UPI Transaction New Rules 2025 in marathi : 1 ऑगस्ट पासून Phonepe, GPay, Paytm चे नियम बदलणार

UPI Transaction New Rules 2025 in marathi : काय असेल नवीन नियम

UPI Transaction New Rules 2025 in marathi : UPI व्यवहारामध्ये गती आणण्यासाठी डिजिटल पेमेंट मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. UPI पेमेंट करताना काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. ह्या मर्यादा 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहेत. तुम्हीही डिजिटल पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती आवश्यक आहे.

फोन पे, गुगल पे, पेटीएम हे आजचे डिजिटल युगातील पेमेंटचे प्रत्येकाचे साधन झाले आहे. सरळ आणि सोप्या पद्धतीने तुम्ही कुठलेही पेमेंट करू शकता. त्यामुळे प्रत्येकजण डिजिटल व्यवहारावर अवलंबून झाला आहे. गती देण्यासाठी आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. हे नियम 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहेत.

UPI Transaction New Rules In Marathi आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक जण डिजिटल पेमेंटचा वापर करतो. मात्र आता 1 ऑगस्ट पासून फोन पे, गुगल पे, पेटीएम यांच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया डिजिटल पेमेंट मध्ये काय नवीन नियम लागू होणार आहेत.

UPI Transaction New Rules 2025 आज देशातील प्रत्येक जण UPI पेमेंटचा वापर करत आहे. यामध्ये 1 ऑगस्ट पासून नवीन नियम लागू होणार आहेत.

यूपीआय इकोसिस्टीम चे व्यवस्थापन करणारी भारतीय राष्ट्रीय पेमेंट महामंडळ एनपीसीआय प्रणाली वरील ताण कमी करण्यासाठी आणि व्यवहारातील समस्या सोडवण्यासाठी काही नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत.

या नव्या नियमानुसार तुमचे बॅलन्स तपासणे आणि स्टेटस रिफ्रेश करण्यासंबंधीच्या विनंती यावर मर्यादा येणार आहे. त्यामुळे तुम्ही ही सुविधा वापरताना गरजेनुसारच वापर करा.

बॅलन्स तपासण्यावर मर्यादा

1 ऑगस्ट पासून यूपीआय वापरणाऱ्यांना दिवसातून 50 वेळाच आपल्या खात्यातील शिल्लक तपासता येणार आहे. याबरोबरच फोन नंबरशी संबंधित बँक खात्याची माहिती यूपीआय अँप वर दिवसातून 25 वेळाच पाहता येणार आहे.

या नवीन मर्यादा ॲपवरील ट्रॅफिक कमी करण्यासाठी घालण्यात आले आहेत. जेणेकरून दिवसात सिस्टीम स्लो होणार नाही आणि व्यवहारांमध्ये कुठली अडचण निर्माण होणार नाही. नेटवर्कवरील अनावश्यक लोड कमी होईल त्यामुळे प्रणालीला गती मिळेल कार्यक्षम आणि सुरक्षित पद्धतीने काम होत राहील.

याशिवाय NPCI आता यूपीआय ऑटो पे व्यवहारासाठी वेळापत्रक लागू करत आहे. त्यानुसार ऑटो पेमेंट्स सबस्क्रीप्शन युटीलिटी बिल्स आणि इ एम आय सारखे अधिक शेड्युल केलेले व्यवहार दिवसभरात कधीही नाही तर निश्चित एका वेळेवरच तुम्हाला पाहता येतील ठराविक वेळी तुम्हाला हे सर्व पाहता येणार आहे.

ऑटो पे व्यवहार ठराविक 3 वेळा मध्येच प्रोसेस होतील

  • सकाळी 10 वाजण्यापूर्वी
  • दुपारी 1 ते 5 या वेळेत
  • रात्री 9 नंतर

या वेळेनंतर ऑटो पे व्यवहार प्रक्रिया होणार नाही. मात्र UPI व्यवहार मर्यादेमध्ये कुठलाही बदल करण्यात आला नाही ते पूर्वीप्रमाणेच काम करत राहतील.