एनडीएचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर मोदींची ही भावनिक पोस्ट व्हायरल होत आहे
लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल ४ जून रोजी लागला. यात एनडीए पुन्हा एकदा सरकार बनवत आहे.
६ जून रोजी एनडीएची संसदीय मंडळाची बैठक झाली. यात नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात आली. नरेंद्र मोदी यांचा प्रस्ताव राजनाथ सिंह यांनी ठेवला.
नेता म्हणून निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडिया प्लेटफॉर्म एक्सवर एनडीएचे मित्रपक्ष आणि खासदारांचे आभार मानले आहेत.
image-x
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट मध्ये लिहिले की, मी अत्यंत विनम्रपणे एनडीएला विकासामुख सरकारच्या आणखी एका कार्यकाळाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी स्विकारतो.
image-x
आपल्या एनडीएमधील सर्व मित्रपक्ष आणि खासदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यासाठी मी आभारी आहे.
image-x
हे आपले संविधानच आहे, त्यामुळे माझ्या सारख्या गरीब आणि मागास कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
image-x
image-x
संपूर्ण देशाचे लक्ष आता पंतप्रधान पदाची शपथ कधी घेतात या कडे लागले