वाशिंग्टन : एलियन्स किंवा दुसऱ्या ग्रहावरील जीव पृथ्वीवर आपल्यातच लपून राहत असल्याची धक्कादायक माहिती एका संशोधनातुन समोर आली आहे. हे ऐकून सर्वांना धक्काच बसला आहे.
Image - Live Science
नुकताच हार्वर्ड विद्यापीठाने एक अहवाल सादर केला. यात एलियन्स किंवा दुसऱ्या ग्रहावरील जीव गुप्तपणे आपल्यासोबतच म्हणजे आपल्या आजूबाजूला राहत आहेत, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
Image - CNET
हा सिद्धांत क्रिप्टोटेरेस्ट्रियल नावाने ओळखला जातो. या अंतर्गत दोन शक्यता असतात, पहिली एलियन्स आपल्यातच आहेत आणि दुसरे म्हणजे एखादा अडवांस ग्रुप गुप्त पद्धतीने पृथ्वीवर राहत आहे.
Image - Instagram
अहवालानुसार, संशोधनाद्वारे प्राचीन मानव संस्कृती, गैरमानवी प्रजाती आणि परी, काल्पपिक-रहस्यमय गोष्टींच्या अस्तित्वावरही संशोधन करण्यात आले आहे.
Image - Instagram
हार्वर्ड विद्यापीठाच्या या संशोधनाचा उद्देश क्रिप्टोटेरेस्ट्रियल अंदानाच्या शक्यताची तपासणी आणि अज्ञात युएफओ दिसल्याच्या घटना याबद्दल माहिती मिळवणे होते.
Image - Instagram
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात नासाने युएफओ दिसल्याच्या तपासात समजले की, अशा प्रकारच्या घटना घडण्यामागे एलियन्स असल्याचा कुठलाही पुरवा नाही. मात्र नासाने संपूर्णपणे याला नकारही दिलेला नाही.