UPI Without Bank Account in marathi : बँकेत खाते नसतानाही होणार UPI पेमेंट

UPI payments : जाणून घ्या मुले कसे करू शकतील ऑनलाइन पेमेंट

UPI Without Bank Account in marathi : आरबीआय आता एक ॲप घेऊन आले आहे. ज्याद्वारे मुले आता कुठल्याही बँक अकाउंट शिवाय ऑनलाइन पेमेंट करू शकणार आहेत. हे ॲप त्यांना आर्थिक समज आणि जबाबदारी शिकवणार आहे.

कल्पना करा की तुमचे लहान मूल छोट्या छोट्या गरजांसाठी ऑनलाईन पेमेंट करत आहे. तेही कुठल्याही बँक अकाउंट शिवाय. हे सर्व स्वप्न नाही, तर आता सत्य होत आहे. जे मुलांना UPI payments करण्याची सुविधा देत आहे.

आता ते आई-वडिलांच्या अकाउंटशी लिंक होऊन किंवा QR कोड स्कॅन करून ऑनलाईन खरेदी करू शकतील. ही केवळ सुविधा नाही तर मुलांना आर्थिक समज आणि जबाबदारी शिकवण्याची नवीन पद्धत आहे. चला जाणून घेऊया ती कशी काम करते.

आता अकाउंट नसतानाही पेमेंट शक्य

UPI Without Bank Account in marathi : भारत डिजिटल पेमेंट व्यवहारामध्ये जगात अग्रणी देशांमध्ये सहभागी आहे. आज छोट्या दुकानापासून ते मॉल पर्यंत लोक डिजिटल पेमेंटचा वापर करत आहेत. मात्र यासाठी सामान्यतः बँक अकाउंट असणे आवश्यक असते. मात्र आरबीआय RBI ने नवीन योजनेच्या माध्यमातून आता बँक अकाउंट नसतानाही ऑनलाइन पेमेंट करणे शक्य होणार आहे.

मुलेही करू शकतील पेमेंट

आरबीआय ने Junio Payments प्रायव्हेट लिमिटेड ला डिजिटल वायलेट सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या नवीन वायलेट द्वारे मुले बँक अकाउंट नसतानाही यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकतील. ही सुविधा NPCI च्या यूपीआय सर्कल इनीशिएटिव जोडली आहे. याद्वारे आई-वडील आपल्या यूपीआय अकाउंट ला मुलाचे वॉलेट लिंक करू शकतील.

काय आहे याचा उद्देश

UPI Without Bank Account in marathi : जुनियो पेमेंट चा उद्देश केवळ पेमेंट सुविधा देणे नाही, यामागील उद्देश म्हणजे मुलांना आणि तरुणांना आर्थिक जबाबदारीची जाणीव करून देणे आहे. अंकित गेरा आणि शंकरनाथ यांनी हे ॲप लॉन्च केले आहे. जेणेकरून मुल जबाबदारीने खर्च करणे शिकतील आणि बचत करण्याची सवय लागेल.

आई वडील ॲप मध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतील. खर्चाची मर्यादा ही निश्चित करू शकतील आणि प्रत्येक ट्रांजेक्शन वर लक्षही ठेवू शकतील. जिनिओ ॲप मध्ये टास्क रेकॉर्ड आणि सेविंग गोल्ड सारख्या सुविधाही उपलब्ध आहेत. यामुळे मुलांना प्रॅक्टिकल पद्धतीने पैसे कसे वाचवावे हे शिकू शकतील.

UPI Without Bank Account in marathi : खर्चावर नियंत्रण कसे ठेवायचे आणि छोट्या वयामध्ये आर्थिक समज विकसित करणे हा योजनेचा उद्देश आहे. आतापर्यंत दोन मिलियन पेक्षा अधिक तरुणांनी हे ॲपचा वापर केला आहे.कसे काम करते जूनिओ वायलेट
आई वडील आपल्या UPI अकाउंटशी मुलाचे वॉलेट लिंक करतील. मुले QR स्कॅन करून कुठल्या दुकान किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पेमेंट करू शकतील.

खर्चाची मर्यादा पहिल्यापासून निश्चित असल्यामुळे मुले गरजेपेक्षा अधिक खर्च करू शकणार नाहीत. ॲप मध्ये ट्रांजेक्शनचे रेकॉर्ड उपलब्ध असेल. ज्याद्वारे आई-वडील ट्रांजेक्शन मॉनिटर करू शकतील. या सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मुलांना विना बँक अकाउंट डिजिटल व्यवहार करता येतील.

यामुळे केवळ पेमेंट प्रक्रिया सोपी होणार नाही तर मुलांना आर्थिक अनुशासन आणि समज मिळणार आहे. डिजिटल युगामध्ये हे पाऊल मुलांना पैसे योग्य ओळख आणि खर्च आणि बचत ची सवय आणि जबाबदारी शिकवणार आहे.

भविष्यात अजून अपडेट होऊ शकते अँप

UPI Without Bank Account : भविष्यामध्ये junio payments आणि NPCI मिळून नवीन फीचर आणू शकतात. यामध्ये ऑनलाइन विड्रॉल आणि सेविंग प्लॅन जोडू शकता. यामुळे मुलांना हळूहळू फायनान्शिअल लिटरेसी विकसित होईल. आई वडील पण या सिस्टमच्या मदतीने मुलांना पैशावर लक्ष ठेवू शकतील आणि त्यांना स्मार्ट आणि सुरक्षित डिजिटल उपयोग करण्याची सवय लावू शकते.

या नवीन डिजिटल सुविधांमध्ये मुलांसाठी ऑनलाईन पेमेंट करणे सुरक्षित सोपे आणि शिक्षित बनवते. हे पाऊल भारतामध्ये डिजिटल आर्थिक समावेशक च्या दिशेमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल आहे.