Vat purnima 2025 Date in marathi : वटपौर्णिमा 2025

Vat purnima 2025 in marathi : व्रत, पूजा, मुहूर्त, विधी

Vat purnima 2025 Date आज आपण वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. विवाहित महिलांसाठी चा वटसावित्री पौर्णिमा हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सन्मानला जातो. या दिवशी महिला उपवास करतात आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.

Vat purnima Vrat 2025 अखंड सौभाग्य लाभण्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास महिला अत्यंत उत्साहाने करतात. असे म्हणतात की, सावित्रीने ही व्रत करून यम राजाकडून तिच्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते.

Vat purnima 2025 Date हिंदू पंचांगानुसार वटसावित्री पौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार सावित्रीने तिच्या नवऱ्याचे पतीचे सत्यवानाचे प्राण यम राजाकडून परत मिळवले होते.

Vat purnima 2025 Date म्हणून या दिवशी हा सण साजरा केला जातो. त्यामुळे विवाहित स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाची पूजा करतात.

Vat purnima Vrat 2025 यंदा वटपौर्णिमा कोणत्या दिवशी आहे? वटपौर्णिमेची तिथी काय आहे? वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्त कोणते? वटपौर्णिमेची पूजा कशी करावी? याची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आणि तारीख

Vat purnima 2025 ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने तिच्या पतीचे सत्यवानाचे परम यमाकडून परत आणले होते. त्यामुळे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा हा सण महिला अत्यंत उत्साहाने साजरा करतात.

Vat purnima Vrat 2025 नवऱ्याला दीर्घायुष्य लाभण्यासाठी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात. त्याचबरोबर उपवास देखील करतात. सात जन्म हाच नवरा मिळू दे अशी प्रार्थना वडाला करून वडाला फेऱ्या मारतात.

वटपोर्णिमा 2025 तारीख आणि वेळ

Vat Savitri purnima 2025 Date

वटपौर्णिमेची तारीख 10 जून 2025

वटपौर्णिमा तिथी 10 जून सकाळी 11 वाजून 35 मिनिटापासून 11 जून दुपारी 01 वाजून 13 मिनिटापर्यंत

वटपौर्णिमा शुभ मुहूर्त

Vat purnima 2025 Shubh Muhurta

वटपौर्णिमेच्या व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 55 मिनिटापासून दुपारी 12 वाजून 51 मिनिटापर्यंत आहे.

वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्ता पासून पूजा विधीला सुरुवात करणे शुभ मांडले जाते. पूजेसाठीचा वेळ सूर्योदयापासून दुपारपर्यंतचा उत्तम वेळ आहे.

वटपोर्णिमा साहित्य

पांढरे सूत
आंबा, टरबूज यासांरखी फळे
फुले
वटवृक्षाची फांदी
अक्षता
अगरबत्ती
भिजवलेले हरभरे
कुंकू,
चंदन
दिवा
सुगंधी अत्तर
बत्ताशा
सुपारी
ओटीसाठी नारळ
साखर किंवा गुळ
पाणी

वटपोर्णिमा पूजा आणि व्रत

Vat Savitri purnima 2025 Date

Vat Savitri purnima 2025 Date वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करतात. विवाहित स्त्रियांनी या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून देवपूजा करावी. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची देखील पूजा केली जाते. वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य गोळा करावे.

मुहूर्त पाहून साडी नेसून शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करावी. या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास करावा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावा आणि व्रताची सांगता करावी.

काही महिला वटपौर्णिमेला निर्जली उपवास करतात. काही महिला फळे खाऊन उपवास करतात. काही महिला हा उपवास त्या दिवशी सोडत नाहीत. आपापल्या परंपरेनुसार तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करू शकता.