UPI Made Payments Easier But Increased Wasteful Spending How Can We Control Expenses : UPI सुविधा आल्यानंतर आता पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे. यामुळे रोख रक्कम ठेवण्याची गरज राहिलेली नाही, मात्र यामुळे लोकांचा खर्चही वाढला आहे. कारण पैसे भरण्याचा त्रासही कमी झाला आहे. पण वाढत्या खर्चावर तुम्ही वाढणारा खर्च नियंत्रित ठेवू शकतात.
UPI सुविधा आल्यापासून पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे. आता भाजीवाल्याच्या गाड्या पासून ते चहा दुकान, मॉलमध्येही मोबाईलच्या एका क्लिकवर तुम्हाला पेमेंट करता येते. भारतामध्ये UPI युजेस सोबतच UPI ट्रांजेक्शन वेगाने वाढत आहे.
मात्र तुम्हाला माहिती आहे का, युपीआय पेमेंटच्या माध्यमातून पेमेंट करण्याची किती वेगाने वाढ झाली आहे. यामुळे लोकांचा खर्चही वाढला आहे. यामुळे पैसे भरण्याची कटकटी कमी झाली आहे. मात्र खर्च नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचे झाले आहे. यामुळे खर्च वाढले आहेत.
UPI इतकं सोपं आहे की, तुम्ही प्रत्येक गोष्ट यूपीएच्या माध्यमातून पेमेंट करून खरेदी करू शकता. छोट्या आणि मोठ्यातली मोठी. यापूर्वी पैसे खर्चतांना आपण विचार करत होतो, मात्र आता मोबाईलच्या एका क्लिकवर आपल्याला पेमेंट करता येत असल्यामुळे आपण फारसा विचार न करता स्कॅन करून लगेच पेमेंट करतो आणि ती वस्तू खरेदी करतो. याच्यामध्ये आपल्याला भानही राहत नाही की आपल्या अकाउंट मध्ये किती पैसे शिल्लक राहिले आहेत आणि आपण पेमेंट करत राहतो.
पूर्वी जेवढे पैसे वाटले होते तेवढेच आपण खर्च करत होतो मात्र आता कॅश आपल्या पॉकेटमध्ये नसते केवळ मोबाईलचा एका क्लिकवर आपल्याला पेमेंट करता येते. पहिले कॅश देताना आपल्याला जाणवत होतो मात्र UPI मुळे अनियंत्रित झाले आहे.
जानेवारी महिन्यात 28% वाढली UPI वापरण्याची संख्या
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे UPI व्यवहार संदर्भातील आकडे प्रसिद्ध केले आहेत. यानुसार जानेवारी महिन्यामध्ये UPI व्यवहाराची वर्षातील व्यवहारावर 28% मध्ये वाढ झाली आहे. याबरोबरच UPI द्वारे देवाणघेवांमध्ये 21.70% पर्यंत व्यवहार झाले आहेत. म्हणजे UPI देवानघेवांशी मात्रा प्रत्येक महिन्यामध्ये वाढत आहे. डिसेंबर मध्ये दैनंदिन यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून रुपये झाला होता. तो जानेवारीमध्ये 91 हजार 403 कोटी रुपये झाले आहे.
UPI च्या माध्यमातून खर्चावर ठेवा असे नियंत्रण
UPI पेमेंट हे आपल्या जीवनाचे एक महत्त्वाचा भाग बनले आहे। कारण आता आपण पैसे काढण्यासाठी ATM वर जात नाहीत, बँकेत जात नाहीत यामुळे पैसे काढण्याची आवश्यकता पडत नाही मात्र तुम्हाला वाटते की तुम्ही UPI द्वारे अनावश्यक खर्च करत आहात तर यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता. चला जाणून घेऊ.
तुम्ही डेली UPI पेमेंट लिमिट फिक्स करू शकता. यूपीआय अँप द्वारे ही सुविधा देण्यात येते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून अनावश्यक खर्च करत आहात तर तुम्ही थोडीशी कॅश काढून छोटे छोटे व्यवहार कॅश मध्ये करू शकता.
आपले बजेट फिक्स करून खर्च ट्रॅक करू शकता. यातून तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे खर्च केला पाहिजे आणि कुठे नाही ते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कुठलीही मोठी खरेदी करत असताना तुम्ही एक दिवस यापूर्वी आपला बजेट बघून मग खरेदी केली पाहिजे अनेक वेळा तुम्ही ऑनलाईन खरेदी करतात आणि यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करतात.
त्यामुळे तुम्हाला जाणवत नाही तुम्ही अनावश्यक वस्तूंची खरेदी ऑनलाईन करता यासाठी एक नियम बनवा. ज्यावेळेस तुम्ही खरेदी करतात त्याच्या काही तासपूर्वी तुम्ही कमीत कमी एक दिवस वेळ घेऊन विचार करून कुठलीही ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करताना आपलं बजेट तपासून खरेदी करा यातून तुमच्या खर्चावर नियंत्रण येईल.