योजनेसाठी लाभार्थी शेतकरी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. त्यासाठी त्याला https://mahadev.maharashtra.gov.in/farmer/agrilogin यावर भेट द्यावी लागेल. तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कार्यालयाला भेट देऊन अधिक माहिती मिळू शकतात.