Top 5 Schemes for Women In Marathi : महिलांसाठी सुरू आहेत 5 स्टार्टअप कर्ज योजना

Top 5 Schemes for Women In Marathi : महिला कर्ज फेडण्यात पुढे, तरी मिळते कमी कर्ज

Top 5 Schemes for Women In Marathi : भारताची डिजिटल फायनान्सची दिशा आणि वेग महिलांच्या हातामध्ये गतीने जात आहे. रेडसिरच्या अहवालानुसार, इंटरनेट आc वापर करण्यामध्ये महिलांचा वाटा खूप मोठा आहे. त्यांचा क्रेडिट स्कोर पण चांगला आहे.

मात्र खर्च, क्रेडिट कार्ड, गुंतवणूक, विमा सारख्या अत्यंत महत्त्वाच्या वित्तीय उत्पादनामध्ये त्यांची भागीदारी आता पण मर्यादित आहे. मात्र महिला कमी प्रमाणात डिफॉर्डर आहेत आणि चांगली क्रेडिट क्वालिटी दिसते आहे. पर्सनल लोन मध्ये महिलांची भागीदारी केवळ 17 टक्के आहे.

पर्सनल लोन 17%
नवीन पीएफ खाते 27%
नवीन विमा पॉलिसी 34%
क्रेडिट कार्ड 13%
कंपनी ड्युरेबल कर्ज 22%
म्युच्युअल फंड एयुएम 23%

या योजनेतून महिला उद्योजकांना मिळते कर्ज

Top 5 Schemes for Women will get loan

अन्नपूर्णा योजना

भारत सरकार महिला उद्योजकांना फुड केटरिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 50 हजार रुपये पर्यंत कर्ज देते. कर्ज 36 महिन्यामध्ये परतफेड करावे लागते.

स्त्रीशक्ती पॅकेज

ही योजना अशा महिलांसाठी आहे ज्या कुठल्याही व्यवसायामध्ये 50 टक्के पेक्षा अधिक भागीदार आहेत. छोट्या व्यवसायासाठी 50 हजार रुपये ते 2 लाख रुपये पर्यंत कर्ज या योजनेतून दिले जाते. एमएसएमइ कंपनीला 25 लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते. 5 लाख रुपये पर्यंतसाठी कुठल्या प्रकारची सिक्युरिटी द्यावी लागत नाही.

महिला समृद्धी योजना

आर्थिक आणि सामाजिक मागास महिलांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक 60 हजार रुपये पर्यंत कर्ज देते. या कर्जावर वर्षाला चार टक्के व्याजदर आकारला जातो.

मुद्रा योजना

या योजनेअंतर्गत 50 हजार ते 50 लाख रुपये पर्यंत कर्ज कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतले जाऊ शकते. या पैशाच्या मदतीद्वारे महिला ब्युटी पार्लर, ट्युशन सेंटर, टेलरिंग यासारखे व्यवसाय सुरू करू शकतात. 10 लाख रुपयापर्यंत कर्ज घेण्यासाठी गॅरेंटर किंवा सिक्युरिटीची आवश्यकता नाही.

महिला उद्यम निधी

महिला उद्योजकांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएनबी आणि सीडीबी 10 लाख रुपये पर्यंत कर्ज देते. हे कर्ज दहा वर्षात परतफेड करावे लागते.