Vasubaras 2024 In Marathi : वसुबारस साजरा करण्यामागचे महत्त्व

Vasubaras 2024 Information In Marathi : वसुबारस 2024 मराठी माहिती

Vasubaras 2024 दिवाळी या सणाला सणांचा राजा मानले जाते. या दिवशी प्रत्येकाच्या घरोघरी दिवे लागतात. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतात गाईला मातेचा दर्जा आहे. गाय ही पूजनिय मानली गेली आहे. तिच्या प्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते.

Vasubaras 2024 वसुबारस हा सण यावर्षी एकादशीच्या दिवशीच आहे. वसुबारस हा सण कसा साजरा करतात? या दिवशी काय करावे? वसुबारस चे व्रत कसे? याची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

Vasubaras 2024 दिवाळी हा सण जगभरात प्रत्येकाच्या घरी साजरा होतो. वसुबारस म्हणजेच गोवत्स्वद्वादशी असे म्हणतात. हा दिवस दिवाळीला धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी असतो. देशातील अनेक ठिकाणी वसुबारस पासून दिवाळीला सुरुवात होते.

Vasubaras 2024 यावर्षी सोमवार 28 ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी आहे. त्यामुळे वसुबारस यावर्षी एकादशीच्या दिवशीच आली आहे. त्यामुळे यंदाच्या वसुबारसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. समुद्रमंथनातून 5 कामधेन उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या गोमतेला उद्देशून हा सण साजरा केला जातो असे म्हणतात. वसुबारस या शब्दातील वस्तू आणि धन त्यासाठी आलेली बारस म्हणजे द्वादशी.

वसुबारसचे पूजन

Vasubaras 2024 Date And Time In Marathi

वसुबारस Vasubaras 2024ची पूजा करण्यासाठी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी अथवा सायंकाळी गाईची पूजा करतात आणि पुढील मंत्राचा जप करतात.

तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |

मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||

Vasubaras 2024 Date And Time In Marathiहे सर्वात मोठे व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते तू माझे मनोरथ सफल कर असा या मंत्राचा अर्थ आहे. या दिवसापासून दिवाळी या सणाला सुरुवात होते. प्रत्येकाच्या घरोघरी मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात.

घरात देवी लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी गाई आणि वासरूची पूजा केली जाते. घरातील बायका गाईच्या पायावर पाणी घालतात, गाईला हळदी -कुंकू आणि अक्षदा वाहतात. ज्यांच्या घरी गुरे -वासरे आहेत त्यांच्या घरी या दिवशी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो.

वसुबारस सणाचे नियम Vasubaras 2024

Vasubaras 2024वसुबारस या सणाच्या दिवशी गहू, मूग खाऊ नये. महिला या दिवशी दिवसभर उपवास करतात. बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत.