मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचे तिसरे पर्व सुरू होत आहे.
Image - Instagram
स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व तीसरे.
Image - Instagram
येत्या 13 जुलै पासून शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाह वाहिनीवर दिसणार.
Image - Instagram
या पर्वा मध्ये तीन परीक्षकांमध्ये टॉप 12 स्पर्धक विभागण्यात येणार आहेत.
Image - Hotstar
यामुळे स्पर्धकांसोबतच परीक्षकांमध्येही सुरांची स्पर्धा चांगलीच रंगणार आहे.
Image - Youtube
मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद च्या दोन्ही पर्वाना प्रचंड प्रतिसाद मिळाल्या नंतर प्रेक्षकांसाठी तिसरे पर्व सुरू होत आहे.
Image - Hotstar
या पर्वा मध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 4 ते 14 या वयोगटातील छोटे उस्ताद आलेले आहेत.
Image - Hotstar
पहिल्या पर्वाप्रमाणेच या पर्वातही परीक्षक म्हणून अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि सर्वांचा लाडका गायक आदर्श शिंदे हे आहेत.
Image - Hotstar
पहिला एपिसोड आषाढी एकादशी विशेष भाग असल्यामुळे या कार्यक्रमाचा श्री गणेशा हा विठू नामाच्या जयघोषात होणार आहे.
Image - Hotstar
या पर्वात छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला थक्क करणार आहेत.