यंदा गावातून जा पंढरपूरला…

Image-Instagram

एसटीकडून 5 हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन

Image-Instagram

आषाढी एकादशी निमित्त राज्यातील कोणत्याही गावातून 40 पेक्षा अधिक भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे

Image-Instagram

एसटी मिळवण्यासाठी भाविकांनी जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

Image-Instagram

राज्यातील मोठ्या प्रमाणात भाविक आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात.

Image-Instagram

 ही बाब लक्षात घेऊन एसटीने ही सुविधा सुरू केली. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी भाविकांसाठी एसटीने 5000 विशेष बस गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

Image-Instagram

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील लाखो भाविक पंढरपूर मध्ये दाखल होतील.

Image-Instagram

विशेष बाब म्हणजे या प्रवासात 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तसेच महिलांना 50 टक्के तिकीट दराची सूट ही दिली जाणार आहे.

Image-Instagram

गेल्या वर्षी एसटी महामंडळ आषाढीनिमित्त 4245 विशेष बस गाड्या पंढरपूरला सोडल्या होत्या त्यातून 18 लाख 30 हजार 934 भाविकांची सुखरूप प्रवास एसटीने केला होता. 

Image-Instagram