vat purnima ukhane in marathi 2025 : वटपौर्णिमेचे उखाणे

vat purnima ukhane 2025 in marathi : नवीन वटपौर्णिमेचे उखाणे

new vat purnima ukhane in marathi :  आज वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला अत्यंत उत्साहाने साज शृंगार करून वडाची पूजा करतात. उखाणे घेतात.

vat purnima ukhane in marathi आज आपण या लेखाच्या माध्यमातून वटपौर्णिमेचे मराठी उखाणे पाहणार आहोत. अनेकांना उखाणे पाठ असतात पण नवीन लग्न झालेल्या मुलींना, आजकालच्या पिढींना उखाणे एवढे येत नाहीत.

वटपौर्णिमा 2025 व्रत, पूजा, मुहूर्त, विधी

वटपौर्णिमा कथा मराठी

वटपौर्णिमा आरती

vat purnima ukhane in marathi 2025 तर त्यांनी या लेखाच्या माध्यमातून नक्कीच उखाणे बघावेत आणि अगदी सुंदर सुंदर आणि छोटे छोटे उखाणे आपण आज पाहणार आहोत. त्यापैकी तुम्ही वटपौर्णिमेच्या निमित्ताने उखाणे घेऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया उखाण्यांना.

वटपौर्णिमेचे उखाणे

vat purnima ukhane in marathi

वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा,
…रावांची मी, आयुष्यभर करेन सर्वांची सेवा

वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा
…रावांचे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा

भरजरी साडीला जरीचा खण
… रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण

वडाची पूजा आज मनोभावे करते
… रावांसाठी दीर्घायुष्य मागते

दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
………चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी

नाजूक अनारसे साजूक तुपात तळावेत,
…… सारखे पती जन्मोजन्मी मिळावेत

संसाराच्या देव्हा-यात उजळतो नंदादीप समाधानाचा
…रावांचे नाव घेऊन, वटपौर्णिमेच्या दिवशी आशिर्वाद अखंड सौभाग्याचा

तीन वर्षातून एकदा येतो अधिकमास
…रावांचे नाव घेते आज केला वटपौर्णमेचा उपवास

वटवृक्ष सांगतो, सत्यवान-सावित्रीचा इतिहास…
…रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेसाठी खास

वडाची पूजा करून, मागितले दीर्घायुष्याचे दान…
…रावांसोबत, मी संसार करते छान

वडाच्या झाडाला घातल्या, प्रदक्षिणा एकशे आठ…
…रावांसोबत बांधली, मी जन्मोजन्मीची गाठ

रामाने सीतेसाठी, उचलले शिवधनुष्य…
…रावांसाठी मागते, देवाकडे दीर्घायुष्य

वटपौर्णिमेला आहे, वडाला खूपच महत्त्व…
…रावांची वाढत राहो, कीर्ती आणि कर्तृत्व

पतिव्रता धर्माचा, सावित्री आहे आदर्श…
…रावांचे नाव घेताना, होतो खूपच हर्ष

वटपौर्णिमेचे व्रत, निष्ठेने करते…
…रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते

सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न
….रावांसोबत झाले आताच माझे लग्न

वडाच्या झाडाला फेरया घालण्यासाठी, जमल्या साऱ्या बाईका
_ रावांचे नाव घेते सर्व जणी ऐका…!

वडाची फांदी लावून करते मी वृक्षारोपण,
_ रावांच्या म्हणण्याप्रमाणे करेन मी परिवाराचे संगोपन….!

नाजूक अनारसे, साजूक तुपात तळावे,
__ रावांसारखे पती सात जन्म मिळावे…!

कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकवाच्या राशी,
_ रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी!

आईवडीलांसारखी माया नसते ह्या जगात कोणाला,
__ रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या सणाला!

हातात घातल्या बांगड्या, गळ्यात घातली ठुशी,
_ रावांचे नाव घेते _ च्या दिवशी!

पैठणी घालण्यासाठी मी आहे फार हौशी,
_ रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी!

गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी,
_ रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी…!

मनोभावे पूजा केली, लुटले सौभाग्याचे वाण,
_ साठी वटपौर्णिमाच्या दिवशी मागितले दीर्घायुष्याचे दान!

लग्नासाठी लागतात हार आणि तुरे,
__ रावांच नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

हिरव्या शालूला जरीचे काठ,
__ रावाचे नाव घेते सोडा माझी वाट.

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,
वटपौर्णिमाच्या दिवशी __रावाचं नाव येत थेट माझ्या हृदयातून.

वट सावित्रेला नमन करते, तुझ्या सृष्टी मुळे आनंदी आहे मनुष्य,
___ रावांचे नाव घेते, त्यांना मिळूदे १०० वर्ष आयुष्य.

वटवृक्षाच्या झाडाला, प्रदक्षिणा घातल्या सात,
_ रावांचे नाव घेते, आपल्या सर्वांचे असुदे आमच्यावर आशीर्वादाचे हात.

यंदाची वटपौर्णिमेची तारीख आहे, 10 जून,
__ रावांचे नाव घेते, ……………. घराण्याची सून.

तुटता तारा पाहून, माझी पूर्ण झाली आहे इच्छा,
__रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

वटवृक्षाची पूजा करून, गरजू व्यक्तीला करावे दान,
__ रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.

पाच सुहासिनी स्त्रियांची, ओटी मी भरली,
_ रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली.

सावित्रीने केली सत्यवान नावाच्या, राजकुमाराची निवड,
____ रावांची होती मला, कॉलेजपासून आवड.

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला, गुंडाळतात धागा,
__ रावांसाठी माझ्या मनात कधीही, कमी नाही होणार जागा.

नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश,
__ रावांसोबत लग्न होताच, पडला माझ्या आयुष्यात प्रकाश.

आज मागणे मागते देवाला, पूर्ण होऊदेत तुमच्या ईच्छा,
__ रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

वट पौर्णिमेचे व्रत, निष्टेने करते,
_ रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते.

आयुष्यात सुख- दुःख, दोन्ही असावे.
_ रावांसारखे पती, जन्मो-जन्मी मिळावे.

आज पहिलीच आहे, माझी वटपौर्णिमा,
_ रावांसोबत, एकही क्षण करमेना.

बोलत असताना, होते मी मग्न,
_ रावांसारखे पती भेटूदेत, सात जन्म.

वडाला घालते फेरे, आणि देवाला करते नवस,
_ रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा दिवस.

वडाची पूजा करते, ठेवुनी निर्मळ मन,
__ रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा सण.

आज आहे माझी पहिली, वट सावित्री,
__ रावांचे नाव घेते, होऊदेत त्यांची अखंड किर्ती.