आजही राज्यातील अनेक गावांमध्ये पाण्याच्या भीषण समस्याचा सामना नागरिक करत आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली आहे.
image - X
बदलत्या हवामानामुळे निसर्गाच्या चक्रामध्ये सतत बदल होत आहे. त्यामुळे देशभरात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे.
image - X
पावसाचे पाणी साठवण्यासाठी निर्माण केलेल्या धरण जलसाठ्यांमधील गाळ काढण्यासाठी सरकारची ही योजना प्रभावी ठरताना दिसत आहे.
image - X
जलसाठ्यामधील गाळ काढायचा आणि दुसऱ्या बाजूला तोच गाळ शेतात पसरवायचा यामुळे पाण्याची क्षमता आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे.
image - X
'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना' पुढील तीन वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे.
image - X
राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना धरणातील गाळ आपल्या शेतात पसरण्यासाठी सरकार अनुदान देते.
image - X
डिसेंबर 2023 च्या अखेरीस राज्यातील 7504 जलाशयातून 7.17 कोटी घनमीटर गाळ उपासण्यात आला.
image - X
धरणातील गाळ उपसल्यामुळे धरणाची पाणी साठवणूक क्षमता वाढली
image - X
धरणातील गाळ शेतात पसरविल्यामुळे शेतीचे उत्पादनही वाढण्यास मदत होत आहे.