UPI New Rule Update News In Marathi : काय आहे केंद्र सरकारचा मोठा निर्णय
UPI New Rule आपण पाहतो सर्व काही आजकाल डिजिटल पद्धतीने झाले आहे. प्रत्येक गोष्ट डिजिटल पद्धतीने करण्यात येते. साधं आपण मार्केटमध्ये भाजी आणायला गेलो तर तिथे देखील यूपीआय द्वारे डिजिटल पद्धतीने पैसे देतो.
UPI New Rule तर मोठे मोठे लोन घेण्यापर्यंतची सर्व कामे देखील UPI द्वारे करण्यात येतात. दरम्यान पुढच्या महिन्यात यूपीआयच्या वापरण्यात महत्त्वाचे बदल देखील होणार आहेत.
NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने 10 जुलै 2025 रोजी नवीन नियम जारी केले होते. या नियमानुसार आता तुम्ही क्रेडिट लाईन UPI शी जोडले जाणार आहात.
आता बँकेतून घेतले जाणारे लोन देखील तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून वापरू शकणार आहात. आता तुम्ही लोन, एफडी, शेअर, बॉण्ड प्रॉपर्टी साठी तुम्ही यूपीआय द्वारे पेमेंट करून शकणार आहात.
तुम्ही पेटीएम, फोन पे या ॲप्स द्वारे क्रेडिट कार्ड पासून ते बिजनेस लोन पर्यंत सर्व पेमेंट अगदी सहजरीत्या करू शकतात. हा नियम १ सप्टेंबर पासून लागू करण्यात येणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने होणार लोन
NPCI ने UPI साठी नवीन निर्णय घेतले आहेत. आता तुम्ही यूपीआय वरून सेविंग अकाउंट आणि ओव्हरड्राफ्ट अकाउंट लिंक करू शकणार आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी सहजरीत्या पेमेंट करता येणार आहे. त्याचबरोबर rupey, क्रेडिट कार्ड जाणार आहे.
या नियमामुळे गोल्ड लोन, वैयक्तिक लोनचे पैसे यूपीआय द्वारे काढता येणार आहेत. यूपीआय द्वारे तुम्ही कोणते पेमेंट करू शकणार आहात कोणते नाही यासोबत बँक निर्णय घेणार आहे. यामुळे लहान व्यवसायिकांसाठी हे अत्यंत फायदेशीर गोष्ट आहे.
या नवीन नियमांमध्ये p2p म्हणजेच पर्सन टू पर्सन आणि p2m म्हणजे पर्सन ते मर्चंट ट्रांजेक्शन करू शकतील. यामुळे लहान व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे. त्यासोबतच तुम्हाला रोख रक्कम देखील काढता येणार आहे. यासाठी काही नियम असतील.
तुम्हाला एका दिवसात 1 लाखापर्यंतचे पेमेंट करता येईल. त्याचबरोबर 10,000 रुपये पर्यंत पैसे काढता येते. यूपीआय वरील फ्री क्रेडिट लाईन मुळे तुम्हाला बँकेकडून फ्री मंजूर क्रेडिट लाईन मिळवण्याची परवानगी देखील मिळणार आहे. तुमच्याशी लिंक खात्यातून व्यवहार तुम्ही करू शकणार आहात.