Tejashri Pradhan & Subodh Bhave ‘Veen Doghatali Hi Tutena’ promo viral : या दिवशी सुरू होणार तेजश्री- सुबोध ची मालिका

Tejashri Pradhan & Subodh Bhave ‘Veen Doghatali Hi Tutena’ promo viral : नवी मालिका “वीण दोघांतली ही तुटेना” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Tejashri Pradhan & Subodh Bhave ‘Veen Doghatali Hi Tutena’ promo viral : तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची नवी मालिका “वीण दोघांतली ही तुटेना” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीने याचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये मालिकेची तारीख आणि वेळ समोर आला आहे.

गेल्या अनेक दिवसापासून या मालिकेची जाहिरात टीव्हीवर पाहायला मिळत आहे. मात्र या दोघांची ही मालिका कधी सुरू होणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता.

मात्र याचे आता उत्तर मिळाले आहे. कारण तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असलेली “विन दोघातली ही तुटेना” मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तेजश्री प्रधान ने यामध्ये स्वानंदीची भूमिका साकारली आहे. तर सुबोध भावे यांनी समरची भूमिका केली आहे. या मालिकेचे प्रोमो मध्ये दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या असूनही बहीण भावांसाठी ते लग्न करताना पाहायला मिळत आहे.

या मालिकेमध्ये सुबोध भावे, तेजश्री प्रधान सह पोर्णिमा डे, राजमोहरे हे कलाकारही दिसणार आहेत. चाहते या मालिकेची मोठी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. “वीण दोघांतली ही तुटेना” ही मालिका 11 ऑगस्ट पासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘Veen Doghatali Hi Tutena’ New Serial Zee Marathi दररोज संध्याकाळी 7.30 वाजता ही मालिका झी मराठीवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांना एकत्र पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा आता 11 ऑगस्टला पूर्ण होणार आहे.