लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ 

Image - Instagram

सध्या संपूर्ण राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. 

Image - Instagram

या योजनेची घोषणा केल्यानंतर लगेचच या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी अर्ज भरण्यास देखील सुरुवात केली आहे.

Image - Instagram

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे मिळवण्यासाठी राज्यभरातील तहसील कार्यालयामध्ये मोठी गर्दी होत आहे. 

Image - Instagram

ही गर्दी पाहता राज्य सरकारने या योजनेच्या कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे. आणि नियमात देखील बदल केले आहेत. 

Image - Instagram

या योजनेसाठी आता 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या महिलाही अर्ज करू शकतील.

Image - Instagram

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज करण्याची मदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 होती ती आता दोन महिने वाढविण्यात आली आहे.

Image - Instagram

आता या योजनेसाठी 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येतील.

Image - Instagram

वयोमर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आलेले आहे. 

Image - Instagram

आता  कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता नाही असा देखील बदल या योजनेत करण्यात आला.

Image - Instagram