देशातील शेतकऱ्यांसह सर्वजण मान्सूनची आतुरतेने वाट पाहतात कधी एकदा मान्सून येईल आणि उकड्यापासून सुटका मिळेल याची सर्वजण वाट पाहत असतात
Image-X
आता हवामान विभागाने एक आनंदाची बातमी दिली आहे
Image-Instagram
त्यानुसार मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे
Image-Instagram
या पोषक वातावरणामुळे राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात मान्सूनचा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
Image-Instagram
मान्सूनला पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरणामुळे रविवारी मान्सूनचे वारे अरबी समुद्रातील आणखी काही भाग, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणाचा आणखी काही भाग, आंध्र प्रदेशाची किनारपट्टी व्यापणार आहे
Image-Instagram
त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसात मान्सून राज्यात सक्रिय होऊन जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
Image-Instagram
राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे आणि आता लवकरच मान्सूनचा पाऊस दाखल होणार असल्याने शेतीच्या कामाला वेग येईल