Vaahu Sumane Tav Pad Kamali In Marathi Mantra Pushpanjali वाहू सुमने तव पद कमली मंत्रपुष्पांजली
वाहू सुमने तव पद कमली
प्रणाम करूया हो…!
आत्मसुखाची हिच पाऊली
हृदयी धरू या हो…!
मानुनि घ्यावी सेवा आमुची
अल्पत ही सारी…!
सद्गुरू राया प्रसन्न व्हावे
भक्ताला तारी…!
भक्त वत्सला तुझ्या कृपेची
छाया दे राया…!
तुजवीण नाही जगी आम्हाला
कोणीही रक्षाया ….!
बेल फुले हि हाती घेउनी
मंजुळ तुळशीची …!
जाई जुईची वाहू सुमने
पुष्प गुलाबाची….!
बहुविध सुमने चरणी वाहू
सुवास दरवळा ….!
नित्य सुखाची द्यावी गोडी
अजाण भक्ताला …!
शक्ती बुद्धी दे मन शांती दे
तुजसी वृन्दाया….!
कृपा प्रसादे तू जगदीशा
वूद्धरीसी काया…..!
वाहू सुमने तव पद कमली
प्रणाम करूया हो…!
आत्मसुखाची हिच पाऊल
हृदयी धरू या हो……………||
गणपतीला बुद्धीची देवता का म्हणतात?
नवरात्रातील 9 रंग कोणते?, आणि काय आहे शुभमुहूर्तची वेळ?