भाजप खासदार कंगना राणावतच्या थोबाडीत कोणी लगावली; आणि का?
image - Instagram
हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदार संघातून निवडून आलेली नवनिर्वाचित खासदार कंगना रणावत बद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे.
image - Instagram
चंदीगड विमानतळावर CISF महिला जवानाने कंगना रणौतच्या थोबाडीत मारली आहे. कंगना रणौत सोबत गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली आहे
image - Instagram
ज्या महिला जवानाने तिला थोबाडीत मारली तिचे नाव कुलविंदर कौर असे आहे.
image - Instagram
या घटनेनंतर कुलविंदरला ताब्यात घेण्यात आले आहे.
image - Instagram
कंगना रणौतने शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकरी महिलाविरोधात वक्तव्य केल्याने CISF महिला गार्डने थोबाडीत मारली असल्याचे सांगितले जात आहे.
image - Instagram
ही घटना 6 जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे.
image - Instagram
कंगनाला चंदीगडहून दिल्लीला जायचे होते. CISF महिला शिपाई कुलविंदर कौर यांनी त्यांच्या सुरक्षा तपासणीदरम्यान हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
image - Instagram
कंगनाने यांची तक्रार केल्यानंतर तत्काळ कौर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधीत अधिकाऱ्याकडून सीसीटीव्ही तपासण्यात आले आहेत.
image - Instagram
कंगनाने या घटणे बाबत पोलिसांत तक्रार केली आहे
image - Instagram